माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर कोरोना पॉझिटिव्ह

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर सध्या कुटूंबियांसह मुंबईतच आहेत. त्यांनी परवा धुलीवंदनाच्यादिवशी रंगही खेळला.
Ex Minster Jaydutt Kshirsagar- Corona Effected News Beed
Ex Minster Jaydutt Kshirsagar- Corona Effected News Beed

बीड : शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. मुंबईतील निवासस्थानीच अलगीकरणात ते उपचार घेत असून त्यांची प्रकरणी उत्तम आहे. क्षीरसागर कुटूंबियांसोबत मुंबईतच आहे. तीन दिवसांपूर्वी त्यांनी कुटूंबियांसोबत धुलीवंदनाच्या दिवशी रंगही खेळला.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राजकीय नेते, लोकप्रतिनिधी यांना देखील मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले. यात महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती. अनेकांनी त्यावर यशस्वीरित्या मात करत पुन्हा कामाला सुरूवात केली. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना दोनदा कोरोना संसर्ग झाला होता.

क्षिरसागर यांना कोरोना सदृष्य लक्षणे जाणवू लागल्याने त्यांनी गुरुवारी कोरोना चाचणी केली. यात त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती क्षिरसगांर यांच्याकडून देण्यात आली. मुंबई येथील निवासस्थानी विलगीकरण करून घेऊन त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, इतरांनीही खबरदारी घेऊन आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन जयदत्त क्षीरसागर यांनी केले आहे.

दरम्यान, कोरोना विषाणू संसर्गाच्या पहिल्या लाटेत गेल्या वर्षी जयदत्त क्षीरसागर यांच्या पुढाकाराने लॉकडाऊन काळात गरजवंतांना मोफत किराणा व धान्याचे किट वाटप करण्यात आले, बाहेर जिल्ह्यातून आलेल्यांना सैनिकी शाळेत निवास व भोजनची सोय करुन देण्यात आली, त्यांच्या होमिओपॅथीक महाविद्यालयाच्या वतीने अर्सेनिक अल्बम या गोळ्यांचे वाटपही करण्यात आले होते.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com