नियमांचे पालन, पोलिसांच्या परवानगीनेच कार्यक्रम घेतला..

सोशल डिस्टन्स, बैठक व्यवस्था किती लोक येणार याची सगळी माहिती आम्ही पोलिसांना दिली. एवढेच नाही तर बैठक व्यवस्था देखील पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच सहाफुटांचे अंतर राखून करण्यात आली होती.
mp bhagwat karad replay on shivsena-mim news
mp bhagwat karad replay on shivsena-mim news

औरंगाबादः कोरोनाच्या संकटाची आणि तो टाळण्यासाठीच्या नियमांची जाणीव आणि काळजी आम्हाला देखील आहे. त्यामुळेच मराठवाडा-विदर्भासाठीच्या व्हर्च्युल रॅलीत सहभागी होतांना आम्ही सगळ्या नियमांचे पालन आणि पोलिसांच्या परवानगीनेच कार्यक्रम घेतला. मग आमच्यावर कारवाई काय करणार? असा पलटवार भाजपचे खासदार डॉ. भागवत कराड यांनी शिवसेना- एमआयएमवर केला.

केंद्रीय राज्यमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या भाषणात देखील कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी केंद्र सरकार काय उपाययोजना करत आहे? याची माहिती आणि आत्मनिर्भर कसे होता येईल, याचाच सर्वाधिक उल्लेख होता. त्यामुळे विरोधकांनी विनाकारण यावरून राजकारण करू नये, असा टोलाही कराड यांनी लगावला.

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला सहा वर्ष पुर्ण झाली आहेत. गेल्या पाच वर्षात आणि आताच्या एक वर्षात सरकाने जनतेसाठी घेतलेले निर्णय आणि राबवलेल्या योजनांची माहिती देण्यासाठी व्हर्च्युल रॅलीची संकल्पना आखण्यात आली होती. कोरोनाच्या काळात गर्दी जमा न करता डिजीटल आणि आॅनलाईनच्या माध्यमातून देखील हे शक्य आहे, हे आम्ही दाखवून दिले, असा दावा डॉ. कराड यांनी केला.

कराड म्हणाले, औरंगाबादेतील व्यवस्थेची जबाबदारी माझी होती, त्यामुळे गेल्या वीस दिवसांपासून परवानगी आणि स्थळ निश्चितीसाठी मी प्रयत्न करत होतो. शहरातील तापडिया नाट्यमंदीर आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचा हॉल ही दोन स्थळ मी परवानगीसाठी पोलिसांना सुचवली होती. पण तापडिया नाट्यमंदिरासाठी महापालिका आयुक्तांची परवानगी घ्यावी लागेल असे सांगण्यात आले. त्यांनतर पोलीस आयुक्तांकडे आम्ही आयएमए हॉल निश्चित करून परवानगी मागितली. 

पण हा हॉल खाजगी असल्यामुळे परवानगीची आवश्यकता नाही असे क्रांतीचौक पोलिसांनी कळवले. तरी सोशल डिस्टन्स, बैठक व्यवस्था किती लोक येणार याची सगळी माहिती आम्ही पोलिसांना दिली. एवढेच नाही तर बैठक व्यवस्था देखील पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच सहाफुटांचे अंतर राखून करण्यात आली होती. शंभरजणांना आम्ही या व्हर्च्युल रॅलीत सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले होते, प्रत्यक्षात सत्तर लोकच या कार्यक्रमाला हजर होते. त्या खुर्च्या देखील अजून आयएमए हॉलमध्येच आहेत.

त्यामुळे आम्ही काही तरी चुकीचे केले, सोशल डिस्टन्सचे नियम पायदळी तुडवले असा जो आरोप शिवसेना व एमआयएमकडून केला जातोय, तो अत्यंत चुकीचा आणि तथ्यहीन आहे. केवळ राजकीयद्वेषातून ही टिका आणि आरोप आमच्यावर केला जातोय. आम्ही नियमांचे उल्लंघन केलेच नाही तर मग एमआयएम आमच्यावर कारवाईची मागणी कशी करत आहे, आणि पोलिस किंवा प्रशासन तरी आमच्यावर काय कारवाई करतील, असा प्रश्न देखील कराड यांनी उपस्थित केला.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com