राज्याचे नेतृत्व फडणवीसांनीच करावे, गोपीनाथ मुंडेची देखील होती इच्छा..

वंजारी सेवा संघ महाराष्ट्र यांच्या वतीने लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित लोकनेता व्याख्यानमालेत सुजितसिंह ठाकूर यांनी मुंडे यांच्या बद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. त्यातील संपादित अंश.
bjp ledear sujeetingh thakur memories gopinath munde news
bjp ledear sujeetingh thakur memories gopinath munde news

उस्मानाबादः गोपीनाथ मुंडेंना राज्याचे मुख्यमंत्री व्हायचे होते हे सगळ्यांनाच माहिती होते, पण देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आले आणि मुंडे साहेबांना केंद्रात मोठी जबादारी मिळाली. हेलीकाॅप्टर प्रवासात मी त्यांना राज्याचे काय? राज्याचे नेतृत्व कोण करणार असे विचारले होते. तेव्हा माझ्या डोक्यावर थाप मारत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोट दाखवले आणि म्हणाले, महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस सांभाळतील.

गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल विरोधकांनी अनेकदा अफवा पसरवल्या. काही कारणास्तव त्यांनी जेव्हा भाजपमधील आपल्या पदांचा राजीनामा दिला, तेव्हा मुंडे भाजप सोडणार असा अपप्रचार विरोधकांनी सुरू केला होता. मला आठवत मुंडे साहेब बीडहून औरंगाबादेत आले आणि रात्री एका ठिकाणी आम्ही सगळेजण त्यांना भेटायला गेलो. दिवंगत भाऊसाहेब फुंडकर, एकनाथ खडसे यांच्यासह आम्ही कार्यकर्ते तेव्हा हजर होतो. साहेबांनी प्रश्‍न विचारण्याची आमची हिमंत नव्हती, पण साहेब भाजप सोडणार या चर्चेनी मी देखील विचलित झालो होतो. साहेबांना जेव्हा मी विचारले, की साहेब तुम्ही भाजप सोडताय? तेव्हा त्यांनी दिलेल उत्तर प्रत्येकाने ऐकावं असंच होतो. मुंडे साहेब म्हणाले ठाकूर मी शेवटपर्यंत भाजपमध्येच राहील आणि भाजपच्या झेंड्यामध्येच जाईन. 

मुंडे साहेबांसोबत एक कार्यकर्ता, पदाधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली, सहवास लाभला. २०१४ मध्ये जेव्हा मुंडे साहेब बीडमधून लोकसभेची निवडणूक लढले तेव्हा मी प्रभारी म्हणून काम करत होतो. मोदी सरकार निवडूण आले आणि गोपीनाथ मुंडेंना केंद्रात त्यांच्या आवडीच ग्रामीण विकास खात मिळाल. सर्वाधिक बजेट असलेल्या या खात्याचा पदभार त्यांनी स्वीकारला तेव्हा दिल्लीत शपथविधी सोहळ्याला देखील मी गेलो होतो.

एकदा मी परभणी जिल्ह्यात भाजप मेळाव्यात भाषण करतांना साहेबांचा फोन आला. पण मोबाईल सायलेंट असल्यामुळे घेता आला नाही. परभणीची सभा संपवून मी हिंगोलीच्या मेळाव्याला जातांना गाडीतूनच साहेबांना चार-पाच वेळा फोन केला, पण संपर्क झाला नाही. नंतर बऱ्याच वेळानी मुंडे साहेबांचा पुन्हा फोन आला तेव्हा, ते मला म्हणाले, ठाकूर तुम्ही केंद्रीय मंत्र्याचा फोन उचलत नाही. तेव्हा मी प्रेमाने साहेब कोण केंद्रीय मंत्री, मी ओळखत नाही, मी मुंडे साहेबांना ओळखतो असे म्हणालो.

तेव्हा मी उद्या औरंगाबादला येत आहे, तिथून मला भगवानगड, चौंडी आणि पुण्याला जायचे आहे. तेव्हा तु आणि देवेंद्र फडणवीस विमानतळावर या असे त्यांनी मला सांगितले. तेव्हा मी त्यांना तुम्ही मंत्री म्हणून पहिल्यांदा मराठवाड्यात येत आहात, तर आम्हाला किमान अर्धातास वेळ द्या, अशी विनंती त्यांना केली. कार्यकर्त्याचा आग्रह मुंडे साहेब कधी मोडत नव्हते. त्यांनी होकार दिला आणि रात्रभर जागून आम्ही हिंगोलीतील सगळ्या कार्यकर्त्यांना निरोप देऊन मुंडे साहेबाच्या स्वागतासाठी वाहन रॅली काढायची असल्याचे सांगितले. देवेंद्र फडणवीस तेव्हा प्रदेशाध्यक्ष होते. त्यांनाही फोन केला आणि सकाळी आम्ही मुंडे साहेबांचे स्वागत करत दोन हजार मोटार सायकलची रॅली काढली.

मुंडे साहेब हेलीकॉप्टरने भगवानगडाकडे दर्शनासाठी निघाले तेव्हा त्यांनी सोबत देवेंद्रजी आणि मला घेतले. चौथी जागा होती, पण आता कुणी नको, मला तुमच्याशी बोलायच म्हणत त्यांनी आम्हा दोघांनाच हेलकॉप्टरमध्ये घेतले. आम्ही भगवानगडावर जाऊन दर्शन घेतले. तिथून चौडींला निघालो आणि या दरम्यान, मी साहेबांना एक प्रश्न विचारला. 

महाराष्ट्राला तुमची गरज आहे, पण केंद्राने तुमची जागा राज्यात नाही तर केंद्रात असल्याचे सांगत तुमच्यावर ग्रामविकास या  आवडत्या खात्याची जबादारी सोपवली आहे. तुम्ही दिल्लीत रमणार नाहीत हे मला माहित आहे, पण जर रमलात तर  महाराष्ट्राच्या नेतृत्वाचे काय? याबद्दल विचारले. तेव्हा महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस सांभाळतील असे त्यांनी स्पष्ट केले. मुंडे साहेबांच्या इच्छेनूसार पुढे फडणवीस यांनी पाच वर्ष राज्याचे यशस्वी नेतृत्व केले.

(शब्दांकनः तानाजी जाधवर)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com