तुम्ही मूक मोर्चे काढा,आम्ही तलवारी काढून मराठा आरक्षण मिळवून दाखवू..

संभाजी राजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणावर जहाल भूमिका घ्यावी, त्यांना आमचा पाठिंबा असेल.
Chawa Sangahtna Head Nanasaheb Jawale News Jalna
Chawa Sangahtna Head Nanasaheb Jawale News Jalna

जालना : संभाजीराजेंनी आरक्षणासाठी मूक मोर्चे काढो की आणखी काही करो ,आम्ही तलवारी काढूनच आरक्षण मिळवून दाखवणार, असा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेचे नानासाहेब जावळे यांनी दिला आहे. (He will show his Maratha reservation by drawing his sword and taking to the streets.)

राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा चिघळला आहे. भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारला काही पर्याय सूचवत तुम्ही मराठा समाजासाठी काय करणार? असा सवाल उपस्थित करत राज्यभरात दौरे सुरू केले होते. ( All India Chawa Sanghtana Head Nanasaheb Jawale)

या शिवाय कोल्हापूरात मुक आंदोलन करत आरक्षणावर आक्रमक भूमिका घेतली होती. या शिवाय नुकताच संभाजीराजे यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन मराठा समाजातील तरुणांशी देखील संवाद साधला होता. आज जालना येथे अखिल भारतीय छावा संघटनेचे नानासाहेब जावळे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

संभाजी राजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणावर जहाल भूमिका घ्यावी, त्यांना आमचा पाठिंबा असेल, असे सांगतानाच त्यांनी कितीही मूक मोर्चे काढो किंवा आंदोलन करो, पण आपण मात्र तलवारी काढून, रस्त्यावर उतरूनच आरक्षण मिळवून दाखवू, असा इशारा दिला.

घटना दुरुस्ती करा, राज्याला अधिकार द्या..

मराठा आरक्षणावर मराठवाड्याचा दौरा करणारे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी देखील घटना दुरुस्ती करून आरक्षण देण्याचे अधिकार राज्याला देण्याची मागणी केली. ते जालना येथे पत्रकारांशी बोलत होते. जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या प्रश्नावर माणसांचा तीन तासांचा भरोसा नाही, तीन वर्षाचं काय सांगता, असे म्हणत यावर बोलणे टाळले. 

केंद्राने घटनादुरुस्ती करून मराठा समाजाला आरक्षण देण्याचे अधिकार राज्याला द्यावे. जोपर्यंत घटनादुरुस्ती होत नाही तोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणं कठीण असल्याचे जाधव म्हणाले. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या राजीनाम्यावर बोलण्यास त्यांनी नकार दिला.

Edited By: Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com