ऐन उन्हाळ्यात बंद केलेला पाणी पुरवठा माजी मंत्री लोणीकरांनी पुन्हा सुरू केला..

ही योजना ग्रामीण भागातील जनतेसाठी सुरू करण्यात आली आहे. योजनेचे पाणी बंद कराल तर याद राखा, असा दम देखील त्यांनी यावेळी संबंधितांना भरला.
Bjp Mla babanrao lonikar Restart Water Supply  news Jalna
Bjp Mla babanrao lonikar Restart Water Supply news Jalna

परतूर : मराठवाडा वाॅटरग्रीड योजनेतून परतुर मतदारसंघात सुरू करण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेचे पाणी वीज बील थकले म्हणून संबंधित कंत्राटदाराने बंद केले होते. याची माहिती मिळताच माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी तिकडे धाव घेत योजनेचा पाणीपुरवठा पुन्हा सुरू केला. परत पाणी बंद कराल तर याद राखा, असा दम देखील त्यांनी संबंधित कंत्राटदारास भरला.

भाजप सरकारच्या काळातील मराठवाडा वाॅटरग्रीड ही महत्वाकांक्षी योजना होती. तत्कालीन पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी या योजनेसाठी खूप प्रयत्न केले होते. परंतु सध्या ही योजना महाविकास आघाडी सरकारने बासनात गुंडाळून ठेवली आहे. दरम्यान वाॅटरग्रीड योजनेच्या माध्ममातून लोणीकर मंत्री असतांना त्यांनी परतूर मतदारसंघातील जनतेची तहान भागवण्यासाठी काही गावांमध्ये पाणीपुरवठा योजना सुरू केली होती.

परंतु ऐन उन्हाळ्यात गेल्या काही दिवसांपासून ग्रामपंचायतींकडे वीज बील थकल्यामुळे संबंधित कंत्राटदार कंपनीने संबंधित गावातील योजनांचा पाणी पुरवठा बंद केला होता. राज्यात व जालना जिल्ह्यात कोरोनाचे संकट आहे. गेल्या वर्षभरापासून ग्रामपंचायतींची पाणी पट्टी वसुली पुर्णपणे बंद आहे. त्यामुळे आधीच संकटात असलेल्या जनतेला उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, म्हणून बबनराव लोणीकर यांनी पुढाकार घेत बंद केलेल्या गावातील योजनाचा पाणी पुरवठा स्वतः पुर्वत सुरू केला.

ही योजना ग्रामीण भागातील जनतेसाठी सुरू करण्यात आली आहे. योजनेचे पाणी बंद कराल तर याद राखा, असा दम देखील त्यांनी यावेळी संबंधितांना भरला. परतुर तालुक्यातील नागापूर येथे जाऊन लोणीकरांनी योजनेचा पाणीपुरवा नागापूर तालुका परतुर येथे जाऊन पाणी पुरवठा सुरू केल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

शंभर गावांत प्रत्यक्ष पाणी..

परतु-मंठा व जालना तालुक्यातील १७६ गावांची तहान भागवण्यासाठी ही योजना कार्यन्वित करण्यात आली होती. सध्या शंभर गावांत प्रत्यक्षात योजनेचे पाणी पोहचले आहे. मात्र पाणीपट्टी व इतर कारणे देत कंत्राटदाराने गेल्या आठ दिवसापासून योजनेचा पाणीपुरवठा खंडित केला होता.

गेल्या वर्षभरापासून कोरोना संकटात जनता भरडली जात असतांना वीज बील थकले या कारणावरून  योजनेचे पाणी बंद करणे सयुक्तिक नसल्याचे लोणीकरांनी जिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांच्या लक्षात आणून दिले. पाणी पुरवठा सरु करतांनाच त्यांनी ग्रामपंचायतींना देखील पाणीपट्टी भरून सहकार्य करण्याचे आवाहन केले.

प्रति कुटुंब दीडशे रुपये अवघड नाही

गेल्या वर्षी झालेली अतिवृष्टि व कोरोनाच्या भयंकर महामारीचा विचार करत सदरील योजनेचे एक कोटी इतके वीज बील आपण योजनेच्या खर्चातून भरल्याचे  देखील लोणीकर यांनी यावेळी सांगितले. वॉटर ग्रीड योजनेच्या माध्यमातून जनतेला शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पाणीपट्टी वसुली गरजेचे आहे. या कामात सरपंच, ग्रामसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, गटविकास अधिकारी यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन देखील लोणीकरांना केले. 

प्रति कुटुंब १५० रुपये पाणीपट्टी भरणे अवघड नाही. १५ व्या वित्त आयोग व इतर माध्यमातून ग्रामपंचायतींना थकबाकी भरावी असे आवाहन करतांनाच सौर उर्जेचा वापर करत वीज बील कसे कमी येईल यासाठी ग्रामपंचायतींनी प्रयत्न करावेत, असा सल्ला देखील लोणीकरांनी दिला.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com