राज्यातील शाळा सुरू करण्याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेणार..

तिसर्‍या लाटेत सर्वाधिक रुग्ण केरळ राज्यात आणि दुसरा क्रमांक हा महाराष्ट्राचा लागत आहे.
deputy chief Minister Ajit Pawar  news Mumbai
deputy chief Minister Ajit Pawar news Mumbai

मुंबई ःराज्यातील शाळा कधी सुरू होणार या प्रश्नावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. (The final decision to start schools in the state will be taken by the Chief Minister.) राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन डोस पूर्ण करावेत अशा सूचना देण्यात आल्या असून तसा निर्णय घेण्यात आला असल्या अजित पवार यांनी सांगितले.

दरम्यान आपला पाल्य ज्या शाळेत जातोय त्या शिक्षकांचे लसीचे दोन डोस पूर्ण झाल्यास पालकांना दिलासा मिळेल. (Deputy Chief Minister Ajit Pawar Maharashtra) राज्यातील शाळा सुरू करण्याबाबतचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री टास्कफोर्सशी चर्चा करुन घेणार आहेत.

मात्र केंद्राकडून गर्दी करणारे उत्सव घरगुती पध्दतीने साजरे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (Chief Minister Uddhav Thackeray, Maharashtra) काही राज्यात शाळा सुरू करण्यात आल्या मात्र काही दिवसातच विद्यार्थी पॉझिटिव्ह सापडले होते.

शिवाय तिसर्‍या लाटेत सर्वाधिक रुग्ण केरळ राज्यात आणि दुसरा क्रमांक हा महाराष्ट्राचा लागत आहे.  त्यामुळे केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने राज्याला काही सूचना केल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

मराठवाड्यातील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा..

राज्यासह मराठवाड्यातील काही भागांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घरांची पडझड, जनावरे, शेतजमीनी, पिके वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. मराठवाड्यात ज्या भागात अतिवृष्टीने नुकसान झाले आहे, त्याचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश अजित पवार यांनी दिले आहेत.

मराठवाडयात झालेल्या अतिवृष्टीबाबत जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत शिवाय त्या - त्या जिल्हयाचे पालकमंत्री घटनास्थळी पोचले आहेत. मराठवाडयात झालेल्या अतिवृष्टीने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

शिवाय जमीनी खरवडून निघाल्या आहेत, तर काही भागात घाट कोसळून वाहतूकही ठप्प झाली होती. याबाबत कालच कॅबिनेटमध्ये चर्चा झाली, मुख्यमंत्र्यांनी योग्य त्या सूचना दिल्या आहेत. त्या - त्या जिल्हयाचे जिल्हाधिकारी या सगळ्या नुकसानीची पाहणी करत आहेत.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com