वीज कर्मचारी अधिकारी, अभियंत्यांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा द्या; एमआयएमची मागणी.. - Give the status of frontline worker to power workers, officers, engineers; MIM demand .. | Politics Marathi News - Sarkarnama

वीज कर्मचारी अधिकारी, अभियंत्यांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा द्या; एमआयएमची मागणी..

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 11 जून 2021

फयान व यावर्षीच्या तौक्ते वादळांमध्ये जागोजागी पडझड झाली असतांना युध्दपातळीवर काम करुन सर्व कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत केला.

औरंगाबाद : कोरोना महामारीमध्ये कोणतीही तमा न बाळगता आहोरात्र सेवा देणाऱ्या विद्युत विभागातील अधिकारी, अभियंते, कामगार व कंत्राटी कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा द्या, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. (Give the status of frontline worker to power workers, officers, engineers; MIM demand) या संदर्भातील पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवल्यानंतर आज उर्जामंत्री नितीन राऊत यांना देखील पत्र देत त्यांच्याशी चर्चा केली. 

कोरोना संकटात जसे आरोग्य, प्रशासन, पोलिस, महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र काम केले, त्याच प्रमाणे विद्युत विभागाने देखील केले. (AIMIM Mp Imtiaz Jalil) कोरोना संसर्ग वाढल्यानंतर आॅक्जीजनची कमतरता भासत असतांना हाॅस्पीटलसह शहर, जिल्हा व राज्याचा विद्युत पुरवठा अखंडित राहावा, यासाठी वीज विभागाचे अभियंते, अधिकारी, कर्मचारी देखील अहोरात्र झटत होते.

शासनाच्या विविध विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देत, त्यांना सुविधा देण्यात आल्या. (Minister Nitin Raut) त्यानूसार वीज विभागातील अधिकारी, अभिंयते आणि कर्मचाऱ्यांना देखील द्याव्यात, अशी मागणी इम्तियाज जलील यांनी उर्जामंत्र्यांच्या प्रत्यक्ष भेटीत केली. या शिवाय प्रलंबित मागण्याही मार्गी लावण्याचा आग्रह धरला.

इम्तियाज जलील यांनी या संदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना २८ मे रोजी पत्र पाठवले होते. (CM Udhhav Thackeray) आज उर्जामंत्री नितीन राऊत यांनाही त्यांनी पत्र देत त्यांच्याशी चर्चा केली.  मागील दिड वर्षापासून कोविड-१९ संसर्गजन्य आजाराच्या भयंकर परिस्थितीत  वीज निर्मिती, वहन व वितरणाच्या कामात खंड पडू् न देण्याचे महत्वाचे काम महावितरणच्या हजारो अभियंते,अधिकारी, लाईनमन, कर्मचाऱ्यांनी केले. 

रोष पत्करून वीजबील वसुली करून दिली..

त्यामुळेच राज्यातील दवाखाने, कोविड सेंटर, पाणी पुरवठा व घरगुती वीज पुरवठा सुरळीत राहिला. गेल्यावर्षी आलेल्या फयान व यावर्षीच्या तौक्ते वादळांमध्ये जागोजागी पडझड झाली असतांना युध्दपातळीवर काम करुन सर्व कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत केला. कोविडच्या काळात तर जनतेचा रोष पत्करुन प्रशासनाच्या आदेशाखातर वीजबिल वसुली करुन शासनाला महसुल देखील मिळवून दिला.

राज्यातील वीज कामगार, अभियंते, अधिकारी तसेच कंत्राटी कामगार यांनी गेले वर्षभर इतर फ्रंटलाईन वर्करच्या बरोबरीने काम केले. त्यामुळे या सर्वांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देवुन त्यांना व त्यांच्या कुटुबांतील सर्व सदस्यांचे प्रथम लसीकरण करावे. कोविड-१९ मुळे मृत्युमुखी पडलेल्या वीज कामगारांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपये अनुदान द्यावे, तसेच तिन्ही कंपन्याकरिता एम.डी. इंडिया या जुन्याच टीपीएची नेमणूक करावी,अशी  मागणी पत्राद्वारे इम्तियाज जलील यांनी केली.

हे ही वाचा ः भाजपमध्ये एकही नेता शिल्लक राहणार नाही, घरवापसीनंतर मुकल राॅय गरजले..

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख