माजी आमदार मोहन फड यांच्या मुलाचा अपघातात मृत्यू 

मोटारसायकलवरून गंगाखेडच्या दिशेने जात असतांना उड्डाणपुलावर त्याचा अपघात झाला. यावेळी नागरिकांनी तातडीने धाव घेऊन पृथ्वीराजला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
ex mla fad sons died in accident news
ex mla fad sons died in accident news

परभणी : शहरातील उड्डाणपुलावर झालेल्या दुचाकीच्या अपघातात भाजपचे माजी आमदार मोहन फड यांच्या मुलाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली.  मोहन फड यांचा लहान मुलगा पृथ्वीराज फड हा मुंबईत शिकतो. लॉकडाऊनमुळे मागच्या काही दिवसांपासून तो परभणीत आला होता. शुक्रवारी संध्याकाळी पावणे नऊच्या सुमारास पृथ्वीराज हा त्याची  स्क्रॅमलर डुक्याटी या मोटारसायकल वरून गंगाखेड रस्त्याकडे जात असताना उड्डाणपुलावर त्याचा अपघात झाला. नागरिकांनी त्यास तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले, पण उपचार सुरू होण्यापुर्वीच पृथ्वीराजचा मृत्यू झाला होता.

माजी आमदार मोहन फड यांच्या कुटुंबियावर आघात करणार दुर्दैवी घटना काल सांयकळी घडली. फड यांचा धाकडा मुलगा पृथ्वीराज हा आपल्या मोटारसायकलवरून गंगाखेडच्या दिशेने जात असतांना उड्डाणपुलावर त्याचा अपघात झाला. यावेळी नागरिकांनी तातडीने धाव घेऊन पृथ्वीराजला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी संपुर्ण शहरात पसरली. मोहन फड व त्यांच्या कुटुंबियांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. पण पृथ्वीराजचा अपघातात मृत्यू झाल्याचे समजातच फड यांच्या कुटुंबियावर मोठा आघात झाला. 

या अपघातात पृथ्वीराज याची बुगाटी कंपनीची दुचाकी समोरून पूर्णपणे चुराडा झाली होती. या अपघातात पृथ्वीराजच्या मोटारसायकला नेमकी कुठल्या वाहनाने धडक दिली हे मात्र समजू शकले नाही. अपघाताच्या वेळी फक्त मोटारसायकल आणि जखमी अवस्थेत पृथ्वीराज रस्त्यावर पडून होता. मोटारसायकलला कोणत्या वाहनाने धडक दिली याचा शोध पोलीस घेत आहे.

पंकजा मुंडेकडून सांत्वन..

माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी या दुःखद घटनेबद्दल माजी आमदार मोहन फड व त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आहे. ट्विटरच्या माध्यामातून आपल्या शोक संदेशात पंकजा मुंडे म्हणाल्या, आमचे निकटवर्तीय तथा माजी आमदार मोहन फड यांचा मुलगा पृथ्वीराज फड याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला, त्याच्या निधनामुळे फड कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वर त्यांना देवो ही प्रार्थना. पृथ्वीराजला माझी भावपुर्ण श्रद्धांजली.
 

Edited By: Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com