चाळीसगांव बोगद्याचे काम लवकर सुरू करा, शिवसेनेने दिले एक लाख सह्यांचे पत्र - Get the Chalisgaon tunnel work done soon, Shiv Sena gave Gadkari a letter with one lakh signatures | Politics Marathi News - Sarkarnama

चाळीसगांव बोगद्याचे काम लवकर सुरू करा, शिवसेनेने दिले एक लाख सह्यांचे पत्र

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 7 एप्रिल 2021

हा बोगदा पुर्ण झाला तर त्याचा लाभ हा महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्यप्रेदशसह अन्य राज्यांना होणार आहे.

औरंगाबाद ः  कन्नड तालुक्यातून जाणारा चाळीसगांवचा बोगदा लवकरात लकवकर करावा, अशा मागणीचे कन्नड तालुक्यातील १ लाख नागरिकांच्या सह्यांचे पत्र आज केंद्रीय मंंत्री नितीन गडकरी यांना शिवसेनेच्या वतीने देण्यात आले. चाळीसगांवचा बोगदा झाला तर वाहतूक कोंडी, अपघातांचे प्रमाण कमी होऊन लोकांचा वेळ वाचेल तसेच कनेक्टिव्हिटी वाढून दळणवळण व बाहेरच्या राज्याशी व्यापार वाढेल, याकडेही गडकरींचे लक्ष वेधण्यात आले आहे.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत, शिवसेनेचे तालुका संघटक डाॅ, अण्णा शिंदे यांनी आज दिल्ली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. कन्नड-साेयगांव मतदारसंघातील विविध विकासकामांच्या मागणीचे निवेदन देतांनाच चाळीगाव बोगद्याचा प्रश्न लवकर मार्गी लावावा, अशी आग्रही मागणी देखील शिवसेनेने गडकरी यांच्याकडे केली.

कन्नड तालुक्यातून जळगांवकडे जाणाऱ्या चाळीसगांव घाटात वाहतुक कोंडी होऊन तासनतास वाहनांच्या रांगा लागणे हे नित्याचेच झाले आहे. या शिवाय अरुंद घाट, वळणे यामुुळे इथे अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे. कन्नड तालु्क्यातील तेलवाडी ते चाळीसांगाव घाटाच्या पायथ्याची असलेल्या आौढ्रे गावापर्यंत साधरणता १० ते १२ किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्यास मंजुरी मिळाली आहे.

दोन्ही बाजुने सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गाचे काम पुर्ण झाले आहे, परंतु  चाळीसगाव बोगद्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. हा बोगदा पुर्ण झाला तर त्याचा लाभ हा महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्यप्रेदशसह अन्य राज्यांना होणार आहे. भविष्यात या बोगद्याचे महत्व आणि गरज लक्षात घेता या बोगद्यातून रेल्वे देखील जाऊ शकेल अशा पद्धतीने याचे काम केले जावे, अशी मागणी कन्नड तालुक्यातून करण्यात आली होती.

गडकरींचे आश्वासन..

दहा ते बारा किलोमीटर अंतराच्या या बोगद्यासाठी चार हजार तीनशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.  यापुर्वी देखील नितीन गडकरी यांच्याकडे या बोगद्यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता. परंतु सध्या गेल्या वर्षभरापासून देशात कोरोना महामारीचे संकट आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणे शक्य नसल्याचे केंद्राच्या वतीने सांगण्यात आले होते.

दरम्यान, शिवसेनेचे तालुका संघटक डाॅ. अण्णा शिंदे यांनी चाळीसगांव बोगद्याचे महत्व पटवून देण्यासाठी तालुक्यातील एक लाख नागरिकांच्या सह्या घेण्याची मोहिम राबवली होती. आज या सह्यांचे पत्र देखील नितीन गडकरी यांना शिवसेनेच्या वतीने देण्यात आले. लवकरच चाळीसगाव बोगद्याचे काम सुरू करू असे आश्वासन नितीन गडकरी  यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले आहे.

Edited By : Jagdish Pansare
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख