पंचनाम्याचे कागदी घोडे न नाचवता शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या....

शेतकऱ्यांना मदत करण्याची आघाडी सरकारकडे इच्छाच नाही.
Bjp Mla Haribhau Bgde News Aurangabad
Bjp Mla Haribhau Bgde News Aurangabad

औरंगाबाद ः मराठवाड्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्ग उद्ध्वस्त झाला असून राज्य सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रु. मदत द्यावी, अशी मागणी भाजप आमदार हरिभाऊ बागडे  यांनी केली आहे.(The government should give Rs 50,000 per hectare to the farmers without dancing the paper horses of Panchnama)

मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीवेळी राज्य सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोचलीच नाही. (Bjp Mla Haribhau Bagde, Aurangabad) या वर्षी तरी आघाडी सरकारने पंचनाम्यासारखे कागदी घोडे नाचवत न ठेवता शेतकऱ्यांपर्यंत थेट मदत पोचवावी आणि या संकटातून शेतकऱ्यांना सावरावे, असेही बागडे म्हणाले.

मराठवाड्यात गेल्या पंधरवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. खरीपाचे पीक शंभर टक्के वाया गेले, तर सोयाबीन , कापूस ही पिके हातची गेली, ऊसह आडवा झाला आहे. (Chief Minister Uddhav Thackeray) अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला, पूर स्थितीमुळे जमिनी खरवडून गेल्या आहेत.

अशा संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी राज्य सरकारने हेक्टरी ५० हजार  एवढी मदत तातडीने करण्याची गरज आहे.  मागच्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीनंतर जाहीर केलेले  अनुदानाचे पैसे,  पीक विमाही शेतकऱ्यांना मिळाला नाही. मराठवाड्यात पाच-सहा मंत्री असुन एखाद दुसरा अपवाद वगळता एकही मंत्री अद्याप शेतकऱ्यांच्या नुकसानीची माहिती घेण्यासाठी बाहेर पडल्याचे दिसले नाही, असा आरोप देखील बागडे यांनी केला.

दहा दिवसात मराठवाड्यात सर्व जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे प्रचंड नुकसान झालेले आहे.  प्राथमिक अंदाजानुसार लाखो हेक्टरवरची पिके पाण्याखाली गेली. लहान मोठी शेकडो जनावरे दगावली आहेत. अनेक पक्की घरे पडली आहेत. एवढी भयानक परिस्थिती मराठवाड्याने आजवर कधीच अनुभवली नव्हती. खरे तर ही परिस्थिती पाहता राज्य सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मदत द्यायला हवी होती.

मात्र शेतकऱ्यांना मदत करण्याची आघाडी सरकारकडे इच्छाच नाही, असा आरोप देखील बागडे यांनी केला. मराठवाड्याच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी पंचनामे, नुकसानीच्या अहवालांची वाट न पाहता मदत जाहीर करावी, अन्यथा भाजप शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरेल, असा इशारा देखील त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

Edited By : Jagdish Pansare


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com