व्रतस्थ राजकारणी, चारित्र्यवान व्यक्ती माजी आमदार आलुरे गुरूजी यांचे निधन..

१९८० ते ८५ या काळात तुळजापूर तालुक्याचे आमदार म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केले.
Tuljapur Ex.Mla Alure Gurji  News Osmanabad
Tuljapur Ex.Mla Alure Gurji News Osmanabad

तुळजापूर : तालुक्याचे माजी आमदार आणि शिक्षण महर्षी सिद्रामप्पा नागप्पा आलूरे गुरूजी (वय ९०) यांचे सोमवारी पहाटे सोलापूर येथील खाजगी रूग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.  त्यांच्या पार्थिवावर अणदूर  येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. (Former MLA Alure Guruji passes away.)आलूरे गुरूजी यांनी शिक्षक म्हणून काही काळ सेवा केली तसेच साव॔जनिक, राजकीय, सामाजिक अशा विविध स्तरात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला.

१९८० ते ८५ या काळात तुळजापूर तालुक्याचे आमदार म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केले. तसेच तुळजा भवानी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक आणि चेअरमन म्हणूनही त्यांनी काम पाहिले. (Tuljapur, Osmanabad Ex.Mla Marathwada) तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय स्थापनेत त्यांचा मोलाचा वाटा होता. शिक्षण प्रसारक मंडळ अणदूर तालुका तुळजापूर येथील संस्थापक सचिव आणि लातूरच्या सिद्देश्वर बॅकेचे संचालक, चेअरमन या पदावर त्यांनी काम केले.

बालाघाट शिक्षण संस्थेचे संस्थापक सदस्य म्हणूनही ते कार्यरत होते.  व्रतस्थ राजकारणी आणि चारित्र्यवान व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. स्वातंत्र्यानंतर तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा विविध स्तरावर कार्य करणारा एक महत्त्वाचा दुवा निखळल्याच्या प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून उमटत आहेत.

अनेकांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश- अजित पवार

तुळजापूर तालुक्याचे माजी आमदार, शिक्षणमहर्षी आदरणीय सिद्रमप्पा आलुरे गुरुजींनी त्यांच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक कार्यातून समाजासमोर ध्येयनिष्ठेचा, कर्तव्यनिष्ठेचा आदर्श ठेवला. सार्वजनिक जीवनात निष्ठापूर्वक काम करण्याचा परीपाठ घालून दिला. (Ajit Pawar, Deputy Minister Maharashtra)  गुरुजींनी अनेकांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश निर्माण केला.

कित्येकांच्या चुली पेटत्या ठेवण्याचं काम गुरुजींनी शिक्षणप्रसाराच्या कार्यातून केलं. आलुरे गुरुजींना घडवलेले विद्यार्थीच त्यांच्या कार्याचा, विचारांचा वारसा पुढे घेऊन जातील,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिद्रमप्पा आलुरे गुरुजींच्या कार्याचं स्मरण करुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

शिक्षणमहर्षी आलुरे गुरुजींना श्रद्धांजली वाहताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आलुरे गुरुजी खऱ्या अर्थानं शिक्षणमहर्षी होते. त्यांनी शिक्षणाची गंगा गरीबांच्या घरापर्यंत नेली. गावात शाळा नाही. वर्गखोल्या नाहीत. खोल्यांना भिंत नाही. फळा नाही. खडू नाही. अशी कुठलीही अडचण विद्यार्थ्यांना शिकवण्यापासून त्यांना रोखू शकली नाही.

गरज पडली तेव्हा देवळाच्या आवारात, झाडाच्या पारावर त्यांनी शाळा भरवली. विद्यार्थ्यांना औपचारिक शिक्षणाच्या बरोबरीनं नैतिक शिक्षणही दिलं. पायाभूत सुविधांपेक्षा शिक्षणाचा दर्जा सुधारण्यावर त्यांचा भर असायचा. त्यामुळेच गुरुजींचे अनेक विद्यार्थी राज्यपातळीवरील परीक्षेत अव्वल ठरले. जीवनाच्या अनेक क्षेत्रात विद्यार्थ्यांनी मोलाचं काम केलं. राष्ट्रनिर्मितीत योगदान दिलं. गुरुजींने दिलेले विचार हेच विद्यार्थी पुढे घेऊन जातील.

पहिली पंसती शिक्षणालाच..

उपमुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात पुढे म्हणतात की, आलुरे गुरुजींचं कार्य, विचार जितके उत्तुंग होतं, तितकीच त्यांची राहणी साधी होती. शिक्षणक्षेत्रात निरपेक्षपणे काम कसं काम करावं, याचं गुरुजी हे मुर्तीमंत उदाहरण होते. गुरुजींनी राज्याच्या विधीमंडळात तालुक्याचं प्रतिनिधीत्वं केलं. परंतु त्यांनी पहिली पसंती ही कायम विद्यार्थ्यांना शिकवण्यालाच राहीली.

गुरुजींनी त्यांच्या आचार, विचार, विहारातून अनुयायी जोडले. समाजाकडून निर्व्याज प्रेम, आदर, विश्वास मिळवलेलं त्यांचं व्यक्तिमत्वं होतं. त्यांचं निधन ही तालुक्याच्या, जिल्ह्याच्या, राज्याच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक क्षेत्राची मोठी हानी आहे. मी स्वर्गीय गुरुजींना विनम्र आदरांजली अर्पण करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in