गणराया, ठाकरे सरकारला सुबुद्धी दे; राज्यभरात भाजप घालणार साकडे..

जनतेने घरात बसावे अशी ठाकरे सरकारची इच्छा असली तरी त्यासाठी रस्त्यावरील गुन्हेगारीस पाठीशी घालून दहशत माजविणे हा मार्ग नाही.
गणराया, ठाकरे सरकारला सुबुद्धी दे; राज्यभरात भाजप घालणार साकडे..
Chief Minister Uddhav Thackeray-Bjp News Aurangabad

औरंगाबाद ः संकटाला घाबरून घरात बसलेल्या ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रात महिलांवर तालिबानी अत्याचार सुरू असून सरकारच्या दबावामुळे गुन्हेगारांवर कारवाई करण्याची पोलिसांची हिंमत राहिलेली नाही, (Ganaraya, give wisdom to Thackeray government; BJP to be formed across the state) असा आरोप भाजपच्या महिला प्रदेश सरचिटणीस सविता कुलकर्णी यांनी केला.

आता महिलांनाच आपल्या संरक्षणाची तयारी करावी लागणार असून अत्याचाराविरोधातील संघर्षास महिलांना बळ दे, असे साकडे गणरायाला घालण्यात येणार असल्याचेही त्या म्हणाल्या. (Bjp Protest Aginst Mahavikas Aghadi Sarkar)

राज्यात महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या मुद्यावरून भाजपची महिला आघाडी आक्रमक झाली आहे. (Chief Minister Uddhav Thackeray, Maharashtra) गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महिलांवरील वाढते अत्याचार आणि ते रोखण्यात अपयशी ठरलेले राज्य सरकार या विरोधात भाजप महिला मोर्चाच्या वतीने साकडे आंदोलन करण्यात येणार आहे.

सरकारी दडपशाहीमुळे बंद असलेल्या मंदिरांसमोर जाऊन श्रीगणेशाच्या चरणी महिलावरील अत्याचार रोखण्यासाठी गणरायाने ठाकरे सरकारला सुबुद्धी द्यावी, असे साकडे घालण्यात येणार आहे.

अत्याचारांचा कळस गाठला..

राज्यात सर्वत्र हे साकडे आंदोलन करण्यात येणार आहे. महिलांचा सन्माम राखण्यासाठी केंद्र सरकार विविध योजना आखत आहे. महिलांना मंत्रिमंडळात मानाचे स्थान मिळत आहे. तर इकडे राज्यात मात्र, ठाकरे सरकारच्या निष्क्रीयतेमुळे महिलांवरी अत्याचारांनी कळस गाठला आहे.

राज्यात गणेशात्सव सुरू होत असताना अनेक कुटुंबे अत्याचारांच्या भयाने धास्तावली असून त्यांना संरक्षण देण्यात ठाकरे सरकार कुचकामी ठरले आहे. त्यामुळे आता गणरायानेच महिलांना अत्याचाराविरोधात लढण्याचे बळ द्यावे, अशी प्रार्थना केली जाईल, असे सविता कुलकर्णी  यांनी सांगितले.

पुण्यात वानवडी येथे १४ वर्षांची अल्पवयीन बालिका आणि २५ वर्षीय गतिमंद तरुणीवरील सामूहिक बलात्काराच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला असून महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. ठाकरे सरकार मात्र कोरोनाच्या नावाने राजकारण करत निष्क्रीयपणे घरात बसून आहे.

पुरोगामी महाराष्ट्रातील वानवडी येथील गौरी गायकवाड नावाच्या महिला सरपंचास सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने मारहाण केल्यानंतरही कारवाई होत नाही, उलट नागरिकांची लसीकरणाची सुविधाच बंद करून जनतेच्या जिवाशी खेळ केला जातो.

मुख्यमंत्र्यांना देवाचा तिरस्कार?

औरंगाबादला उसतोड मजूर महिलेचे अपहरण केले जाते, आणि सरकार मात्र हातावर हात ठेवून ढिम्म राहते. ठाण्यात पालिकेच्या अधिकारी महिलेवर भर रस्त्यात हल्ला करून तिची बोटे छाटली जातात. महाराष्ट्रात विकृत गुन्हेगारांची हिंमत वाढली असून महिला सुरक्षेचे धिंडवडे निघाले आहेत. अशा परिस्थितीत सरकारी कृपेने गुन्हेगारी करणाऱ्यांशी संघर्ष करण्याची हिंमत गणरायाने राज्यातील महिलांना द्यावी, अशी प्रार्थना बंद मंदिरासमोर करण्यात येईल.

कोरोनाकाळात उपचारासाठी दाखल झालेल्या महिलांवरही अत्याचार झाले असून अशा वाढत्या घटनांमुळे महिलांनी घराबाहेर पडण्याचीही भीती वाटू लागली आहे. जनतेने घरात बसावे अशी ठाकरे सरकारची इच्छा असली तरी त्यासाठी रस्त्यावरील गुन्हेगारीस पाठीशी घालून दहशत माजविणे हा मार्ग नाही.

घरबसल्या राज्याच्या कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे पाहात निष्क्रिय राहिलेल्या ठाकरे सरकारला आता गणरायानेच सुबुद्धी द्यावी. गणरायाच्या थेट मुखदर्शनावरही बंदी घालणारे ठाकरे सरकार सण आणि उत्सवांचा तिरस्कार करते हे सिद्ध झाले असून घरात बसून स्वतःचे तोंड लपविणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा देवाच्या मुखदर्शनाला विरोध का, असा सवालही कुलकर्णी यांनी उपस्थित केला.

Edited By : Jagdish Pansare

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in