सातव यांना खासदार करण्यात गोपीनाथ मुंडेचा हातभार - Gopinath Munde's contribution in making Satav an MP | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी ८.३० वाजता आषाढी पौर्णिमा- धम्म चक्र दिवशी देशवासियांशी संबोधित करतील . मोदी यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.

सातव यांना खासदार करण्यात गोपीनाथ मुंडेचा हातभार

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 17 मे 2021

नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप, शिवसेनेच्या नेत्यांच्या मोठ्या सभा होऊन देखील हिंगोलीत राजीव सातव यांनी मोदी लाट रोखली.

हिंगोली ः काॅंग्रेसचे राज्यसभेतील खासदार राजीव सातव यांचे अवध्या ४७ व्या वर्षी निधन झाले आणि मराठवाड्यातील एक उमदे आणि तरूण नेतृत्व लोप पावले. देशाच्या राजकारणात आपल्या कामाचा ठसा उमटवत असतांना त्यांचे अचनाक जाणे केवळ काॅंग्रेसच नाही तर इतर राजकीय पक्षांना देखील धक्का देणारे ठरले. (Gopinath Munde's contribution in making Satav an MP) त्यांच्या निधनानंतर सर्वपक्षीय राज्य व देश पातळीवरील नेत्यांच्या प्रतिक्रिया बघता सातव यांची व्याप्ती किती दूरपर्यंत होती याचा अंदाज येतो.

मराठवाड्यातील हिंगोली सारख्या जिल्ह्यातील मसोड सारख्या छोट्या गावातून थेट दिल्ली व देशाच्या इतर राज्यात देखील सातव यांनी काम केले. महाराष्ट्रात व मराठवाड्यातील इतर राजकीय नेत्यांशी सातव यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. याचा फायदा त्यांना २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत झाल्याचे बोलले जाते.(Hingoli district has a large Vanjari community.) हिंगोली जिल्ह्यात वंजारी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. शिवाय देशात मोदी लाट असल्यामुळे तिथे युतीचा उमेदवार निवडून येणार हे निश्चित मानले जात होते. 

एवढेच नाही तर नांदेडमधून देखील अशोक चव्हाण यांचा धक्कादायक पराभव होणार हे भाकित आधीच वर्तवण्यात आले होते. परंतु हिंगोलीत भाजप व शिवसेनेला धक्का देणारा निकाल लागला. नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप, शिवसेनेच्या नेत्यांच्या मोठ्या सभा होऊन देखील हिंगोलीत राजीव सातव यांनी मोदी लाट रोखली. एवढेच नाही तर त्यावर स्वार होत दिमाखदार विजय देखील मिळवला. (In Hingoli, Rajiv Satav stopped the Modi wave.) हा चमत्कार कसा घडला याबाबत जिल्ह्यात निरनिराळ्या चर्चा अजूनही होत असतात.

दीड हजार मतांनी विजय..

शिवसेनेचे उमेदवार सुभाष वानखेडे यांचा सातव यांनी अवघ्या पंधराशे मतांनी पराभव केला होता. नांदेडमध्ये नरेंद्र मोदी यांची रेकाॅर्डब्रेक सभा झालेली असतांना हिंगोलीत काॅंग्रेसने मिळवलेला विजय त्या पक्षासाठी बुस्टरडोस ठरला तर युतीच्या नेत्यांना आत्मचिंतन करायला लावणारा. (Gopinath Munde had great influence in Marathwada and Vanjari-dominated Hingoli districts, but Munde did not campaign there.) हिंगोलीत युतीचे उमेदवार म्हणून वानखेडे यांच्या प्रचाराला दिग्गज नेते आले. पण ज्या गोपीनथ मुंडे यांचा मराठवाडा व वंजारी बहुल हिंगोली जिल्ह्यात मोठा प्रभाव होता, ,ते मुंडे मात्र तिथे प्रचाराला आले नाही. 

गोपीनाथ मुंडे यांची हिंगोलीत एकही सभा होऊ नये याचे आश्चर्य त्यावेळीही व्यक्त केले गेले. परंतु सातव आणि मुंडे घराण्याचे जिव्हाळ्याचे संबंध आणि एक तरूण नेतृत्व देशाच्या राजकारणात पुढे गेले पाहिजे या भावनेतू तेव्हा गोपीनाथ मुंडे यांनी सातव यांना थेट नाही पण अप्रत्यक्ष मदत केल्याचे दिसून आले होते. (Gopinath Munde was seen helping Satav not directly but indirectly.)  मुंडे यांनी हिंगोलीत सभा घेतली असतील तर त्याचा फायदा निश्चितच युतीच्या वानखेडे यांना झाला  असता आणि ते विजयी झाले असते हे स्पष्ट होते.

मुंडे-सातव जिव्हाळ्याचे संबंध

लोकसभा निवडणुकीत पंधराशे मतांनी मिळालेला विजय हो मोठा विजय समजला जात नाही. पण या निसटत्या विजयानेच पुढे सातव यांना देशाच्या राजकारणात अनेक संधी मिळाल्या. राहुल गांधी यांचा प्रचंड विश्वास सातव यांच्यावर होता. त्यांच्या सांगण्यावरूनच सातव यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीत प्रभारी म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. त्यासाठी सातव यांनी २०१९ ची लोकसभा देखील लढवली नाही. पण पुढे राज्यसभेवर घेत राहुल गांधी यांनी सातव यांच्यावरील विश्वास कायम असल्याचे दाखवून दिले होते. 

सातव यांच्या निधनानंतर भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत देखील मुंडे साहेंबाचा लाडका राजीव असा त्यांचा उल्लेख केला होता. एक सुशिक्षित तरुण नेतृत्व देशाच्या राजकारणात पुढे आले पाहिजे अशी मुंडे साहेंबाची देखील इच्छा होती, असेही त्यांनी आपल्या शोक संदेशातून सांगितले. या निमित्ताने हिंगोलीतून लोकसभेवर ते ही मोदी लाटेत निवडून गेलेल्या सातव यांच्या विजयाची पुन्हा आठवण झाली. 

हे ही वाचा ः युवकांच्या ह्दयातील नेता गमावला, काॅंग्रेसची न भरून येणारी हानी..

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख