On Guru Poornima, the MLA was overwhelmed by the coincidence of Maharaj's appearance | Sarkarnama

गुरूपौर्णिमा,अन योगायोगाने महाराजांचे दर्शन झाल्याने आमदार भारावले..

जगदीश पानसरे
रविवार, 5 जुलै 2020

राजकारणतील मंडळींनी आपापल्या नेत्यांना सोशल मिडियाच्या माध्यमातून आणि ज्यांना शक्य आहे, त्यांनी प्रत्यक्ष भेटून  गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आणि आशिर्वादही घेतले. शिवसेनेचे कन्नड-सोयगांवचे आमदार उदयसिंग राजपूत यांच्या नशिबातही आज गुरुदर्शनाचा असाच अचानक योग आला.

औरंगाबादः शिवसेनेचे आमदार उदयसिंग राजपूत आज मतदारसंघात दौऱ्या निमित्त जात असतांना त्यांना रस्त्यातच अचानक गौताळ्याच्या महाराजांचे दर्शन घडले. मोटारसायकलवरून महाराज जात असतांना दिसताच राजपूत यांनी चालकाला गाडी थांबवायला सांगितली. खाली उतरून रस्त्यावरच महाराजांचे पाय धरले आणि त्यांचे आशिर्वाद घेतले. गुरुपौर्णिमा आणि योगायोगाने स्वामी केवलानंद महाराजांची झालेली भेट हा दुग्धशर्करा योग जुळून आल्याने आमदार राजपूत चांगलेच भारावले. 

आज गुरूपौर्णिमा, पण कोरोनाचे वाढते संकट, रुग्ण आणि बांधिताची संख्या यामुळे शहरात व काही ग्रामीण भागात दिवसा व रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मंदिर आणि धार्मिक स्थळे अजूनही बंदी असल्याने याचे सावट निश्चितच गुरूपौर्णिमेवर देखील उमटले आहे.

राजकारणतील मंडळींनी आपापल्या नेत्यांना सोशल मिडियाच्या माध्यमातून आणि ज्यांना शक्य आहे, त्यांनी प्रत्यक्ष भेटून  गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आणि आशिर्वादही घेतले. शिवसेनेचे कन्नड-सोयगांवचे आमदार उदयसिंग राजपूत यांच्या नशिबातही आज गुरुदर्शनाचा असाच अचानक योग आला.

वीस वर्षापासून राजकारणात असललेल्या राजपूत यांनी अनेकदा विधानभा निवडणुका लढवल्या. अपक्ष आणि राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाकडून त्यांनी नशीब आजमावले, पण थोडक्या मतांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला. पण २०१९ च्या विधानसभा निवडणुकीने राजपूत यांच्या यशाचा मार्ग खुला झाला आणि वीस वर्षानंतर ते विधानसभेत आमदार म्हणून पोहचले. निवडूण आल्यानंतर काही महिने उलटत नाही तोच राज्यात कोरोनाचे संकट आले. त्यामुळे खऱ्या अर्थाने नव्याने निवडूण आलेल्या लोकप्रतिनिधींसाठी हा कसोटीचा काळ ठरत आहे.

संकटात सापडलेल्या गोरगरीब, गरजू आणि मतदारसंघातील सर्वसामान्यांना मदतीचा हात देत असतांनाच विकासकामासाठी दहा कोटींचा निधी आणत राजपूत यांनी आपली निवड सार्थ ठरवल्याचे दिसून आले. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक कर्ज मिळवून देण्यासाठी देखील उदयसिंग राजपूत पाठपुरावा करत आहेत.

दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील राजूपत यांच्याशी सातत्याने संपर्क करून ‘ लोकांना काहीही कमी पडू देऊ नका‘ अशा सूचना दिल्या होत्या. आज गुरूपौर्णिमे निमित्त उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची इच्छा देखील राजपूत यांना होती, पण कोरोनामुळे ती शक्य नव्हती.

पण गुरू दर्शनाची तीव्र इच्छा असल्याने त्यांना आज मतदारसंघात फिरत असतांना गौताळा रस्त्यावर श्री स्वामी केवलानंदजी महाराज यांची भेट व दर्शन घडलेच. एका शिष्यासोबत महाराज मोटारसायकलने जात असल्याचे राजपूत यांनी पाहिले. त्यांनी तात्काळ चालकाला गाडी थांबवयाला सांगितली आणि महाराजांना हाक मारली. रस्त्यावरच या गुरू-शिष्यांची भेट झाली. उदयसिंग राजपूत यांनी महाराजांचे पाय धरत त्यांना आदरपुर्वक नमस्कार केला, आणि त्यांचे आशिर्वाद घेतले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख