मला डाॅक्टर बनवण्यासाठी त्यांनी खूप त्याग केला; डाॅ.कराडांच्या भगिनी गहिवरल्या..

लहान भावंडांना सक्षम व उच्चशिक्षित करण्यासाठी त्यांनी परदेशातील संधी सोडली.
मला डाॅक्टर बनवण्यासाठी त्यांनी खूप त्याग केला; डाॅ.कराडांच्या भगिनी गहिवरल्या..
Minister Dr.Karad -Sister Dr. Ujjwala Dahiphlae news Aurangabad

औरंगाबाद ः `अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत माझ्या भावाने शिक्षण घेतले. त्यांनी आयुष्यात खुप त्याग केला. ते खुप प्रामाणिक असुन आमच्यासाठी सर्वकाही आहेत. लहान भावंडांना सक्षम व उच्चशिक्षित करण्यासाठी त्यांनी परदेशातील संधी सोडली. (He sacrificed a lot to make me a doctor; While reminiscing, Dr. Karad's sisters) मला शिकवुन डॉक्टर बनविले. खुप खडतर परिस्थितीतून आम्ही समोर आलो` अशा शब्दांत केंद्रीय अर्थमंत्री  डॉ. भागवत कराड यांच्याबद्दल प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन असलेल्या  डॉ. उज्ज्वला दहिफळे यांनी भावना व्यक्त केल्या.

यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले, तेव्हा वहिनी डाॅ. अंजली कराड यांनी त्यांना सावरले. `आयएमए` व इतर डॉक्टरांतर्फे आयोजित डॉ. कराड यांच्या सत्कार कार्यक्रमात दहिफळे बोलत होत्या. (Dr. Ujjwala Dhiphlae, Aurangabad)  शिक्षणानेच आयुष्यात क्रांती होते, मी सातवीत शिक्षण घेत होते तेव्हा डाॅक्टर केईएम हॉस्पिटलला होते. तिथून ते आम्हाला खुशालीचे पत्र पाठवायचे. पत्रातील त्यांचे सुंदर हस्ताक्षर पाहून आम्ही ते गिरवण्याचा प्रयत्न करायचो.  

त्यांना परदेशात जाण्याच्या संधी आल्या, पण लहान बहिण- भावाला सक्षम बनवायचे ध्येय त्यांच्या डोळ्यासमोर होते.  वहिनी अर्थात डॉ. अंजली कराड यांनीही त्यांना भक्कम साथ दिली. (Central State Finanace Minister Dr.Bhagwat Karad) त्यामुळेच आम्ही आज इथवर पोहचू शकलो.सक्षम बनू शकलो. मी लेक्चरर म्हणुन घाटीच्या वैद्यकीय महाविद्यालयात रुजु झाले; तेव्हा डॉ. भागवत कराड यांच्या पत्नी डॉ. अंजली पदव्युत्तर शिक्षण घेत होत्या. त्यावेळी मी पाहायचे की डॉ. कराड त्यांना रोज महाविद्यालयात घ्यायला यायचे.

वहिनींचीही भक्कम साथ..

तेव्हा त्या म्हणायच्या की, दोन तास लवकर सोडा, घरी बाळ रडते आहे. महिलांच्या आयुष्यातील हा काळ एक परिक्षेचाच असतो. डॉ. कराड यांच्या यशस्वी राजकीय,सामाजिक, सांस्कृतिक व डाॅक्टरी पेशात त्यांच्या पत्नी आणि माझ्या वहिनींचा मोठा वाटा आहे. वैद्यकीय क्षेत्रापेक्षा राजकारणात मोठी संधी आहे, हे देखील दहिफळे यांनी आवर्जून सांगितले.

राजकारणातच जम बसव, असा सल्ला डॉ. कराड यांना त्यांच्या वर्गमित्राने दिला आणि तो डॉ. कराड यांनीही तंतोतंत पाळला. डॉ. कराड व त्यांच्या मित्रांनी आपल्या मनोगतात याचा उल्लेख केला.

Edited By : Jagdish Pansare

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in