पंधरा वर्षापूर्वी राजीवची पहिली भेट झाली, तेव्हाच त्याच्यात चमक दिसली..

लोकसभेत राजीव एकटा नाही तर पाच ते सात जणांचे काम करत होता, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्याच्याबद्दल वाईट बोलणाऱ्यांबद्दल देखील राजीव कधी वाईट बोलला नाही.
Congress Leader Rahul Gandhi- let Rajiv Satav News Aurangabad
Congress Leader Rahul Gandhi- let Rajiv Satav News Aurangabad

औरंगाबाद ः राजकारणात थोडे यश, प्रतिष्ठा मिळाली की अनेकांमध्ये गर्व निर्माण होतो. पण राजीव सातव हा काॅंग्रेस परिवाराचा असा सदस्य होता ज्याच्यामध्ये जरा देखील गर्वाची भावना नव्हती. खरेपणा, नम्रता आणि कुणाबद्दल कधीच वाईट न बोलण्याचा त्याचा गुण, स्वभाव याचा मला व सातव कुटुंबियांना नक्कीच गर्व आहे. (Fifteen years ago, when Rajiv first met him, he saw a sparkle in him, Said, Rahul Gandhi)  १०-१५ वर्षांपूर्वी माझी आणि राजीवची पहिल्यांदा भेट झाली. टॅलेंट हंटच्या निमित्ताने युवक काॅंग्रेसच्या सात-आठ तरूणांमध्ये राजीव बसला होता. तेव्हा मला त्याच्यात चमक दिसून आली होती, अशी आठवण काॅंग्रेचे नेते राहुल गांधी यांनी सांगितली.

स्व. राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटीच्या वतीने व्ह्रर्चुयल श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बोलतांना राहूल गांधी यांनी राजीव सातव यांच्याबद्दलच्या आठवणी सांगितल्या. (Rahul Gandhi shared his memories of Rajiv Satav.) देशाला आणि काॅंग्रेस  पक्षाला राजीव सारखा तरुण नेता दिल्याबद्दल राहुल गांधी यांनी सातव कुटुंबाचे आभारही मानले.

राहुल गांधी म्हणाले, राजीवचे दोन परिवार होते, पैकी आई, पत्नी आणि दोन मुले हा एक परिवार आणि काॅंग्रेस पक्ष व त्याच्या विचारसरणीला मानणारे देशभरातील लाखो, करोडो नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते हा दुसरा परिवार. राजीव यांच्या अचनाक जाण्याणे सातव कुटुंबाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे, त्यानंतर काॅंग्रेस पक्षाचे. मला आजही आठवते १०-१५ वर्षापूर्वी माझी आणि राजीवची पहिल्यांदा भेट झाली ती टॅलेंट हंट या युवक काॅंग्रेसच्या कार्यक्रमा निमित्त. (Rajiv first met Talent Hunt on the occasion of Youth Congress.) तिथे एका हाॅलमध्ये उपस्थित सात-आठ तरूण चेहऱ्यांमध्ये मला राजीवच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसली.

मी एका खोलीत जेव्हा राजीवला बोलावले आणि विचारले की या सात-आठ तरूण-तरुणींपैकी तुला सर्वाच चांगल कोण वाटलं. मी जेव्हा जेव्हा राजीवला हा प्रश्न केला तेव्हा त्याने स्वतःचे नाव एकदाही घेतले नाही. इतर कसे चांगले आहेत हेच तो शेवटपर्यंत सांगत होता. तुझ्याबद्दल काही तरूण वाईट बोलत होते, असे सांगून त्याची प्रतिक्रिया काय उमटते हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण वाईट बोलणाऱ्यांबद्दल देखील त्यांने चुकीचे शब्द वापरले नाही.

नम्रता आणि खरेपणाचा गर्व..

युवक काॅंग्रेसचे अनेक वर्ष त्याने काम केले, पण कधी कुणाबद्दल राजीव वाईट बोलला असे जाणवले नाही. राजकीय लोकांमध्ये अभावाने सापडणारा नम्रता, खरेपणा हा गुण राजीवमध्ये ठासून भरलेला होता. (The virtue of humility and truthfulness was instilled in Rajiv.) याचा मला आणि सातव कुटुंबाला निश्चितच गर्व आहे. एकदा लोकसभेत आम्ही निदर्शने करत होतो. कडक उन्हाळ्याचे दिवस होते. निदर्शने करत आम्ही काॅंग्रेसचे सर्व खासदार महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर उन्हात उभे राहून निदर्शने करत होतो. पाऊण तास राजीव न थांबता न थकता घोषणा देत होता.

लोकसभेत राजीव एकटा नाही तर पाच ते सात जणांचे काम करत होता, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्याच्याबद्दल वाईट बोलणाऱ्यांबद्दल देखील राजीव कधी वाईट बोलला नाही.(In the Lok Sabha, Rajiv was not alone but was working for five to seven people) राजीव सारखा सैनिक काॅंग्रेस पक्षाला व देशाला दिल्याबद्दल सातव कुटुंबियांना गर्व असायला हवा, असेही राहुल गांधी म्हणाले.

आपला आधार गेला, आता आपल्या कुटुंबाचे काय होणार? असा प्रश्न राजीवच्या आई रजनी ताई, पत्नी प्रज्ञा, मुलगा पुष्पराज व मुलगी तितली यांना पडला असेल. पण मी आधी सांगितल्या प्रमाणे राजीवचे दोन परिवार होते, आणि त्याचा दुसरा परिवार म्हणून काॅंग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा, आहे असा विश्वास आणि धीर देखील राहुल गांधी यांनी यावेळी दिला.

माझा मित्र नाही, यावर विश्वास बसत नाही..

राजीव या संकटावर मात करेल असे वाटत होते. तो रुग्णालयात असतांना माझे डाॅक्टरांशी बोलणे व्हायचे. मी मेसेज पाठवायचो, त्याला उत्तरही मिळायचे. राजीव यातून बाहेर निघेल असा विश्वास होता. आजही माझा मित्र आता राहिला नाही यावर माझा विश्वास बसत नाही. राजीव याने दाखवलेल्या मार्गावरच यापुढे काॅंग्रेस, युवक काॅंग्रेस व आमच्या पक्षाचे सगळे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मार्गक्रमण करतील, अशी ग्वाही देखील राहुल गांधी यांनी यावेळी दिली.

राहुल गांधी यांनी आपल्या श्रद्धांजली संदेशात वारंवार रजनी सातव, प्रज्ञा, पु्ष्कराज व तितली यांचा नावानीशी उल्लेख केला. यावरून राहुल गांधी यांचे आणि राजीव व सातव परिवाराचे किती घनिष्ठ संबंध होते हे दिसून आले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com