राज्यपालांच्या मराठवाडा दौऱ्यावर पालकमंत्र्यांचा बहिष्कार..

भविष्यातमहाविकास आघाडी सरकार विरुद्ध राज्यपाल यांच्या संघर्षाला अधिक धार चढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Gardiuan  Minister Boycott Governors tour In Marathwada news
Gardiuan Minister Boycott Governors tour In Marathwada news

नांदेड ः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा मराठवाडा दौरा आजपासून सुरू झाला. तीन दिवसांच्या या दौऱ्यात ते नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहे. राज्यपालांच्या या दौऱ्यामुळे राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष पुन्हा उडाला आहे. राज्यपाल राज्यात समांतर यंत्रणा काम करत असल्याचे भासवत आहेत. (Guardian Minister boycotts Governor's visit to Marathwada) संबंधित जिल्ह्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्याच्या निर्णयावर राज्य सरकारने तीव्र नापंसती दर्शवली होती. त्यानंतर राज्यपालांच्या या दौऱ्यातून बैठकांचा कार्यक्रम रद्द केल्याचे देखील बोलले जाते. मात्र असे असले तरी राज्यपालांच्या दौऱ्यावर तीनही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांनी बहिष्कार टाकल्याचे समोर आले आहे.

नांदेडमध्ये आज राज्यपालांच्या दौऱ्यात पाकमंत्री अशोक चव्हाण हे गैरहजर होते. परभणी दौऱ्यात नवाब मलिक आणि हिंगोलीच्या दौऱ्यात वर्षा गायकवाड या देखील राज्यपालांच्या स्वागताला हजर राहणार नसल्याचे समजते. (Governor Bhgatsingh Koshyari, Maharashtra) एकंदरित राज्यपाल कोश्यारींच्या या तीन जिल्ह्यांच्या दौऱ्यावर राज्य सरकारने अघोषित बहिष्कार टाकल्याचे दिसते. ( Gardiuan Minister Ashok Chavan, Nawab Malik, Varsha Gaikwad) वादाच्या पार्श्वभूमीवर आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे नांदेडमध्ये आगमन झाले. अल्पसंख्याक विभागाकडून उभारण्यात आलेल्या मुला-मुलींच्या वसतीगृहाचे उद्घाटन आज त्यांच्या हस्ते करण्यात आले.

तत्पुर्वी मुंबईत काल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राज्यपालांच्या नांदेड, हिंगोली आणि परभणी दौरा आणि त्या दरम्यान प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन आढावा घेण्याच्या प्रकारावर नाराजी व्यक्त केली होती. राज्यात दोन समांतर यंत्रणा कार्यरत असल्याचे भासवण्याचा हा राज्यपालांचा प्रयत्न आहे का? असा सवाल देखील मलिक यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर मलिक पालकमंत्री असलेल्या परभणीत राष्ट्रवादीने राज्यपालांनी प्रोटोकाॅल मोडून राजकीय पक्षांप्रमाणे बैठका घेऊ नये, अन्यथा काळे झेंडे दाखवू, असा इशारा दिला आहे.

सरकारही आक्रमक..

राज्यातील महाविकास आघाडी सरकार व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील वाद आणि संघर्ष काही केल्या संपतांना दिसत नाहीये, उलट तो वाढतांनाच दिसतो आहे. विधान परिषदेच्या बार आमदारांच्या नियुक्त्या असो की मग राज्यातील इतर प्रश्न, कोश्यारी यांनी नेहमीच राज्य सरकारला खडेबोल सुनावले आहेत. राज्य सरकारला नेहमीच पाण्यात पाहणाऱ्या आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्या प्रमाणे वागणाऱ्या राज्यपालांना सरकारने देखील जशा तसे उत्तर देण्याची भूमिका घेतल्याचे दिसते आहे.

त्यामुळेच राज्यपालांच्या नांदेड, परभणी आणि हिंगोली दौऱ्यात अनुक्रमे अशोक चव्हाण, नवाब मलिक आणि वर्षा गायकवाड हे तीनही पालकमंत्री गैरहजर राहणार असल्याचे बोलले जाते. त्यामुळे भविष्यात महाविकास आघाडी सरकार विरुद्ध राज्यपाल यांच्या संघर्षाला अधिक धार चढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com