केंद्राने दिलेली आर्थिक मदत अजून दिसत नाही..

कोरोना संकटावर मात करण्यासाठी डॉक्टर, जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, लोकप्रतिनिधी इतकेच नाही तर लोकांचे सहकार्यही महत्त्वाचे आहे. ज्या सूचना सरकार करत आहे त्याचे काटेकोर पालन जनतेकडून होताना दिसत आहे अशा शब्दात शरद पवारांनी जनतेचे कौतुकही केले.
sharad pawar press conference news aurangabad
sharad pawar press conference news aurangabad

औरंगाबाद ः  केंद्राने दिलेली मदत अजून राज्यात आलेली दिसत नाही, असा चिमटा काढत आता उद्योगधंदा कसा सुरू होईल याकडे लक्ष द्यायला हवे. जसा आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे तसाच राज्याचा आर्थिक प्रश्नही महत्त्वाचा असून राज्याची आर्थिक बाजू बळकट करण्यासाठी औद्योगिक क्षेत्र सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भावाचा आढावा पालकमंत्री सुभाष देसाई, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकार्‍यांच्या उपस्थितीत शरद पवार यांनी आज घेतला.

त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना शरद पवार म्हणाले, देशातील साधारण पाच-सहा राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, कर्नाटक यापैकी महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग अधिक आणि काळजी करण्या सारखा आहे. मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, कल्याण, डोंबिवली, औरंगाबाद या भागातील परिस्थिती आता सुधारत असली तरी आणखी काळजी घेण्याची गरज आहे. 

प्रादुर्भावाचा डबलिंग रेट हा १४ दिवसावरून ३० दिवसावर जाणे ही मोठी गोष्ट आहे. कोरोना संकटावर मात करण्यासाठी डॉक्टर, जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, लोकप्रतिनिधी इतकेच नाही तर लोकांचे सहकार्यही महत्त्वाचे आहे. ज्या सूचना सरकार करत आहे त्याचे काटेकोर पालन जनतेकडून होताना दिसत आहे अशा शब्दात शरद पवारांनी जनतेचे कौतुकही केले.

खाजगी डाॅक्टरांची मदत घ्या..

देशात किंवा राज्यात भूकंप, अतिवृष्टी साथ रोग अशा आपत्तीच्या काळात आपत्ती व्यवस्थापन कायद्यानूसार शासकीय यंत्रणेला आवश्यक त्या सगळ्या यंत्रणा ताब्यात घेण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे आता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खाजगी डाॅक्टरांची मदत घेण्याची गरज आहे.

डिजास्टर मॅनेजमेट अॅक्टनूसार जिल्हाधिकारी यासाठी खाजगी डाॅक्टरांना समन्स देखील बजावू शकतात, अशी माहिती शरद पवारांनी यावेळी दिली. मालेगाव, धारावीचे उदाहरण आपल्यासमोर आहे. जे सहकार्य तिथल्या लोकांनी केले तसेच सहकार्य औरंगाबाद शहरातील जनताही करेल आणि संकटावर मात करेल, असा विश्वासही पवारांनी व्यक्त केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com