मुख्यमंत्र्यांना दररोज माहिती देतो, कोरोना रुग्णांच्या बाबतीत हलगर्जीपणा नको..

जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत दररोज संपर्कात असून या बाबतचे अपडेट दररोज मुख्यमंत्र्यांना देण्यात आहेत.
Coroa Reviwer Meeting- Shivsena Mla Rahul Patil News Parbhani
Coroa Reviwer Meeting- Shivsena Mla Rahul Patil News Parbhani

 परभणी :  जिल्ह्यात  कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत परभणी शहरात आणि जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटर्समधे स्वच्छता ,पिण्याचे पाणी ,भोजन व्यवस्था ,ऑक्सिजन पुरवठा तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनचा मागणीच्या प्रमाणात  पुरवठा आदी बाबतीत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही ,असा इशारा शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील यांनी दिला.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत राहूल पाटील चांगेलच आक्रमक झाले होते. कोरोना सेंटरमधील असुविधा, औषधांचा तुटवडा या विरोधात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ओरड आहे. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी आरोग्य व प्रशान विभागाला रुग्णांच्या बाबततीत हलगर्जीपणा करू नका, असा स्पष्ट सूचना दिल्या.

जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, सह संपर्कप्रमुख विवेक नावंदर,  जिल्हा शल्यचिकित्सक बाळासाहेब नागरगोजे, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय कुंडेटकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, कोरोना टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर  कल्याण कदम आदी उपस्थित होते.

आमदार राहुल पाटील यांनी  कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. परभणी शहरातील सरकारी आणि खाजगी  कोविड सेंटरमध्ये रुग्णांना पुरवण्यात येणाऱ्या रेमीडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा व  त्याची चढ्या भावात होणारी विक्री, उपलब्ध बेडची संख्या, ऑक्सीजन सिलेंडरचा पुरवठा, भोजन व्यवस्था, याबाबतीत कुठलाही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला.

जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीबाबत  मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांच्यासोबत दररोज संपर्कात असून या बाबतचे अपडेट दररोज मुख्यमंत्र्यांना देण्यात आहेत. जिल्ह्यात सध्या इतर शस्त्रक्रियेसाठी  लागणाऱ्या रक्तपुरवठ्याच्या बाबतही या बैठकीत चर्चा झाली.

रक्तदान करण्यासाठी युवकांनी पुढे यावे असे आवाहन करतांनाच कोरोना रुग्णांच्या चाचणीचे अहवाल लवकरात लवकर प्राप्त होण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने पावले उचलावीत असेही आमदार राहुल पाटील यांनी यावेळी सुचवले. 

Edited By : Jagdish Pansare


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com