मेडिकल काॅलेजला जागा देणार; उद्योगमंत्र्यांचे खासदार जाधव यांना आश्वासन..

सुभाष देसाई यांनी गंगाखेड रोडवरील मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाची ३ गटात १०० एक्कर जमीन असल्याचे सांगितले.
Parbhni Medical College- Mp Sanjay Jadhav Meet Minister Subhas Desai News
Parbhni Medical College- Mp Sanjay Jadhav Meet Minister Subhas Desai News

परभणी ः मेडिकल काॅलेजचा प्रस्ताव अंतीम टप्यात असून जागा उपलब्धतेसाठीची फाईल राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे अडकली आहेत, असा आरोप राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान यांनी काल केला होता. परंतु त्याआधीच शिवसेना खासदार संजय जाधव यांनी मुंबईत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची या संदर्भात भेट घेतली होती. (To give place to medical college; Industry Minister assures MP Jadhav) या भेटीत परभणी मेडिकल काॅलेजला गंगाखेड रोडवरील जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देसाई यांनी या भेटीत दिल्याची माहिती खासदार जाधव यांनी दिली आहे.

सोमवारीच या संदर्भात आपली मुंबईत सुभाष देसाई यांच्यासोबत चर्चा झाल्याचेही जाधव यांनी सांगितले. (Parbhani Medical College) त्यामुळे आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी लागणार्‍या जागेचा प्रश्न निकाली निघणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Shivsena Mp Sanjay Jadhav Parbhani) परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करावे म्हणून खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली परभणीकरांचे आंदोलन सुरू आहे.

शासनाने परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू केल्यास या महाविद्यालयासाठी जागा लागणार आहे. (Ncp Mp Fuajiya Khan Parbhani) दरम्यान, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाची ५० एक्कर जमीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास देण्यासाठीचा प्रस्ताव कृषी विद्यापीठाने यापूर्वीच दिलेला असून त्यास मान्यतेसाठी वरिष्ठस्तरावर पाठविण्यात आलेले आहे.

तसेच गंगाखेड रोडवरील ब्राह्मणगाव शिवारातील मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाची १०० एक्कर जागाही उपलब्ध आहे. या दोन्हीपैकी कोणत्याही एका ठिकाणची जमीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी देण्यात यावी म्हणून खासदार संजय जाधव यांनी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची ३० ऑगस्ट रोजी मुंबईत भेट घेतली होती. या भेटीत वरील दोन्ही जागेसंदर्भात उभयतांमध्ये सविस्तर चर्चा झाली.

परभणीच्या प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी कोणतीही जागा उपलब्ध करून द्या, असा आग्रह जाधव यांनी उद्योगमंत्र्याकडे धरला. त्यावर सुभाष देसाई यांनी गंगाखेड रोडवरील मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाची ३ गटात १०० एक्कर जमीन असल्याचे सांगितले. त्यापैकी दोन गटाच्या जमिनीवर कर्ज घेतलेले आहे. हा कर्ज बोजा कमी करून बेबाकी व ना हरकत प्रमाणपत्र सादर केल्यास ही जमीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी देता येईल.

ही पूर्ण प्रक्रिया पार पाडून जमीन उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन देसाई यांनी दिले. शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, डॉ. राम शिंदे यावेळी उपस्थित होते. उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्यामुळे जागेचा तिढा आता जवळपास सुटल्याचे खासदार जाधव यांनी सांगितले.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com