अशाने शेतकरी स्वावलंबी होणार आहे का? शिवसेना खासदार राजेनिंबाळकरांचा मोदींना सवाल.. - Is this going to make the farmer self-sufficient? Shiv Sena MP Rajenimbalkar questions Modi .. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

भाजपचे किरीट सोमय्या अखेर महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला रवाना
चरणजीत चन्नी होणार पंजाबचे नवे मुख्यमंत्री राज्याचे प्रभारी हरीश रावत यांची घोषणा
गणेशोत्सव विसर्जनामुळे पुण्यात मध्यवर्ती भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद
अंबिका सोनी यांनी पंजाबचे मुख्यमंत्रीपद नाकारले
पुरग्रस्तांसाठी सरकारची महत्वाची घोषणा ; नव्या निकषानुसार मदत

अशाने शेतकरी स्वावलंबी होणार आहे का? शिवसेना खासदार राजेनिंबाळकरांचा मोदींना सवाल..

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 19 मे 2021

खरीप हंगामासाठी खत उत्पादक कंपन्यांनी खतांच्या किंमतींमध्ये सर्वात जास्त ५८.३३ टक्के वाढ केली आहे.

उस्मानाबाद ःकेंद्र सरकार एकीकडे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत सहा हजार रुपये शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांच्या हप्त्याने मदतीचा आव आणते.  पण दुसऱ्या बाजुला खताचे दर वाढवुन ते पैसे दुसऱ्या हाताने परत घेत असल्याची  टीका शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे.

केंद्र सरकारने रासायनिक खतांची दरवाढ मागे घेऊन शेतकऱ्यांना मुळ किंमतीत खते उपलब्ध करून द्यावीत, (Is this going to make the farmer self-sufficient? Shiv Sena MP Rajenimbalkar questions Modi) अशी मागणी करतांनाच अशा निर्णयांमुळले शेतकरी स्वावलंबी होणार आहे का? असा तिखट सवाल देखील खासदार राजेनिंबाळकर यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केला आहे.

सध्या कोरोना महामारीने देशात भीतीदायक रूप धारण केले आहे. देशात मोठ्या बाजारपेठा बंद झाल्या आहेत; त्याचा थेट परिणाम द्राक्ष, आंबा, ऊस, फलोत्पादन, भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांवर झाला आहे. (Farmers have suffered financial losses due to falling prices of crops.) उत्पादित पिकांच्या किंमती उतरत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

शेतात मशागतीची कामे करण्यासाठी यंत्रांचा वापर केला जातो, या उपकरणांना ऑपरेट करण्यासाठी डिझेल आवश्यक असते. बाजारात डिझेलचे दरही वाढले आहे. त्यामुळेही शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.

केंद्रीय कृषी राज्यमंत्री यांनी चार राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारावेळी रासायनिक खतांच्या किंमती वाढविल्या जाणार नाहीत असे आश्वासन दिले होते. (During the election campaign, he had promised that the prices of chemical fertilizers would not be increased.) मात्र निवडणूक प्रक्रिया पूर्ण होताच खतांच्या किंमती वाढवण्यात आल्याचे देखील राजेनिंबाळकर यांनी पत्रात नमूद केले.  

शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ..

शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ खेळला जात असुन सोयाबीनचा खुल्या बाजारात प्रतिक्विंटल दर साडेसात हजार रुपयापेक्षा जास्त आहे, असे असूनही अशा आपत्तीच्या परिस्थितीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सोयाबीन बियाण्याची किंमत गेल्या वर्षी इतकीच २२२० रुपये किलो प्रति बॅग ठेवली आहे.

अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेवू शकते, तर मग केंद्र सरकार  शेतकऱ्यांना दिलासा का देऊ शकत नाही? असा सवालही खासदार राजेनिंबाळकर यांनी केंद्र सरकारला केला आहे.(Decisions must be made in the interest of the farmers.) शेतकरी स्वावलंबी होऊ शकत नाही, शेतकऱ्याला स्वावलंबी बनवण्याची भाषा सरकारकडून केली जाते, पण त्यासाठी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणे आवश्यक आहे.

देशातील शेतकरी कोरोनाने आधीच त्रस्त आहे, त्यात पेट्रोलच्या किंमती वाढल्यामुळे तो अधिकच अडचणीत सापडला आहे. (Fertilizer manufacturers have witnessed the highest increase of 58.33 per cent in fertilizer prices.) त्यातच आता खरीप हंगामासाठी खत उत्पादक कंपन्यांनी खतांच्या किंमतींमध्ये सर्वात जास्त ५८.३३ टक्के वाढ केली आहे. ही वाढ केंद्र सरकारने मागे घेऊन शेतकऱ्यांना मुळ किंमतीत खते उपलब्ध करून द्यावीत, असेही राजेनिंबाळर यांनी पत्रात म्हटले आहे.  

हे ही वाचा ः नितीन गडकरींची कमाई जोरात, युट्यूबकडून मिळतायेत लाखो रुपये..

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख