गोरठेकरांची राष्ट्रवादीत घरवापसी; खासदार चिखलीकरांना धक्का..

आपले संपुर्ण राजकीय जीवन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये काढलेल्या गोरठेकरांचे भाजपमध्ये फारकाळ मन रमले नाही.
गोरठेकरांची राष्ट्रवादीत घरवापसी; खासदार चिखलीकरांना धक्का..
Bjp Leader Gorthekar Back in Ncp News Nanded

नांदेड ः विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये गेलेले आणि भोकरमधून निवडणूक लढलेले बापूसाहेब गोरठेकर यांची घरवापसी झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत गोरठेकरांनी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला. (Gorthekar returns home to NCP; MP Chikhalikar pushed by Daji) विशेष म्हणजे त्यांच्या या प्रवेशासाठी शेकापचे आमदार तथा भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे भावजी श्यामसुंदर शिंदे यांनी पुढाकार घेतल्याचे बोलले जाते.

गोरठेकरांना भाजपमधून पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश करायला लावून शिंदे यांनी मेहुण्याला धक्का दिल्याची चर्चा या निमित्ताने राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. (Ncp Leader Ajit Pawar) दोन वर्षांपूर्वी भाजपवासी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. (Mla Sahaymsunder Shinde Kandhar-loha Nanded) मागील विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी गोरठेकरांना राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आणले होते.

गोरठेकरांना अशोक चव्हाण यांच्या विरोधात उमेदवारीही देण्या आली होती.  गोरठेकर यांना निवडून आणून अशोक चव्हाण यांना राजकीय शह देण्याचा चिखलीकरांचा प्रयत्न  मात्र फसला होता. अशोक चव्हाण विजयी झाल्याने चिखलीकर तोंडघशी पडले होते. दरम्यानच्या काळात गोरठेकर अडगळीत पडल्याचे चित्र होते.  

आपले संपुर्ण राजकीय जीवन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये काढलेल्या गोरठेकरांचे भाजपमध्ये फारकाळ मन रमले नाही. त्याचीही अवस्था हेरून त्यांना पुन्हा राष्ट्रवादीत आणण्याचे प्रयत्न सुरू झाले होते.  एकेकाळी शरद पवार यांचे विश्वासू अशी गोरठेकर यांची ओळख होती.  मात्र, निवडणूकीत भाजपशी घरोबा केलेल्या गोरठेकरांना भाजपचे खासदार चिखलीकर यांचे दाजी आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी पुन्हा राष्ट्रवादीच्या वाटेवर नेऊन सोडण्यात महत्वाची भूमिका बजावली.

त्यामुळे मेव्हणे आणि दाजी यांच्यामधील राजकीय दरी आणखी वाढणार असे दिसते. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे नांदेड दौऱ्यावर आले असता श्यामसुंदर शिंदे यांच्या निवासस्थानी त्यांनी चहापान घेतले होते.  त्यावेळी शिंदे यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याचे सांगितले होते. मात्र तुर्तास त्यांनी आपला राष्ट्रवादीतील प्रवेश टाळला असला तरी गोरठेकरांच्या प्रवेश कार्यक्रमात शिंदे अवर्जून उपस्थित होते.

राजकीय समीकरणं बदलणार..

आगामी विधानसभा निवडणुकीत श्यामसुंदर शिंदे यांच्या कंधार- लोहा तालुक्यातील मतदार संघातून भाजप खासदार चिखलीकर यांची मुलगी प्रणिता देवरे आणि मुलगा प्रविण पाटील प्रतिस्पर्धी राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी मेव्हणे चिखलीकर यांना धक्का दिल्याची दिसून आले आहे. गोरठेकर आज मुंबईत आहेत ते नांदेडला आल्यानंतरच त्यांच्या घरवापसी मागची भूमिका स्पष्ट होणार आहे.

दरम्यान उमरी, धर्माबाद आणि नायगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीला काही महिन्यांचा अवधी असतानाच  गोरठेकर यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिल्याने चिखलीकर यांना हा मोठा राजकीय धक्का असल्याचे बोलले जाते.  विशेष म्हणजे भाजपाचे आमदार राजेश पवार, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांच्यासाठीही गोरठेकरांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवेश हा आगामी काळात अडचणीत आणणारा ठरणार आहे. 

Edited By : Jagdish Pansare
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in