माजी मंत्री क्षीरसागरांकडून पंधरा हजार गरजूंना आधार

शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १० लाख रुपयांची मदत दिली. आता लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात मदतीचा ओघ आटत असताना जयदत्त क्षीरसागर धाऊन आले आहेत.
aidatt kshirsagar madat news beed
aidatt kshirsagar madat news beed

बीड : शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्याकडून लॉकडाऊनमुळे अडचणीत असलेल्या १५ हजार गरजू कुटूंबियांना जीवनावश्यक वस्तूंसह दैनंदिन गरजेच्या किटचे वाटप करण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या दोन टप्प्यात मोठ्या प्रमाणावर मदतीचा ओघ होता. परंतु, तिसऱ्या टप्प्यात ओघ ओसरत असताना जयदत्त क्षीरसागर यांच्या मदतीमुळे गरजू कुटूंबियांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कोरोनाच्या संकटाशी संपुर्ण राज्य लढा देत असतांना हातावर पोट असणाऱ्या गोरगरिब गरजूंसाठी अन्नधान्य आणि दैनंदिन गरजेच्या महिनाभर पुरतील एवढ्या वस्तू पुरवत क्षीरसागर यांनी सामाजिक बांधिलकी  जपली आहे. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे दोन महिन्यांपासून कामगार, मजूर, सामान्य कुटूंब घरामध्ये बसून आहेत. हाताला काम नाही अन पोट हातावरचे अशा परिस्थितीत या कुटूंबियांसमोर संकटाचा डोंगर उभा राहिला आहे.

प्रत्येक जण एकमेकाला या कठीण परिस्थितीमध्ये मदतीचा आधार देत होता. गेली ५० दिवस या मदतीवरच हजारो कुटूंब आपला उदरनिर्वाह भागवत होते. मात्र पुन्हा लॉकडाऊन वाढल्याने आता काय खायचे? असा प्रश्न निर्माण झाला. आतापर्यंत अनेक सामाजिक संस्था, संघटना राजकीय पक्ष, नेते, लोकप्रतिनिधींनी गरीबांना मदतीचा हात देत त्यांची काळजी वाहिली.

पण लॉकडाऊनचा कालावधी वाढल्याने मदतीचा ओघ काहीसा मदांवला, त्यामुळे गरीबांच्या पोटाचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला. अशा शेकडो गरजूंसीठी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर पुन्हा एकदा धावून आले. त्यांनी १५ हजार गरीब, सामान्य कुटूंबाना एक महिना पुरेल एवढ्या जीवनावश्यक वस्तूच्या सामानाचे कीट वाटप केले.  प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन हे वाटप सुरू आहे.

क्षीरसागरांची ही मदत जेरीस आलेल्या कुटूंबांना दिलासादायक ठरत आहे.  नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे, सभापती दिनकर कदम, दूध संघाचे चेअरमन विलास बडगे, जगदीश काळे, अरुण डाके, दिलीप गोरे, वैजीनाथ तांदळे, गणपत डोईफोडे, सखाराम मस्के, सुनील सुरवसे, सुभाष क्षीरसागर, गोरख शिंगण हे यासाठी परिश्रम घेत आहेत.

मुख्यमंत्री सहायता निधीलाही १० लाख

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या लढाईसाठी मुख्यमंत्री सहायता निधी साठी मदत करण्याचे आवाहन केले होते. यातही जयदत्त क्षीरसागर यांनी १० लाख ५०० रुपयांची मदत केली होती.
आता त्यांनी १५ हजार कुटूंबियांच्या मदतीसाठी धाव घेतली आहे. मदतीचा ओघ सुरूच राहील, घरा बाहेर पडू नका, सरकारच्या सूचनांचे पालन करा, कोरोना हरेल आपण जिंकू , बीड जिल्हा ग्रीन झोनमध्ये कायम राहील असा विश्वास जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com