वापराविना पडून असलेले व्हेंटिलेटर खाजगी रुग्णालयांना द्या, रुग्णांचे प्राण वाचतील..

रुग्णांना व्हेंटिलटरची गरज असतांना दुसरीकडे शेकडो व्हेंटिलेटर वापराविना पडून आहेत. हे चित्र चुकीचे आणि रुग्णांच्या जीवाशी खेळ करणारे आहे.
Bjp Mla Prashant Bamb Appeal CM Thackeray News Aurangabad
Bjp Mla Prashant Bamb Appeal CM Thackeray News Aurangabad

औरंगाबाद ः मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये व्हेंटिलेटर अभावी कोरोना रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. तर दुसरीकडे शासकीय रुग्णालयांमध्ये शेकडो व्हेंटिलेटर हे तिथे आॅक्सिनची व्यवस्था नसल्यामुळे वापराविना पडून आहेत.( Bjp Mla Prashant Bamb said, Give unused ventilators to private hospitals, save lives of patients.) मुख्यमंत्र्यांनी असे वापराविना पडून असलेले व्हेंटिलेटर खाजगी रुग्णालये तसेच कोरोना रुग्णांवर मोफत उपचार करणाऱ्या सेंटर किंवा हाॅस्पीटलला द्यावेत, अशी मागणी भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी केली आहे.

पीएम केअर फंडातून देण्यात आलेल्या व्हेंटिलेटर वरून राज्यात मोठा गदारोळ सुरू आहे. केंद्र सरकारने पाठवेले व्हेंटिलेटर हे निकृष्ट दर्जाचे व वापरण्या योग्य नसल्याचा आरोप सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी, काॅंग्रेससह एमआयएमने देखील केला आहे.(There is a big uproar in the state over the ventilators provided by the PM Care Fund.)

तर दुसरीकडे पीएम केअरमधून महाराष्ट्राला देण्यात आलेले पाच हजार व्हेंटिलेटर पैकी ९० टक्के हे चांगले व चालू आहेत. काही ठिकाणी तांत्रिक अडचणी आल्या असतील किंवा वापराविना पडून राहिल्यामुळे व्हेंटिलेटर सुरू नसेल तर ते बदलून घ्यावेत, पण यावरून राजकारण करू नये, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच लगावा होता.

आता भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी एक नवी मागणी केली आहे. राज्यातील ज्या शासकीय रुग्णालय, आरोग्य केंद्र किंवा अन्य ठिकाणी विनावापर व्हेंटिलेटर पडून आहेत, ते सर्व येत्या ४८ तासांत खाजगी रुग्णालये किंवा लोकप्रतिनिधी चालवत असलेल्या कोविड सेंटरला द्यावेत, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

मराठवाड्यात व राज्यात अनेक ठिकाणी व्हेंटिलेटर हे बाॅक्समधून बाहेर देखील काढण्यात आलेले नाही हे समोर  आले आहे. ते खराब किंवा नादूरुस्त आहेत म्हणून नाही तर व्हेंटिलेटरसाठी लागणारा आॅक्जिन व यंत्रणाच संबंधित रुग्णालयांमध्ये उपलब्ध नाहीत. (In many places in Marathwada and the state, ventilators have not even been taken out of the box) काही ठिकाणी ही सोय आहे, तर व्हेंटिलेटर चालवणारे तज्ञ डाॅक्टर्स किंवा टेक्निशियन नाहीत. मग अशावेळी हे व्हेंटिेलेटर जर खाजगी रुग्णालये किंवा स्वंयसेवी  संस्था, ज्या कोरोना रुग्णांवर मोफत उपचार करतात त्यांना दिल्यास काय हरकत आहे?

रुग्णांच्या जीवाशी खेळ नको..

असे झाले तर व्हेंटिलटर अभावी प्राण गमावाव्या लागणाऱ्या शेकडो रुग्णांचे जीव तरी वाचतील. ज्या संस्था किंवा खाजगी रुग्णालयांना हे व्हेंटिलेटर दिले जातील, ते रुग्णालय कोरोना रुग्णांकडून त्यासाठी कुठलेच बील आकारणार नाही, जर आकारले तर त्याची वसुली शासनाकडून करता येऊ शकले. (While patients today need ventilators, on the other hand hundreds are lying without using ventilators.)पण आज रुग्णांना व्हेंटिलटरची गरज असतांना दुसरीकडे शेकडो व्हेंटिलेटर वापराविना पडून आहेत. हे चित्र चुकीचे आणि रुग्णांच्या जीवाशी खेळ करणारे आहे, असेही बंब म्हणाले.

ज्यांच्याकडे व्हेंटिलटर वापण्यासाठी आवश्यक गोष्टी उपलब्ध नाहीत, त्यांना त्या पुर्ण करण्यासाठी अवधी दिला जावा, आणि तोपर्यंत ते व्हेंटिलेटर इतर खाजगी रुग्णालये, कोविड सेंटरला वापरण्यासाठी द्यावेत, अशी आग्रही मागणी प्रशांत बंब यांनी केली आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com