पर्यटन राजधानीला विकास निधीचा बुस्टर डोस द्या; खैरेंची केंद्राकडे मागणी..

औरंगाबादला पर्यटन राजधानीचा दर्जा दिला असला तरी त्या प्रकारच्या सुविधा किंवा निधी आतापर्यंतच्या कुठल्याच सरकारने दिला नाही.
पर्यटन राजधानीला विकास निधीचा बुस्टर डोस द्या; खैरेंची केंद्राकडे मागणी..
Shivsena Leader Chandrakant Khaire Meet Tourisum Minister News Aurangabad

औरंगाबाद  : मराठवाडा ही साधू संतांची भूमी असून शहर राज्याची पर्यटन राजधानी म्हणून नावारूपास आलेले आहे. पर्यटन, ऐतेहासिक व औद्योगिक दृष्टीने देखील औरंगाबाद जगभरात ओळखले जाते. (Give tourism capital a booster dose of development funding; Khaire's demand to the Center) त्यामुळे  जिल्ह्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी व मूलभूत विकासकामासाठी निधी द्या, अशी मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिल्लीत पर्यटन मंत्री व अन्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन केली.

बीबीका मकबरा, देवगिरी किल्ला, अजिंठा, वेरूळ येथे रोप - वे, लाईट अँड साऊंड शो आदींचा पर्यटन विकास योजनेत समावेश करावा, असेही खैरे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले. (Shivsena Leader Chandrakant Khaire) दिल्ली येथे नुकतीच त्यांनी केंद्रीय पर्यटन मंत्री किशन रेड्डी, राज्यमंत्री अर्जुनराम मेघावाल, पर्यटन सचिव राघवेंद्र सिंग, भारतीय पुरातत्व विभागाच्या महासंचालक व्हि. विद्यावती यांची भेट घेतली.

या भेटीत त्यांनी जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठीच्या विविध मुद्यांवर चर्चा केली.  या शिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची देखील खैरे यांनी भेट घेतली. (Tourisum Minister Kishan Reddy) यावेळी त्यांनी जिल्ह्यातील महामार्गांसह विविध कामांचा पाठपुरावा करत त्याला गती देण्याची विनंती केली. चंद्रकांत खैरे हे गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत आहेत.  उत्तराखंड व दिल्लीतील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटन आणि रस्ते, महामार्गांच्या प्रश्नांसाठी त्यांनी संबंधित खात्यांच्या मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या.

औरंगाबाद हे एक ऐतिहासिक व महाराष्ट्राची पर्यनट राजधानी असलेले शहर. औरंगाबादला पर्यटन राजधानीचा दर्जा दिला असला तरी त्या प्रकारच्या सुविधा किंवा निधी आतापर्यंतच्या कुठल्याच सरकारने दिला नाही. कोरोनामुळे पर्यटन व्यवसायाला घरघर लागली आहे. गेली दीड वर्ष या व्यवसायावर अवंबलून असलेल्या व्यावसायिकांची परवड सुरू आहे. आता कुठे कोरोनाचा थोडा धोका कमी झाला आहे.

पर्यटक बाहेर पडत असले तरी अजून म्हणावी तशी गर्दी नाही. परंतु औरंगाबादेतील पर्यटनाचे महत्व लक्ष घेता येथील बिबी का मकबरा, अंजिठा-वेरूळ लेणी या जगप्रसिद्ध स्थळांना जगभरातील पर्यटकांनी भेट द्यावी, यासाठी इथे जागतिक स्तराच्या सुविधा देणे गरजेचे आहे. पर्यटक आर्कर्षित होतील, असे प्रकल्प इथे उभारणे गरजे असल्याचे खैरे यांनी पर्यटन मंत्री व त्या विभागाच्या निदर्शनास आणून देत वरील मागण्या व त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

Edited By : Jagdish Pansare

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in