आजच्याच दिवशी स्थापन झाली होती मराठवाड्यातली शिवसेनेची पहिली शाखा..

८८ च्या त्या जातीय दंगलीने शिवसेनेला राजकारणात मात्र पहिल्याच फटक्यात घवघवीत यश मिळवून दिले.
Shivsena Aurangabad News
Shivsena Aurangabad News

औरंगाबाद ः दोनदा राज्याच्या सत्तेत आलेली आणि स्थापनेपासूनच मुंबईवर अधिराज्य गाजवत ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी शिवसेना मराठवाड्यात दाखल झाली ती ८ जून १९८५ रोजी. मराठवाड्यातील पहिली शाखा औरंगाबादते त्यावेळच्या मोजक्या तरुण-तडफदार शिवसैनिकांच्या प्रयत्नातून सुरू झाली. (The first branch of Shiv Sena in Marathwada was established on this day. औरंगाबाद शहराची राजकीय व सामजिक परिस्थिती विशिष्ट समुदायाचे वर्चस्व, दहशत या पार्श्वभूमीवर भगवा झेंडा घेऊन मुंबई नंतर दाखल झालेल्या शिवसेनेला मराठवाड्यातील जनतेने अक्षरशः डोक्यावर घेतले.

काॅंग्रेस, जनता दल या पक्षाचे प्रभुत्व असलेल्या औरंगाबादला ५२ दरवाजांची तटबंदी होती. ग्रामीण भागातून आपला शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांची लुटमार, दहशत अशा वातावरणामुळे येथील जनतेत प्रचंड भितीचे वातावरण होते. (Shiv Sena chief Balasaheb Thackeray's storm was starting in cities like Mumbai, Pune and Nashik) मुंबई, पुणे, नाशिक या सारख्या शहरांमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा झंजावात सुरू होता, तेव्हाच शहरातील काही मंडळी मुंबईत गेली. बाळासाहेब ठाकरेंची भेट घेत औरंगाबादला शिवसेनेची शाखा स्थापन करण्याची मागणी केली.

तोपर्यंत औरंगाबादची राजकीय आणि सामजिक परिस्थिती बाळासाहेबांच्या कानावर गेली होती. (On June 8, 1985, the first branch of Shiv Sena in Marathwada was established.) शिवसेनेच्या कंक्षा रुदावण्याच्या दृष्टीने मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादेत चाचपणी करण्याची संधी बाळासाहेबांनी हेरली आणि ८ जून १९८५ रोजी शिवसेनेचे मराठवाड्यातली पहिली शाखा स्थापन झाली. त्यावेळचे शिवसेनेचे मोजके पदाधिकाऱ्यांनी गुलमंडीवर शिवसेनेचा फलक लावून त्यावर भगवा झेंडा लावला आणि शिवसेनेचे औरंगाबादेत आगमन झाले.

सेवा, सुरक्षा विकास ही त्रिसूत्री..

सेवा, सुरक्षा आणि विकास ही त्रिसुत्री घेऊन वाटचाल सुरू केलेल्या शिवसेनेने १९८८ साली सर्वप्रथम शहरातील कत्तलखाने आणि समान नागरी कायद्याची मागणी करत मोर्चा काढला, या मोर्चात हजारो तरूण सहभागी झाले. (As soon as the morcha reached City Chowk, stones were hurled at it and riots broke out in the city.) मोर्चा सिटीचौकात येताच त्यावर दगडफेक झाली आणि शहरात दंगल भडकली. दोन समुदाय समोरासमोर आली, अनेकांची डोकी फुटली, पोलिसांनी लाठीमार, गोळीबार करत जमावाला पांगवले. दंगल शमल्यानंतर शोधाशोध आणि धरपकड सुरू झाली.

यावेळी अनेक शिवसैनिकांना अटक होऊन त्यांच्यावर खटले भरले गेले. यातील अनेक जुने शिवसैनिक आता हयात नाहीत, तर अनेकजण अजूनही कोर्टाच्या खेट्या मारत आहेत. परंतु ८८ च्या त्या जातीय दंगलीने शिवसेनेला राजकारणात मात्र पहिल्याच फटक्यात घवघवीत यश मिळवून दिले. दंगलीनंतर झालेल्या औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे तब्बल २७ नगरसेवक निवडून आले. शिवसेनेसाठी हे यश म्हणजे  उज्वल राजकीय भविष्याची नांदीच ठरले.

महापालिकेत दणक्यात एन्ट्री केलेल्या शिवसेनेने मग मागे वळून पाहिले नाही. काॅग्रेस, जनता दल या पक्षाच्या एका विशिष्ट समाजधार्जिण्या राजकारणाला कंटाळलेल्या औरंगाबादकरांनी शिवसेनेला सक्षम पर्याय म्हणून निवडले. महापौर, नगरसेवसक, सभापती, जिल्हा परिषद सदस्य, नगरपालिका, पंचायत समितीपासून ते विधानसभा, लोकसभा निवडणुकीत देखील शिवसेना सातत्याने यश मिळवत गेली.

बाळासाहेबांचे विशेष लक्ष..

महापालिका निवडणुकीच्या प्रचार सभेच्या निमित्ताने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जहाल भाषण, औरंगाबादला संभाजीनगर असे दिलेले नाव यामुळे शिवसैनिकांमध्ये चैतन्याचे वातावरण होते. मुंबईनंतर शिवसेनेला देखील सर्वाधिक यश याच औरंगाबादने दिल्यानंतर कालांतराने बाळासाहेब ठाकरे यांनी देखील आपले लक्ष या शहरावर केंद्रीत केले. वेळोवेळी मुंबईतील पदाधिकारी शहरात येऊ लागले, लागेल ती रसद, निवडणूक प्रचार व नियोजन करू लागले.

गुंडाचा पक्ष अशी हेटाळणी झालेल्या शिवसेनेकडे कार्यकर्त्यांच्या रांगा लागल्या, तरुणांनी शिवसेनेला आपली संघटना म्हणून स्वीकारले आणि शहर आणि जिल्ह्याचे राजकारणच पालटले. ६ डिसेंबर १९९२ रोजी आयोध्येत झालेल्या कारसेवेत शहरातील शिवसैनिकांचा सहभाग आणि वादग्रस्त धार्मिकस्थळ पाडल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेली प्रखर भूमिका यामुळे तर शिवसैनिकांमध्ये शिवसेनेनेबद्दलचे आकर्षण प्रचंड वाढले.

औरंगाबादेत शिवसेनाच पाहिजे या निर्धाराने निवडणूकीत जीवतोडून काम केले जायचे. त्यामुळे महापालिका, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा अशा सगळ्याच निवडणुकांध्ये शिवसेनेनेला सातत्याने यश मिळत गेले. १९९५ ते ९९ या युती सरकारच्या काळात औरंगाबादला तत्कालीन आमदार चंद्रकांत खैरे यांच्या रुपाने मंत्रीपद मिळाले. महापालिकेत गेली २५ वर्ष शिवसेनेची सत्ता आहे, शहर तसेच ग्रामीण भागातील अनेक विधानसभा मतदारसंघात देखील शिवसेनेचे आमदार निवडून आलेले  आहेत.

सातत्याने यश मिळाले..

गेली ३० वर्ष औरंगाबाद लोकसभा मतदारसंघावर देखील शिवसेनेचाच भगवा फडकत होता. आता सुद्धा राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीची सत्ता आहे. आतापर्यंतच्या राजकीय इतिहासात जिल्ह्यात पहिल्यांदाच शिवसेनेचे सात आमदार निवडून आलेले आहे. जिल्ह्याला एक कॅबिनेट व एक राज्यमंत्रीपद देखील मिळाले आहे. सत्तेत असतांना आणि विरोधीपक्ष म्हणून देखील शिवसेनेच्या त्या त्या काळातील आमदार, खासदारांनी आपल्यापरीने शहर व जिल्ह्याच्या विकासात योगदान दिले आहे.

२०१९ मधील लोकसभेतील पराभव वगळता औरंगाबादकरांनी शिवसेनेची झोळी कधीच रिती ठेवली नाही. औरंगाबादमध्ये लावलेल्या शिवसेनेच्या या रोपट्याचा विस्तार मराठावाडाभर झाला आणि जालना, परभणी, हिंगोली, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या सगळ्या शहरांमध्ये या पक्षाची पाळेमुळे आज रूजली आहेत.

अशा या मराठवाड्यातील पहिल्या शिवसेना शाखेचा आज ३६ वा वर्धापन दिन आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतरचा हा पहिलाच वर्धापनदिन  असल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आज उद्धव ठाकरे या निमित्ताने जिल्ह्यातील शिवसैनिकांशी संवाद देखील साधणार आहेत.  

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com