नांदेडात गॅंगवार भडकले, सराईत विक्की चव्हाण गोळीबारात ठार

विक्की हा काही महिन्यांपूर्वीच जेलमधून सुटला होता. जेलमधून सुटल्यानंतर विक्की पुन्हा गुन्हेगारीकडे वळला. काही दिवसांपूर्वी विक्की आरोपींच्या घरी धारधार शस्त्र घेऊन धमकी देण्यासाठी गेला होता,अशी माहिती आता समोर आली आहे. विक्कीची वाडी क्षेत्रात प्रचंड दहशत होती. त्याला तडीपार देखील करण्यात आले होते.वर्चस्व सिद्ध करण्याच्या वादातून विक्की चव्हाण आणि आरोपीमध्येनेहमीच खटके उडायचे. त्यातूनच त्याचा खून झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
murder news nanded
murder news nanded

 

नांदेडः शहरात गॅंगावरने डोके वर काढले असून वर्चस्वाच्या लढाईत एका गटाकडून दुसऱ्या गटाच्या सराईत गुंड असलेल्या विक्की चव्हाणचा खात्मा करण्यात आला आहे. रात्री मोटारसाकलवरून जात असतांना विक्की चव्हाण व त्यांच्या एका साथीदारावर शहरातील शंकरराव चव्हाण चौक गाडेगाव रस्त्यावरील रेल्वे फाटकाजवळ हल्ला करण्यात आला. चाकू हल्ला आणि गोळीबारात आधी गंभीर जखमी झालेला विक्की नंतर ठार झाला. विशेष म्हणजे हल्लेखोरांनी पुरावा नष्ट करण्याच्या हेतून जखमी विक्कीला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. पण रस्त्यातच विक्की ठार झाल्याचे लक्षात येताच त्याचा मृतदेह आरोपींनी रस्त्यातच टाकून पलायन केले. रविवारी रात्री ही खळबळजनक घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराईत गुन्हेगार असलेल्या विक्की चव्हाणवर अनेक गंभीर गुन्हे विविध पोलीस स्टेशनमध्ये दाखल होते. रविवारी रात्रा साडेबाराच्या सुमारास विक्की आणि त्याचा मित्र दोघे मोटारसायकलीवरून घरी जात होते. त्याचवेळी आरोपी आणि त्याच्या एका मित्राने विक्कीची मोटारसायकल अडवली. त्यामुळे संतापलेल्या विक्की आणि आरोपींमध्ये वाद झाला. यातून विक्कीवर चाकूने हल्ला करत गोळीबारही करण्यात आला. यात विक्की गंभीर जखमी झाल्यानंतर आरोपींनी त्याला आपल्या गाडीत टाकले आणि ते हसापूर नदीच्या दिशेने निघाले.

दरम्यान, विक्की मरण पावल्याचे लक्षात येताच आरोपींनी त्याचा मृतदेह हसापूर भागातील नदीच्या पुलाखाली फेकून देत पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रात्रभर शहरात नाकेबंदी केली. आज सकाळी हसापूर भागात नदीवरील पुलाखाली विक्की चव्हाण याचा मृतदेह पोलिसांना सापडला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी कौठा भागात विक्की चव्हाण याच्या टोळीने दुसऱ्या गटावर तलवारीने हल्ला केला होता.

विक्की हा काही महिन्यांपूर्वीच जेलमधून सुटला होता. जेलमधून सुटल्यानंतर विक्की पुन्हा गुन्हेगारीकडे वळला. काही दिवसांपूर्वी विक्की आरोपींच्या घरी धारधार शस्त्र घेऊन धमकी देण्यासाठी गेला होता,अशी माहिती आता समोर आली आहे. विक्कीची वाडी क्षेत्रात प्रचंड दहशत होती. त्याला तडीपार देखील करण्यात आले होते. वर्चस्व सिद्ध करण्याच्या वादातून विक्की चव्हाण आणि आरोपीमध्ये नेहमीच खटके उडायचे. त्यातूनच त्याचा खून झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान विमानतळ पोलिसांनी मुख्य आरोपीसह एकास अटक केली असून त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता आठ तारखेपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Edited By: Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com