वाळूच्या ट्रॅक्टरने मुलीला चिरडले, नातेवाईकांनी मृतदेह मालकाच्या घरी नेऊ ठेवला.. - The girl was crushed by a sand tractor and the body was taken to the owner's house. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीकडे रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

वाळूच्या ट्रॅक्टरने मुलीला चिरडले, नातेवाईकांनी मृतदेह मालकाच्या घरी नेऊ ठेवला..

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 19 मे 2021

वाढता तणाव लक्षात घेता पोलिस निरीक्षक भगवान धबडगे यांनी जादा कुमक बोलावून बंदोबस्त वाढवला.

नांदेड ः देगलुर तालुक्यातील शेवाळा येथे एका भरधाव वेगाने जाणाऱ्या वाळूच्या ट्रॅकटरने सात वर्षाच्या मुलीला चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (The girl was crushed by a sand tractor and the body was taken to the owner's house.) मुलीच्या कुटुंबियांनी तिचा मृतदेह ट्रॅकटर मालकाच्या घरी नेऊन ठेवल्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अवैैध वाळू वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. (Illegal sand transportation has increased) कारवाईच्या भितीने वाळु माफिया आपली वाहने भल्या पहाटे भरधाव वेगाने नेत असल्याने अनेक ठिकाणी अपघात व त्यात मरण पावणाऱ्यांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे.

देगलुर तालुक्यातील शेवाळा गावात देखील एका भरधाव जाणाऱ्या वाळूच्या ट्रॅक्टरने सात वर्षाच्या मुलीला चिरडले. यात तिचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान हा प्रकार समोर आल्यानंतर मृत मुलीच्या कुटुंबियांनी तिचा मृतदेह थेट ट्रॅक्टर मालकाच्या घरीच नेला. (The girl's family took her body directly to the tractor owner's house.) जोपर्यंत ट्रॅक्टर चालकावर खूनाच गुन्हा दाखल होऊन अटक होत नाही, तो पर्यंत मृतदेह उचलणार नाही, अशी भूमिका मृत मुलीच्या कुटुंबियांनी घेतली.

रमा गौतम कांबळे असं मृत मुलीचे नाव आहे. रमा सकाळी शौचास गेली होती, तेव्हाच  वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रक्टरने तिला चिरडले. (The name of the dead girl is Rama Gautam Kamble.) या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात तणाव निर्माण झाला असून, संतप्त नागरिकांनी मृतदेह ट्रॅक्टर मालकाची घरी नेऊन ठेवला.

वाढता तणाव लक्षात घेता पोलिस निरीक्षक भगवान धबडगे यांनी जादा कुमक बोलावून बंदोबस्त वाढवला. ट्रॅक्टर चालक आणि मालकाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक करण्याची मागणी मुलीच्या नातेवाईकांनी केली आहे.

हे ही वाचा ः खतांचे भाव वाढवण्याचे अधिकार कंपन्यांना दिले कुणी?

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख