हर्षवर्धन जाधव यांना आता जालन्यातून लोकसभा लढवण्याची इच्छा.. - Harshvardhan Jadhav now wants to contest Lok Sabha from Jalna .. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी ८.३० वाजता आषाढी पौर्णिमा- धम्म चक्र दिवशी देशवासियांशी संबोधित करतील . मोदी यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.

हर्षवर्धन जाधव यांना आता जालन्यातून लोकसभा लढवण्याची इच्छा..

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 17 जून 2021

गेल्या पंचवीस वर्षापासून जालना लोकसभा मतदारसंघात दानवांचे राज्य आहे, जालनेकर याला कंटाळले असून त्यांना आता तिथे रामराज्य हवे आहे.

औरंगाबाद ः शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढवल्यानंतर आता जालन्यातून निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल करत त्यांनी ही आपली इच्छा व्यक्त केली. (Harshvardhan Jadhav now wants to contest Lok Sabha from Jalna) त्यांच्या या इच्छेमागे कारणही तसेच आहे. हर्षवर्धन जाधव यांचा उद्या वाढदिवस असल्यामुळे जालन्यातील अंबड चौफुली येथील चौकात त्यांना जालना लोकसभा मतदारसंघातून खास शुभेच्छा देणारा फलक लावण्यात आला आहे.

हा फलक पाहून जाधव भारावले आणि जालनेकरांची ही इच्छा आपण पुर्ण करण्याचा निश्चितच विचार करू असे त्यांनी जाहीर करून टाकले. (Ex.Mla Harshvardha Jadhav) सोशल मिडियावर आज जालना शहरातील एका चौकात हर्षवर्धन जाधव यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे एक पोस्टर झळकले. (Bjp Leader Raosaheb Danve) या पोस्टरवर संसदेचे चित्र असून त्यांना जालना लोकसभा मतदारसंघाच्या वतीने या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या पोस्टरवर शुभेच्छा देणाऱ्या ईशा झा या जाधव यांच्या मैत्रीणच आहेत. त्यामुळे हे पोस्टर जाधव यांच्या सांगण्यावरूनच तर लागले नाही ना? याची देखील दिवसभर चर्चा सुरू होती.

हर्षवर्धन जाधव यांना जेव्हा ही बाब कळाली तेव्हा त्यांना अत्यंत आनंद झाला. लगोलग त्यांनी सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल केला. जालना लोकसभा मतदारसंघात मला शुभेच्छा देणारे पोस्टर लावल्याचे पाहून मी गहिवरलो आहे. तुमच्या भावना मला समजल्या आहेत. गेल्या पंचवीस वर्षापासून जालना लोकसभा मतदारसंघात दानवांचे राज्य आहे, जालनेकर याला कंटाळले असून त्यांना आता तिथे रामराज्य हवे आहे. निश्चितच तुमच्या विचारांशी मी सहमत आहे, नक्कीच या दृष्टीने सकारात्मक विचार करेन, असा सूचक इशारा देत त्यांनी शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार मानले आहेत.

आधी औरंगाबाद, आता जालना..

जालना लोकसभा मतदारसंघातून गेल्या सलग पाच निवडणूकीत भाजपचे रावसाहेब दानवे हे मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले आहेत. दानवे हे सध्या केंद्रात राज्यमंत्री देखील आहेत. हर्षवर्धन जाधव व दानवे कुटुंबामध्ये सध्या वाद आहेत. या पार्श्वभूमीवर जाधव यांना शुभेच्छा देणारे पोस्टर जालन्यात लागणे आणि त्याला लोकांची इच्छा म्हणत निवडणूक लढवण्याचे भाष्य करणे यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

हर्षवर्धन जाधव यांनी २०१९ मध्ये औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. अनपेक्षित पणे पावणे दोन लाखांहून अधिक मते मिळवत त्यांनी शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांच्या पराभवात महत्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे आता जाधव खरंच २०२४ मध्ये जालन्यातून निवडणूक लढवणार का?  हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हे ही वाचा ः अजित पवारांचा उस्मानाबाद दौरा राहुल मोटेंचे हात बळकट करण्यासाठी?..

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख