माजी मंत्री लोणीकर म्हणतात कंपन्यांनी खताचे भाव वाढवले, केंद्र व राज्य सरकारने सबसिडी वाढवावी..

गेले वर्षभर कोरोना महामारी, अतिवृष्टी, चक्री वादळ आणि अन्य नैसर्गिक संकटांमुळे महाराष्ट्रातील शेतकरी संकटातआहे.
bjp mla lonikar news jalna
bjp mla lonikar news jalna

जालना ः खत उत्पादक कंपन्यांनी गेल्या काही दिवसात खताच्या किंमतीत वाढ केली आहे. त्यामुळे पडणारा बोजा लक्षात घेऊन शेतकऱ्यांना खताच्या खरेदीसाठी केंद्र सरकारने सबसिडीत वाढ करावी. (Former minister Lonikar says companies have increased fertilizer prices, central and state governments should increase subsidies.)  तसेच  राज्य सरकारने देखील खत खरेदीवर किमान प्रतिबॅग ५०० रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केली आहे.

लोणीकर यांनी या संदर्भातील पत्र  केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर, रासायनिक व खत मंत्री सदानंद गौडा, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. गेले वर्षभर कोरोना महामारी, अतिवृष्टी, चक्री वादळ आणि अन्य नैसर्गिक संकटांमुळे महाराष्ट्रातील शेतकरी संकटात आहे. (Farmers in Maharashtra are in crisis due to natural calamities.) अशातच उत्पादक कंपन्यांनी खताच्या किंमती वाढवल्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरेडच मोडणार आहे, असेही लोणीकर यांनी या पत्रात म्हटले आहे.

केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात लोणीकर म्हणाले, मान्सून काही दिवसांवर  आला असून शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीसाठी तयारी सुरू केली आहे. केंद्र सरकार १०:२६:२६, २०:२०:०:१३, २०:२६:२६:१३, १५:१५:१५, १२:३२:१६, २४:२४:०,डीएपी, पोटॅश या व यासारख्या अन्य खतांवर ३०० ते ६०० रुपयांपर्यंत सबसिडी देते. परंतु आता यात वाढ करण्याची गरज आहे. (The state government should also provide a subsidy of at least Rs 500 per bag) तर केंद्राप्रमाणे राज्य सरकराने देखील प्रतिबॅग किमान ५०० रुपयांचे अनुदान देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे. 

जुने खत जुन्या दरानेच विका..

अनेक व्यापाऱ्यांकडे जुना स्टॉक शिल्लक असून तो नव्या दराने न विकता जुन्या दरानेच विकण्यात यावा. तसेच केंद्र व राज्य सरकारने खत कंपन्यांना भाववाढ करण्यापासून रोखण्यासाठी तातडीने आदेश काढावेत. (Many traders have old stock balances and should be sold at the old rate instead of the new one.) शेतकरी संकटात असतांना भाववाढ होऊ नये, परंतु तरी देखील भाववाढ होणारच असेल तर केंद्राने आधीच्या सबसि़डीत वाढ केली पाहिजे.  राज्याने देखील याचा भार उचलून प्रतिबॅग किमान पाचशे रुपये अनुदान द्यावे.

सद्यस्थितीत कंपन्या, डीलर, सबडिलर व या प्रक्रियेतील घटक शेतकऱ्यांना वेठीस धरत असून १०:२६:२६  खताच्या बॅग बरोबर सागरिका ही २५ किलो व १० किलो (बकेट) वजनाची बॅग खरेदी करणे बंधनकारक करत आहेत.  विनाकारण शेतकऱ्यांना लुबाडले जात असून अशा कंपन्या, डीलर, सबडिलरचे  लायसेन्स रद्द करण्यात यावे, अशी मागणी देखील लोणीकर यांनी पत्रात केली आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com