हर्षवर्धन जाधव यांचा भरवसा नाही, बोलतील एक, करतील दुसरेच..

दहा वर्ष ते या मतदासंघाचे आमदार होते, तेव्हा पासून कन्नड तालुक्यातील जनतेला त्यांच्या या लहरीपणाची सवय झालेली आहे. राज्यात जरी या राजकीय संन्यासाची चर्चा होत असली तरी, दोन महिन्यांनी हर्षवर्धन जाधव नेमकी पुन्हा वेगळी भूमिका घेऊन अवरतले तर त्यात आश्चर्य वाटायला नको.
harshvardhan udaysing rajput news
harshvardhan udaysing rajput news

औरंगाबादः हर्षर्धन जाधव यांनी काल राजकारणातून निवृत्त होत असल्याची घोषणा सोशल मिडियाच्या माध्यमातून केली. पण अशा घोषणा करून प्रसिध्दीत राहण्याचा त्यांना सोसच आहे. तालुक्यातील जनतेचा त्यांच्यावर अजिबात विश्वास राहिलेला नाही. कारण बोलायचे एक आणि प्रत्यक्षात कृती मात्र त्याच्या विपरित करायची असे त्यांच्या बाबतीत अनेकदा घडले आहे. राजकीय संन्यास घेण्याच्या त्यांच्या निर्णयाकडे मी देखील फारसे गांभीर्यांने पाहत नाही, अशा शब्दांत शिवसेनेचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी आपले मत मांडले.

या निमित्ताने एक गोष्ट चांगली झाली, ती म्हणजे जाधव आणि त्यांच्या पत्नी पुन्हा एकत्र आले आहेत. वादविवाद प्रत्येकाच्या घरात असतात, पण मी त्याकडे राजकारण म्हणून पाहत नाही. जाधव त्यांच्या निर्णयावर ठाम राहतील की नाही? हा पुढचा प्रश्न राहिला, पण त्यांचे पत्नी संजना जाधव यांच्यासोबतचे संबंध सुधारले ही समाधानाची बाब म्हणावी लागेल असेही ते म्हणाले.

लोकसभा निवडुकीतील पराभवाला एक वर्ष पुर्ण झाल्याचा मुहूर्त साधत कन्नड-सोयगावचे माजी आमदार व मनसेचे जिल्हाध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांनी काल आपण राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. त्यांच्या या घोषणे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. भाजपचे केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांचे ते जावई असल्यामुळे त्यांच्या या ‘ राजकीय संन्यासा‘ची चर्चा राज्यभरात झाली. विशेष म्हणजे आपली राजकीय उत्तराधिकारी पत्नी संजना जाधव असतील असेही जाधव यांनी सांगून टाकले.

जाधव यांच्या या धक्कातंत्राबद्दल गेल्या अनेक विधानसभा निवडणुकीत त्यांच्या विरोधात निवडणूक लढवलेले आणि २०१९ मध्ये त्यांना पराभूत करणारे शिवसेनेचे विद्यमान आमदार उदयसिंग राजपूत यांनी संयमित प्रतिक्रिया दिली. ‘सरकारनामा‘शी बोलतांना राजपूत म्हणाले, हर्षवर्धन जाधव यांची ही घोषणा म्हणजे नवा स्टंट आहे, एक भूमिका घ्यायाची आणि काही दिवसांतच नेमक त्याच्या विरोधात वागायचे, कृती करायची अशीच त्यांची कार्यपध्दती राहिली आहे.

दहा वर्ष ते या मतदासंघाचे आमदार होते, तेव्हा पासून कन्नड तालुक्यातील जनतेला त्यांच्या या लहरीपणाची सवय झालेली आहे. राज्यात जरी या राजकीय संन्यासाची चर्चा होत असली तरी, दोन महिन्यांनी हर्षवर्धन जाधव नेमकी पुन्हा वेगळी भूमिका घेऊन अवरतले तर त्यात आश्चर्य वाटायला नको.

या सगळ्यामध्ये एक गोष्ट चांगली घडली, ती म्हणजे हर्षवर्धन जाधव व त्यांच्या पत्नी संजना या निमित्ताने एकत्र आले आहेत. आपल्या राजकीय उत्तराधिकारी म्हणून हर्षवर्धन यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली आहे. प्रत्येकाच्या घरात असतात तशा कुरबुरी माझ्याही घरात होत्या, पण आता त्या राहिल्या नाहीत, माझा संजना यांना पुर्ण पाठिंबा असेल, असे हर्षवर्धन यांच्या सोशल मिडियावरील निवेदनातच त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे कुणाच्याही आयुष्यात असे प्रसंग येऊ नये, ही माझी प्रामाणिक भावना आहे.

हर्षवर्धन यांचे कमबॅक आता नाहीच..

लोकसभा आणि कन्नड विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे हर्षवर्धन जाधव सध्या तणावात आहेत. दहा वर्ष आमदार राहिलेली व्यक्ती सलग झालेल्या दोन पराभवामुळे बिथरणे सहाजिक आहे. मी पंचवीस वर्ष तालुक्यात काम केले, तळागाळातील लोकांची कामे केली, तेव्ह मला जनतेने आमदार केले. मला मिळालेल्या संधीच सोनं करून पुढील पाच वर्षांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदारसंघातील लोकांनी अन्य पर्यायाचा विचारच करू नये असे काम मी करणार आहे. सध्या कुठल्याच निवडणुका नाहीत, त्यामुळे जाधव यांच्याकडून अधूनमधून असे प्रसिध्दीचे स्टंट केले जातील. इतरांसाठी ते नवे असले तरी आम्हाला याची आता सवय झाली आहे.

आज राजकीय संन्यास घेण्याची घोषणा आणि पत्नीला राजकीय उत्तराधिकारी घोषित करणारे हर्षवर्धन जाधव २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा स्वतः गुडघ्याला बाशिंग बाधून मैदानात उतरले तर नवल वाटणार नाही. पण मतदारसंघात केलेल्या कामाच्या जोरावर आणि जनतेच्या आशिर्वादाने आम्ही त्यांना पुन्हा कमबॅक करण्याची संधी कदापी देणार नाही, असा दावाही उदयसिंग राजपूत यांनी केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com