अतिवृष्टीमुळे शेतकरी कोलमडला, त्याला सरसकट नुकसान भरपाई द्या..

पावसाचा जोर एवढा होता की अनेक ठिकाणी पिके पाण्याबरोबर वाहून गेली. नदी-नाल्यांच्या काठावरील जमिनी खरवडून निघाल्या.
Mla Satish Chavan- Minister Abdul Sattar News Aurangabad
Mla Satish Chavan- Minister Abdul Sattar News Aurangabad

औरंगाबाद ः मागील आठ-दहा दिवसांपासून मराठवाड्यात जवळपास अडीचशे महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त महसूल मंडळातील पिकांचे सरसकट पंचनामे करून शेतकर्‍यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, (The farmer collapsed due to heavy rains, compensate him completely.) अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे केली आहे.

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी  सतीश चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. (Ncp Mla Satish Chavan letter to Minister) यावेळी मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे विविध ठिकाणी फुटलेले कोल्हापूरी बंधारे, खचलेले पूल, ग्रामीण भागातील रस्त्यांची झालेली दुरावस्था आदी संदर्भात सविस्तर चर्चा झाली. चव्हाण यांनी यासंदर्भात सविस्तर निवेदनही अब्दुल सत्तार यांना दिले.

मागील काही वर्षांपासून मराठवाड्यातील शेतकर्‍यांना कधी कोरडा दुष्काळ, अतिवृष्टी, तर कधी निसर्गाचा लहरीपणाचा सामना करावा लागत आहे. (Minister Abdul Sattar, Maharashtra) त्यामुळे शेती करावी कशी असा प्रश्न मराठवाड्यातील शेतकर्‍यांना पडला आहे. नुकत्याच झालेल्या पावसाचा जोर एवढा होता की अनेक ठिकाणी पिके पाण्याबरोबर वाहून गेली. नदी-नाल्यांच्या काठावरील जमिनी खरवडून निघाल्या.

मराठवाड्यातील अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली असून शेतकर्‍यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. मूग, उडीद ही पिके ऐन काढणीच्या वेळेस अतिवृष्टी झाल्याने शेतातच खराब झाली, मुगाला तर कोंब फुटले आहे. त्यात अतिपावसामुळे आता कपाशी, सोयाबीन, मोसंबीच्या शेतातही गुडघाभर पाणी साचले आहे.

उस, मका, बाजरीची पिके आडवी झाली आहेत. कोरोनामुळे आधीच शेतीचे अर्थचक्र मोडले आहे. त्यात अतिवृष्टीमुळे सलग दुसर्‍या वर्षी देखील खरीप हंगाम हातातून निसटल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अनेक शेतकर्‍यांनी कर्ज काढून पिकांची लागवड केली. मात्र या नासाडीमुळे शेतासाठी लावलेला खर्चही वसूल झालेला नसल्याचे चव्हाण यांनी अब्दुल सत्तार यांच्या निदर्शनास आणून दिले. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com