मी आहे तिथे सुखी; भविष्यात राज्यात अन् केंद्रात रासपची सत्ता आणणार.. - Happy where I am; In future, RSP will bring power in the state and at the center. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

मी आहे तिथे सुखी; भविष्यात राज्यात अन् केंद्रात रासपची सत्ता आणणार..

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 15 जून 2021

फक्त आम्ही तुमच्या सोबत आहोत, रासपला आमचा पाठिंबा आहे असे म्हणून चालणार नाही, तर मतदान करून आमदार, खासदार देखील निवडून द्यावे, लागतील.

जालना ः राष्ट्रीय समाज पक्ष हा सगळ्या समाजांचा पक्ष आहे, सध्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी राज्याचा दौरा करतो आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकांना अजून खूप वेळ असल्यामुळे सध्या तरी कुणासोबत जाण्याचा विचार केलेला नाही. (Happy where I am; In future, RSP will bring power in the state and at the center.) माझा पक्ष हा एनडीएचा भाग आहे, मी त्यांच्यासोबत सुखी आहे, असे सांगत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आपण भाजपसोबतच असलल्याचा निर्वाळा दिला.

भविष्यात राज्यात आणि केंद्रात आपल्याला रासपची सत्ता आणायची आहे, असेही ते म्हणाले. महादेव जानकर सध्या महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांचा दौरा करून पक्ष बांधणीचा आढावा घेत आहेत. (Rashtriy Samaj Paksh President Mahadev Jankar) आज जालना जिल्ह्यातील अंबड येथे ते आले होते. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर जानकर यांनी आपला दौरा आणि राज्यातील मराठा आरक्षण व इतर विषयावर पत्रकारांशी चर्चा केली.

महादेव जानकर म्हणाले, राज्यात कोरोनाची परिस्थिती वाईट होती, पण या काळात उद्धव ठाकरे सरकारने चांगले काम केले. (Maratha, Obc Rservation) उगाच टीका करायची म्हणून करणार नाही, जे चांगले आहे त्याला चांगल म्हटंल पाहिजे. (Dhngar Arakshan) सध्या कुठल्याही निवडणूका नसल्यामुळे माझ्या पक्षाची ताकद कशी वाढेल या दृष्टीने मी दौरा करतो आहे. राष्ट्रीय समाज पक्ष हा सगळ्या समाजांना, जातीच्या लोकांना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे. सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेतून आम्ही वाटचाल करतो आहे.

मराठा, धनगर, ओबीसी आरक्षणासह इतर प्रश्न सोडवायचे असतील तर त्यासाठी राज्यात आणि केंद्रात देखील आमच्या पक्षाची सत्ता यावी लागेल. विधानसभेत आमदार आणि लोकसभेत रासपच्या खासदारांची संख्या वाढल्याशिवाय प्रश्न सुटणार नाहीत. त्यामुळे फक्त आम्ही तुमच्या सोबत आहोत, रासपला आमचा पाठिंबा आहे असे म्हणून चालणार नाही, तर मतदान करून आमदार, खासदार देखील निवडून द्यावे, लागतील असे आवाहन जानकर यांनी यावेळी केले.

बिहार, उत्तर प्रदेशात रासपाने स्वबळावर उमेदवार दिले होते, याचा उल्लेख करत सध्या मी एनडीएचा भाग आहे, रासप भाजप सोबतच आहे आणि आम्ही आहे तिथे सुखी आहोत. त्यामुळे सध्या तरी कुणासोबत युती किंवा आघाडी करण्याचा विषय नाही. पक्षाची ताकद वाढवणे हा एकमेव उद्देश घेऊन मी व माझे कार्यकर्ते काम करत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मराठा आरक्षणाला पाठिंबा..पण..

मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा आहे, या समाजातील गोरगरिबांना शैक्षणिक आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळाले पाहिजे, पण ते देत असतांना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये अशी आपली भूमिका असल्याचे जानकर म्हणाले. केवळ मराठाच नाही, तर ब्राम्हण, मुस्लिम, धनगर या सगळ्याच समाजातील गरीबांना आरक्षण मिळावे, हीच आमची भूमिका आहे. ओबीसी आणि धनगर आरक्षणासाठी समाजाने गाफील न राहता आक्रमक भूमिका घेतली पाहिजे, तरच ते शक्य असल्याचे जानकर म्हणाले.

हे ही वाचा ः मराठा आरक्षणासाठी प्रकाश आंबेडकर उतरणार मैदानात..

Edited By : Jagdish Pansare
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख