आरक्षणाच्या वटहुकूमासाठी सर्व खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार.. - He will meet the Prime Minister with all the MPs for the reservation ordinance. | Politics Marathi News - Sarkarnama

आरक्षणाच्या वटहुकूमासाठी सर्व खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार..

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 2 जुलै 2021

मागासवर्ग आयोगाकडून समाजाचे फेरसर्व्हेक्षण होणे आणि समाजाचा मागासवर्ग प्रवर्गात समावेशासाठी शिफारशीसह अभ्यासपूर्ण अहवाल सादर होणे गरजेचे आहे.

बीड : सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण रद्द केल्यानंतर केंद्र सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिकाही फेटाळली आहे. त्यामुळे आता मोठी कसोटी आहे, सर्वांनी पक्षविरहित एकत्र येऊन केंद्रापर्यंत आवाज पोचवावा लागेल. (He will meet the Prime Minister with all the MPs for the reservation ordinance.) आपण यासाठी नेतृत्व नाही तर पुढाकार घेणार असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत मराठा क्रांती मोर्चाच्या पुढाकाराने शुक्रवारी (ता. दोन) मराठा आरक्षण जनसंवाद झाला. (Bjp Mp Sambhaji Raje Chatrapati) यावेळी संभाजीराजे छत्रपती म्हणाले, समाजाला रस्त्यावर आणू नका, त्यांना वेठीस धरु नका. तुम्ही समाजासाठी काय करणार ते सांगा. आता केवळ राज्यपालांना पत्र देऊन उपयोग नसून मागासवर्ग आयोगाकडून समाजाचे फेरसर्व्हेक्षण होणे आणि समाजाचा मागासवर्ग प्रवर्गात समावेशासाठी शिफारशीसह अभ्यासपूर्ण अहवाल सादर होणे गरजेचे आहे.

केंद्राने वटहुकूम काढून घटनेत दुरुस्ती करावी. यासाठी सर्व खासदारांना एकत्र करुन आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहोत. यासाठी सर्वांनी पक्षभेद विसरुन एकत्र यावे. आपण नेतृत्व नाही तर पुढाकार घेत असल्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी नमूद केले. आरक्षणातून जे समाजाला मिळणार आहे, तितकेच सारथीच्या माध्यमातून मिळणार आहे. तरुणांनीही केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावांच्या घोषणा आणि माझ्यासोबत फोटो काढण्यापेक्षा सारथीच्या योजनांचा अभ्यास करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

सारथीला सहाशे कोटी रुपये मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. समाजाच्या मागण्यांसाठी पुढाकार घेणाऱ्यांचे स्वागत आहे, पण, त्यांनी पर्याय सांगावा, समाजाला वेठीस धरु नये.  मी चुकत असेल, खोटं बोलत असेल तर तेही सांगावे. 

हे ही वाचा ः तीन महिन्यांत लसीकरण करू शकलो, तर तिसऱ्या लाटेची भिती बाळगण्याची गरज नाही..

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख