Fighter Shivajirao Nilangekar defeated Corona | Sarkarnama

लढवय्या शिवाजीराव निलंगेकरांची कोरोनावर मात 

राम काळगे
रविवार, 2 ऑगस्ट 2020

एक संघर्षशील व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख असल्याने कोरोना विरूद्धची लढाई ते नक्कीच जिंकतील असा विश्वास निलंगेकर कुटूंबियांनी व्यक्त केला  होता. त्यांचे वय ९१ वर्षे असल्याने व पूर्वीचे आजार लक्षात घेता अधिक काळजी घेतली जात होती. रूग्णालयात उपचार सुरू असतांना डाॅ. निलंगेकर  वृृत्तपत्रे, पुस्तके नियमित वाचत होते. मधुमेह, रक्तदाब, किडणीचा त्रास त्यातच कोरोनाची लागण झाल्याने डाॅक्टरांनी त्यांना अतिदक्षता विभागातील विलगीकरणात ठेवले होते.

निलंगा : काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंञी डाॅ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी वयाच्या ९१ व्या वर्षी कोरोनावर मात केली आहे. शनिवारी (ता.१) त्यांची पुन्हा चाचणी घेण्यात आली असता ती निगेटीव्ह आली. त्यांचे पुत्र अशोक पाटील निलंगेकर यांनी ही माहिती दिली. 

काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे राजकीय जीवन संघर्षमय राहिले आहे. अनेक कठीण प्रसंगांना तोंड देत त्यांनी यावर यशस्वीपणे मातही केली. अतिशय शिस्तप्रिय म्हणून त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे. स्वातंत्र्य पूर्व काळापासून  देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातही त्यांचा सहभाग होता. स्वातंत्र्यसेनानी म्हणून सरकारने त्यांचा गौरव केला असला तरी स्वांतत्र्यसैनिकांना मिळणाऱ्या पेन्शनचा लाभ त्यांनी कधी घेतला नाही.

एक संघर्षशील व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख असल्याने कोरोना विरूद्धची लढाई ते नक्कीच जिंकतील असा विश्वास निलंगेकर कुटूंबियांनी व्यक्त केला  होता. त्यांचे वय ९१ वर्षे असल्याने व पूर्वीचे आजार लक्षात घेता अधिक काळजी घेतली जात होती. रूग्णालयात उपचार सुरू असतांना डाॅ. निलंगेकर  वृृत्तपत्रे, पुस्तके नियमित वाचत होते. मधुमेह, रक्तदाब, किडणीचा त्रास त्यातच कोरोनाची लागण झाल्याने डाॅक्टरांनी त्यांना अतिदक्षता विभागातील विलगीकरणात ठेवले होते.

वैद्यकीय नियम व निकषानुसार इतरांना त्यांच्या संपर्कात येऊ दिले जात नव्हते. दरम्यान, उपचाराच्या वेळी  निलंगेकर कुटूंबिय व त्यांचे निकटवर्ती माधवराव माळी वेळोवेळी डाॅक्टारांकडून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेत होते. लातूरहून पुण्याला हलवल्यानंतर ते कोरोना विरुध्दची लढाई निश्चितच जिंकतील असा विश्वास त्यांच्या कुटुंबियांना होता.  मानसिकदृृष्ट्या ते खंबीर असल्याने कुटुंबियाचा हा विश्वास खरा ठरला.

रुग्णालयातूनही तालुक्याची चौकशी

शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा १६ जुलै रोजी लातूर येथील खाजगी रुग्णालयात कोरोना अहवाल पाॅझिटीव्ह आला होता. त्यानंतर  कुटूंबियानी पुढील उपचारासाठी निलंगेकर यांना पुण्याला हलवले होते. त्यांचे चिरंजिव प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर, डाॅ. शरद पाटील निलंगेकर, विजयकुमार पाटील निलंगेकर हे देखील दरम्यानच्या काळात क्वारंटाईन होते.

उपचार सुरू असतांनाही ते निलंग्यातील कोरोना विषयी परिस्थितीची विचारपूस सातत्याने करायचे.अगदी लातूरहुन निघण्यापूर्वीसुध्दा ते मोबाईलवरून अधिकार्‍यांशी बोलले होते. त्यांचे मनोबल आणि आत्मविश्वास आम्हाला सुध्दा प्रेरणादायी असून या बळावरच त्यांनी कोरोनावर मात केली असून  ते लवकरच घरी येतील, असा विश्वास त्यांचे नातू अरविंद पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केला.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख