संकटाच्या काळात फडणवीसांनी कुत्र्या, मांजराचा खेळ खेळू नये..

मी विरोधी पक्षात होतो, विरोधी पक्ष नेता होतो. मात्र अशा संकटाच्या समयी आम्ही असा कुत्र्या मांजराचा खेळ कधी खेळला नाही.
Ncp Leader Eknath Khadse- Devendra Fadanvis News Jalgaon
Ncp Leader Eknath Khadse- Devendra Fadanvis News Jalgaon

जळगाव : महाराष्ट्रावर ज्या वेळी संकट येते, त्यावेळी सत्ताधारी विरोधी पक्ष हातात हात घालून संकटाचा सामना करतात. हीच आपली परंपरा आहे, मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सद्या जो कुत्र्या मांजराचा खेळ करत आहेत, तो त्यांनी खेळू नये, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी फडणवीसांवर टीका केली.

राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलतर्फे जळगाव येथे आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्यातील सद्य परिस्थिती व विरोधी पक्षाची भूमिका यावर आपले परखड मत व्यक्त केले. पत्रकारांशी बोलतांना खडसे म्हणाले, राज्यात  कोरोना काळात विरोधी पक्ष घेत असलेली भूमिका आश्चर्यकारक आहे.  या महाराष्ट्राची परंपरा आहे, ज्या वेळी राज्यावर संकट आले त्या वेळी सर्वांनी एकत्र येवून काम केले आहे.

किल्लारीचा भूकंप असो की,  मुंबईतील बॉम्बस्फोट अशा अनेक घटनांच्या वेळी राजकारण बाजूला ठेऊन सत्ताधारी, विरोधी पक्ष यांनी हातात हात घालून संकटाचा सामना केला. त्या कालखंडात मी विरोधी पक्षात होतो, विरोधी पक्ष नेता होतो. मात्र अशा संकटाच्या समयी आम्ही असा कुत्र्या मांजराचा खेळ कधी खेळला नाही. देवेंद्र फडणवीस सध्या जे करतायेत ते एका विरोधी पक्ष नेत्यांकडून अपेक्षित नाही.

राज्यातील कोरोना संदर्भात राज्य सरकार करीत असलेल्या उपाय योजनांबाबत ते म्हणाले, राज्य सरकार आपल्या परीने प्रयत्न करत आहे, परंतु त्यांना काही मर्यादा आहेत. राज्यात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा आहे.

केंद्र सरकारने जर निर्यात केली नसती तर हा प्रसंग आज निर्माण झाला नसता. अशा कठीण प्रसंगी केंद्राने राज्याला मदत्त करायला पाहिजे. जी निर्यात बंदी आता केली आहे, ती अगोदरच करायला पाहिजे होती. आता निर्यात बंदी केली आहे, त्यामुळे इंजेक्शनचा साठा उपलब्ध होईल.

तर फडणवीसांचा अभ्यास कच्चा..

देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना खडसे म्हणाले, मला वाटतं होते की देवेंद्र फडणवीस हे चांगले भविष्यकार आहेत. आता त्यांनी पुन्हा सरकार पडण्याची २ मे ही तारीख दिली आहे. त्यामुळे आपण त्याची प्रतीक्षा करीत आहोत. जर या वेळीही सरकार पडले नाही तर फडणवीस यांचा भविष्याचा अभ्यास कचा आहे, असे आपण जाहीर करू, असा टोलाही खडसे यांनी लगावला.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com