कारखान्यात पाचशे लोक चालतात, लग्नात शंभरही नाही; कोरोनाशी अधिकाऱ्यांचे सेटिंग?

बहुदा कोरोना विषाणूने प्रशासनाला एक विस्तृत कार्यक्रम दिला आहे, ज्या नूसार आम्ही म्हणजे कोरोना विषाणू कुठे, केव्हा, कधी हल्ला करणार याचे वेळापत्रकच दिले असावे.
Mp Imtiaz Jalil Reaction About Lock Down News Aurangabad
Mp Imtiaz Jalil Reaction About Lock Down News Aurangabad

औरंगाबाद ः जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची बहुदा कोरोना विषाणू सोबत बैठक झाली असावी, आणि त्यात कोरोनाने मी कुठल्या दिवशी,  कुठे किती वाजता येईल हे त्यांना सांगितले असावे. त्यामुळे शनिवार, रविवार पुर्णःत बंदचा निर्णय घेण्यात आला असावा, असा टोला खासदार इम्तियाज जलील यांनी प्रशासनाला लगावला. अशंत लाॅकडाऊनची घोषणा केल्यानंतर इम्तियाज जलील यांनी प्रशासनाच्या कारभाराबद्दल आश्चर्य व्यक्त करणारी प्रतिक्रिया सोशल मिडियाच्या माध्यमातून दिली आहे.

शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेतला प्रशासनाने काल काही निर्णय घेतले. यात प्रामुख्याने ११ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान शनिवार, रविवार संपुर्ण लाॅकडाऊन सह विविध निर्णयांचा समावेश आहे. काहीजणांनी प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले तर राजकीय पक्षांकडून समिश्र प्रतिक्रिया आल्या. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मात्र या निर्णयावर तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

जिल्हा प्रशासनाने अंशत लाॅकडाऊनची घोषणा केल्यानंतर काही वेळातच इम्तियाज जलील यांनी आपल्या फेसबुक पेजवरून या निर्णयाची खिल्ली उडवली. इम्तियाज जलील आपल्या पोस्टमध्ये म्हणाले, जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची एक बैठक नुकतीच कोरोना विषाणूसोबत पार पडली आणि त्यातून त्यांनी शनिवार, रविवार पुर्ण लाॅकडाऊनची घोषणा केली. बहुदा कोरोना विषाणूने प्रशासनाला एक विस्तृत कार्यक्रम दिला आहे, ज्या नूसार आम्ही म्हणजे कोरोना विषाणू कुठे, केव्हा, कधी हल्ला करणार याचे वेळापत्रकच दिले असावे.

कारण ज्या पद्धतीने प्रशासनाने निर्णय घेतले आहेत, ते हास्यास्पद वाटतात. लग्न, समारंभावर बंदी घातली, पण दुसरीकडे मोठे कारखाने, उद्योग सुरू राहणार आहेत. म्हणजे मास्क घालून लग्न समारंभांना शंभर व्यक्तींनी हजेरी लावली तर चालणार नाही, पण एकाच कारखान्यात पाचशे कामगार एकत्र आले तर प्रशासनाला चालेल, हा अजब प्रकार आहे, अशी टीका देखील इम्तियाज जलील यांनी केली आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com