आरोग्य, वैद्यकीय मंत्री मराठवाड्यातले तरी रुग्णांचे हाल, याची शरम वाटली पाहिजे

दररोज मृत्यूचे आकडे जनतेसमोर ठेवून त्यांना घाबरावयचे आणि आपला ताण कमी करण्यासाठी लाॅकडाऊन लावयाचा हे प्रकार सध्या सुरू आहेत.
Mim Mp Imtiaz Jalil- Amit Deshmukh- Rajesh Tope News Aurangabad
Mim Mp Imtiaz Jalil- Amit Deshmukh- Rajesh Tope News Aurangabad

औरंगाबाद : राज्यात विशेषतः मराठवाड्यात कोरोनामुळे सर्वसमान्यांचे हाल होत आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख हे दोघे जालना, लातूर म्हणजे आपल्याच मराठवाड्यातील आहेत. तरी आरोग्य आणि वैद्यकीय सेवेसाठीच्या आवश्य सुविधा उपलब्ध नाहीत. याची आम्हाला नागरिक म्हणून आणि त्यांना मंत्री म्हणून शरम वाटायला पाहिजे, अशा शब्दांत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी संताप व्यक्त केला.

औरंगाबाद जिल्ह्यात येत्या ३० मार्च ते ८ एप्रिल पर्यंत लाॅकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. या संदर्भात आपली भूमिका मांडतांना इम्तियाज जलील यांनी आजच्या परिस्थितीला आरोग्य व वैद्यकीय सेवेतील त्रुटी, आवश्यक डाॅक्टर, पॅरामेडिकल स्टाफची कमतरता, रिक्तपदे. साधन सामुग्रीचा अभाव या गोष्टी असल्याचा आरोप करत लाॅकडाऊन प्रशासनाने लादल्याचे म्हटले आहे.

इम्तियाज जलील म्हणाले, प्रशासनाने लाॅकडाऊनची घोषणा केली, पण ती करत असतांना औद्योगिक वसाहती म्हणजेच कंपन्या सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. करायचे तर संपुर्ण लाॅकडाऊन करा, नाही तर सगळेच सुरू ठेवा. कंपन्यात जाणाऱ्या हजारो, लोखो लोकांचे प्राण धोक्यात का आणले जात आहेत? की मग केवळ उद्योगपतींना खुष करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

दररोज मृत्यूचे आकडे जनतेसमोर ठेवून त्यांना घाबरावयचे आणि आपला ताण कमी करण्यासाठी लाॅकडाऊन लावयाचा हे प्रकार सध्या सुरू आहेत. कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढले आहे, लोकांना उपचारांसाठी बेड मिळत नाही, याला जबाबदार कोण? राज्यकर्ते आणि प्रशासन यांच्या हलगर्जीपणामुळेच आजची परिस्थिती ओढावली आहे.

रिक्त पदे का भरत नाही?

औरंगाबाद शहराचा विचार केला तर शासकीय वैद्यकीय रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, कर्करोग रुग्णालय, महापालिकेची आरोग्य केंद्र आणि नव्यानेच तयार झालेली सुपर स्पेशालिटी हाॅस्पीटलची इमारत या सगळ्यांमध्ये अडीच ते तीन हजार डाॅक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी अशी विविध पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहेत.

आम्ही वारंवार मागणी केली, पण त्यावर सरकार काहीच हालचाल करत नाही. दीडशे कोटी रुपये खर्चून २०१७ मध्ये औरंगाबादेतील घाटी हाॅस्पीटलमध्ये सुपर स्पेशालिटीची इमारत उभी आहे. पण तिथल्या २१९ पदांना अद्याप मंजुरी मिळालेली नाही. ही पदे भरली गेली असती तर आज कोरोना महामारीत या इमारतीत चारशेहून अधिक रुग्णांवर उपचार करता आले असते, असा दावा देखील इम्तियाज जलील यांनी केला.

राज्य विशेषतः मराठवाड्यातील आजच्या परिस्थितीला राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख हे जबाबदार असल्याचा आरोप करतांनाच याची त्यांना शरम वाटाया पाहिजे, असेही इम्तियाज जलील म्हणाले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com