कोरोना रुग्णांना उपचारासोबतच अंडी, गुळ, शेंगदाणे, सोयाबीन वडीचा पौष्टीक आहार ..

रुग्णांना दोन वेळेत वरण, भात, भाजी, पोळी याबरोबरच रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यामध्ये मदत करणारे उकडलेले अंडे, गुळ, शेंगदाणे, सोयाबीन वडी, दुध याबरोबरच प्रोटीनचा भरपुर समावेश असलेल्या थ्रेप्टीन बिस्कीटांचाही समावेश करण्यात आला
tope visit jalna covied hospital news
tope visit jalna covied hospital news

जालनाः कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करत असतांना त्यांना पौष्टिक आहार देखील द्यावा, अशा सूचना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी संबंधितांना दिल आहेत. बुधवारी रात्री टोपे यांनी जालन्यातील कोविड हॉस्पीटलला भेट देत तेथे पुरवण्यात येणाऱ्या उपाय योजनांचा आढावा घेतला.

सुरुवातीला जालना जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होती, मात्र गेल्या काही दिवसांमध्ये त्यात अचानक वाढ होऊन आता एकूण रुग्णांची संख्या ७७ झाली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता अत्यंत कमी वेळात उभारण्यात आलेल्या कोविड रुग्णालयाला भेट देत टोपे यांनी आरोग्य विभागाला उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या आहारा बद्दल देखील सूचना दिल्या.

जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी राजेश टोपे यांना जिल्ह्यातील कोरोना आणि त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाय योजनांची माहिती टोपे यांना दिली.

यावेळी टोपे म्हणाले, जिल्ह्यात कोविड बाधितांना तातडीने उपचार मिळावेत या उद्देशानेच अत्यंत कमी कालावधीमध्ये या रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी दाखल करण्यात आलेल्या कोविड बाधित रुग्णांना आवश्यक ते औषधोपचार देण्याबरोबरच रुग्णांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होण्यासाठी त्यांच्या आहारामध्ये पौष्टीक अशा बाबींचा समावेश करणे गरजे आहे. 

जिल्ह्यातील रुग्णांना आरोग्याच्या सेवा अधिक चांगल्या प्रमाणात मिळाव्यात यादृष्टीकोनातुन आवश्य त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत असुन निधीची कमतरता भासु दिली जाणार नाही. रुग्णालयास आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्या बरोबरच रुग्णालयासाठी आवश्यक तंत्रज्ञही तातडीने उपलब्ध करुन देण्याचे निर्देश टोपे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. शिवाय कोविड रुग्णालयासाठी तातडीने दोन हजार पीपीई किट उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
 
रुग्णांना आवश्यक त्या औषधोपचाराबरोबरच त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढविणे आवश्यक असल्याने या रुग्णांसाठी संतुलित आहाराचा दिनक्रम ठरविण्यात आला आहे. रुग्णांना दोन वेळेत वरण, भात, भाजी, पोळी याबरोबरच रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यामध्ये मदत करणारे उकडलेले अंडे, गुळ, शेंगदाणे, सोयाबीन वडी, दुध याबरोबरच प्रोटीनचा भरपुर समावेश असलेल्या थ्रेप्टीन बिस्कीटांचाही समावेश करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सका डॉ. मधुकर राठोड यांनी आरोग्य मंत्री टोपे यांनी दिली. 

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com