माजी सभापती, सरपंचासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश..

समर्थकांच्या बैठका घेऊन त्यांनी चाचपणी देखील सुरू केली होती. तेव्हा अनेकांनी शिवसेनेत प्रवेश करावा, असे मत व्यक्त केले होते.
माजी सभापती, सरपंचासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश..
Ncp Activites Join Shivsena News Vasmat-Hingoli

वसमत ः राष्ट्रवादी काॅंग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे दोन माजी सभापती, सरपंच व राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी नुकता शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या सर्वांना शिवबंधन बांधण्यात आले. (Former Speaker, Sarpanch and NCP office bearers join Shiv Sena.)  हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश झाला.

गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यातील राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये धुसफूस सुरू होती. अंतर्गत गटबाजी रोखण्यासाठी  वरिष्ठांकडून कुठल्याच हालचाली होत नसल्याने अखेर काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. (Shivsena Chief Uddhav Thackeray Maharashtra) त्यानंतर दोन माजी सभापतीं तसेच काही सरपंचांनी शनिवारी हाती शिवबंधन बांधून घेतले. त्यामुळे वसमत तालुक्यात शिवसेनेला नवे बळ मिळाल्याचे बोलले जाते.

शिवसेनेत काही दिवसांपुर्वी संघटनात्मक बदल करण्यात आले.  राजू चापके यांची वसमत तालुकाप्रमुख पदी निवड झाल्यानंतर त्यांनी तालुक्यात पक्षाला बळकटी आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. (Mp Hemant Patil, Hingoli) त्यामुळे विविध पक्षातील  स्थानिक पदाधिकाऱ्यांचा ओढा शिवसेनेकडून वाढल्याचे दिसून आले. दरम्यान मागील काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू होती.

जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती प्रल्हाद राखोंडे ,तसेच वसमत बाजार समितीचे सभापती राजेश इंगोले , राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष तथा विद्यमान सरपंच देविदास पाटील कऱ्हाळे, सती पांगरा येथील सरपंच श्याम कदम ,टोकाईचे संचालक शंकरभाई कऱ्हाळे, गिरगावचे माजी सरपंच कल्याण पाटील कऱ्हाळे , नाहदचे सरपंच भगवान कावळे, रोडगा- फाटा येथील सरपंच बद्रीनाथ कदम हे मागील काही दिवसापासून पक्ष बदलाच्या तयारीत होते.

समर्थकांच्या बैठका घेऊन त्यांनी चाचपणी देखील सुरू केली होती. तेव्हा अनेकांनी शिवसेनेत प्रवेश करावा, असे मत व्यक्त केले होते.  शिवसेनेचे हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुख आनंद जाधव, खासदार हेमंत पाटील ,जिल्हा प्रमुख तथा आमदार संतोष बांगर, तालुका प्रमुख राजू चापके यांच्या नेतृत्वाखाली या सर्वांनी शनिवारी मुंबई येथे मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

प्रत्येक गावात शाखा..

या सर्वांना शिवबंधन बांधून भगवा झेंडा देण्यात आला. तळागाळापर्यंत शिवसेनेचे विचार पोहचवा, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. इंगोले,राखोंडे,कऱ्हाळे हे तिघेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या फळीतील तालुक्यातील नेते समजले जातात. मागील पंचवीस ते तीस वर्षापासूनचा त्यांचा राजकारणाचा अनुभव व अभ्यास पाहता वसमत तालुक्यात शिवसेनेला आणखी बळ मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.  

भविष्यातील  प्रत्येक निवडणुकीमध्ये शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी नव्याने पक्षात आलेल्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन प्रयत्न करणार असल्याचा विश्वास सर्वांनी व्यक्त केला आहे. पुढील काही दिवसातच प्रत्येक गावात शाखा स्थापन करून शिवसेना पक्षसंघटन मजबूत करणार असल्याचे तालुकाप्रमुख राजू चापके यांनी या प्रेवशानंतर सांगितले. 

Edited By : Jagdish Pansare

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in