पालकमंत्री विना मास्क बैठक घेतात ; आम्ही चर्चेसाठी गेलो तर गुन्हा ?

" परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी १७ जूलै रोजी परभणीत येवून अधिकाऱ्यांसोबत कोरोना आढावा बैठक घेतली. तसेच त्यानंतर पत्रकारांशीही संवाद साधला. या दोन्ही वेळेला पालकमंत्र नवाब मलिक यांनी मास्क घातला नव्हता. तो गुन्हा नाही का ? आम्ही जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांची परवानी घेवूनच गेलो होतो तर आम्ही गुन्हेगार ठरतो.. हा अजबच कारभार आहे"
bjp ex mla statment news parbhani
bjp ex mla statment news parbhani

परभणी ः  आम्ही जनतेच्या प्रश्नासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीने  जिल्हाधिकारी कार्यालयात गेलो होतो. सोयाबीन व लॉकडाऊन हे प्रश्न आम्ही जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडले. आम्ही सोशल डिस्टसिंगचे पालन केले, कोणतीही घोषणाबाजी केली नाही, असे असतांना आमच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. मग पालकमंत्री नवाब मलिक यांनी विना मास्क दिवसभर बैठका घेतल्या तो गुन्हा ठरत नाही का ? असा सवाल भाजपचे प्रदेश प्रतिनिधी माजी आमदार अॅड. विजयराव गव्हाणे यांनी केला.

माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली १७ जुलै रोजी भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांना निवेदन दिले होते. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेश प्रतिनिधी अॅड.विजयराव गव्हाणे यांच्यासह जिल्ह्यातील इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते. या निवेदनामुळे बबनराव लोणीकर यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर शहरातील नवामोंढा पोलिस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लघंन केले म्हणून भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. यावर माजी आमदार अॅड. विजयराव गव्हाणे यांनी संताप व्यक्त केला. आम्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. तसेच लॉकडाऊन उठवावे ही व्यापाऱ्यांची मागणी घेवून जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो. त्यांना भेटण्याच्या आगोदर आम्ही निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्याशी फोनवरून जिल्हाधिकाऱ्यांची वेळ ही घेतली होती.

जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीनेच आम्ही त्यांची भेट घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेलो होतो. परंतू त्यानंतर छायाचित्राच्या आधारे पोलिसांनी जमावबंदीच्या आदेशाचे उल्लघंन केल्या प्रकरणी आमच्यावर गुन्हेे दाखल केले. पण परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी १७ जूलै रोजी परभणीत अधिकाऱ्यांसोबत कोरोना आढावा बैठक घेतली.

तसेच त्यानंतर पत्रकारांशीही संवाद साधला. या दोन्ही वेळेला त्यांनी मास्क घातला नव्हता. मग तो गुन्हा नाही का? असा प्रश्न गव्हाणे यांनी उपस्थित केला. आम्ही जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांची परवानी घेवूनच गेलो होतो, तर आम्ही गुन्हेगार ठरतो.. हा अजबच कारभार आहे. असेही गव्हाणे म्हणाले.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com