कोरोनाच्या लढ्यात पालकमंत्र्यांचे फारशे योगदान नाही...

पालकमंत्री म्हणून त्यांचे या कोरोनाच्या लढ्यात फारशे योगदान दिसत नाही. स्थानिक पातळीवर जनतेला संकटाच्या काळात दिलासा, आधार देण्यासाठी पालकमंत्र्यांनी फिरले पाहिजे, पण ते बाहेरच पडत नाही. त्यामुळे जनतेचा अपेक्षाभंग झाला आहे.
sambhaji patil nilangekar news
sambhaji patil nilangekar news

निलंगाः लातूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, डॉक्टर, पोलिस, आरोग्य सेवक, कर्मचारी व सर्वच अधिकारी ज्या पद्धतीने नियोजन करत आहेत, मेहनत घेत आहेत त्याला तोड नाही. पण ज्यांच्यावर राज्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी आहे ते वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख मात्र या कोरोना लढ्यात कुठेच दिसले नाही. कोरोनाच्या संकटात प्रशासन आपले पुर्णपणे योगदान देत असतांना पालकमंत्र्यांचे यात फारशे योगदान नसल्याची टिका, माजीमंत्री भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगकर यांनी केली आहे. 

जिल्ह्यात व राज्यात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संभाजी पाटील निलंगेकर यांनी एका फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपली विविध विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली. युती सरकारच्या काळात आपण मंत्री असतांना जिल्ह्यात व राज्यात केलेल्या विकासकामांचा उहापोह देखील त्यांनी या निमित्ताने  केला.

संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे निष्क्रिय आहे,  कोरोना महामारीच्या संकटा काळात देखील ते गंभीर नाही. त्यामुळेच देशात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या ही महाराष्ट्रात आहे. आपलेच निर्णय २४ तासात पुन्हा बदलणारे हे सरकार आहे. सध्याची परिस्थिती अतिशय वाईट आहे, ग्रामीण भागातील परिस्थिती हाताबाहेर गेली तर सावरणे कठीण होणार आहे.

लातूर जिल्ह्यातील डॉक्टर, पोलीस, आरोग्य सेवक, कर्मचारी यांच्या कामाला व प्रशासनातील अधिकाऱ्याच्या नियोजनाला तोड नाही. प्रशासनातील अधिकारी हे काम अतिशय चोखपणे पार पाडत आहेत, परंतु पालकमंत्री म्हणून त्यांचे या कोरोनाच्या लढ्यात फारशे योगदान दिसत नाही. स्थानिक पातळीवर जनतेला संकटाच्या काळात दिलासा, आधार देण्यासाठी पालकमंत्र्यांनी फिरले पाहिजे, पण ते बाहेरच पडत नाही. त्यामुळे जनतेचा अपेक्षाभंग झाला आहे. 

लातूर जिल्ह्यातील जनतेने भरभरून प्रेम दिले असून भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात नगरपालिका, पंचायत समिती, महानगरपालिका, जिल्हा परिषद अशा अनेक स्थानिक स्वराज संस्था ताब्यात दिल्या आहेत.  कोरोना सारख्या संकट काळात आपण जनतेच्या सोबत आहोत. लातूर जिल्हा दुष्काळ मुक्त करण्यासाठी शासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. शिवाय लातूर जिल्हा शैक्षणिक दृष्टीने महत्त्वाचे केंद्र आहे, त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्यासाठी शासनाने प्रयत्न करायला हवेत, अशी अपेक्षाही निलंगेकर यांनी व्यक्त केली.

गडकरींनी आठ हजार कोटी दिले..

केंद्रीय मंत्री आणि आमचे ज्येष्ठ नेते नितिन गडकरी यांनी  विविध योजनेच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यासाठी आठ हजार कोटीचा निधी दिला आहे. यापुढेही या भागातील शेतकऱ्यांना शेती प्रक्रिया उद्योग करण्यासाठी केंद्रीय पातळीवरील उद्योग उभारण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. बोलण्यापेक्षा काम करण्यावर आपला भर असतो, टीका करण्याचे काम तेच असते पण आपण मात्र सर्वसामान्यांना निवडणूक काळात दिलेली आश्‍वासने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

जनतेने आपल्याला त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडूण दिले आहे. त्यामुळे ते सुटे पर्यंत झोप लागता कामा नये, सर्वच लोकप्रतिनिधींनी त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. गाव सुरक्षा स्वास्थ्य संकल्प आभियान आपण जिल्हाभर राबवले असून काळजी घेतली तर असुरक्षित असणारे खेडे सुरक्षित राहतील असे त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यकर्त्यांसाठी काम करण्याची प्रेरणा आपल्या मातोश्री माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर यांच्याकडून मिळते. त्या सतत कामाबाबत जनतेच्या प्रश्नाबाबत जागरूक राहण्याचा सल्ला देत असतात. जनतेच्या मनामध्ये आपण प्रेमातून घर केले आहे.  रेल्वे बोगी निर्मितीचा कारखाना असो, की जिल्ह्यातील पाणीप्रश्न असो असे अनेक समस्या आपण सोडविण्यासाठी प्रयत्न करतो, जनतेने जबाबदारी दिली आहे आपण जर झोपत राहीलो तर प्रश्न कसे सुटतील, असा टोलाही संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी लगावला. 

माझ्या भावावर अन्याय झाला..

राजकारणामध्ये लोकांसाठी प्रामाणिकपणे काम करत असतांनाही माझे बंधु अरविंद पाटील यांच्यावर अन्याय झाल्याचा आरोप निलंगेकर यांनी केला. कारण जनता माझ्यापेक्षा त्यांना जास्त पसंत करते. तरी कोणीतरी झिजलं पाहिजे या भानवेतून ते पक्षाचे काम प्रामाणीकपणे करत आहेत. ते स्वतःच्या कर्तुत्वावर मोठे होतील आणि जनतेने त्यांना सांभाळांव असे, भावनिक आवाहन करतांनाच तो फार स्वाभिमानी आहे, कुठल्याही कामासाठी माझ्या नावाचा वापर करत नाही असेही निलंगेकरांनी सांगतिले. माझा कार्यक्रम उपयोग करीत नाही असे त्यांनी यावेळी सांगितले. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com