फडणवीसांना लगीन घाई, पण बायकोच मिळेना...

नरेंद्र मोदी हे पॉलिटिकल लीडर नाहीत, ते धार्मिक नेते आहेत, एका धार्मिक ग्रुपचे नेते आहेत, ते कधीच पॉलिटीकल लिडर होऊ शकत नाही, असे उत्तर देत आंबेडकरांनी या विषयावर अधिक बोलणे टाळले. राज्यातील आघाडी सरकारचे खरे स्टेअरिंग कोणाच्या हातात आहे, यावरही तिघांच्याही हातात स्टेअरिंग असल्याचे आंबेडकर म्हणाले.
prakash ambedkar press conference news aurangabad
prakash ambedkar press conference news aurangabad

औरंगाबाद ः भाजपला विशेषतः फडणवीसांना लगीन घाई झाली आहे, ते गुडघ्याला बाशिंग बाधून बसलेत पण त्यांना बायकोच मिळत नाहीये, असा टोला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे. फडणवीसांना जोपर्यंत नवरी मिळत नाही, तोपर्यंत महाविकास आघाडीला धोका नाही असा चिमटाही त्यांनी काढला.

औरंगाबादेत लॉकडाऊन आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला परिस्थिती याबद्दलची भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली. यावेळी त्यांनी राज्य व केंद्र सरकारवर टिका करतांनाच राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजप व सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ पुर्ण करेल का? या प्रश्नानां उत्तरे दिली.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, भाजपला सध्या लगीन घाई झाली आहे, पण फडणवीसांना बायको मिळत नसल्याने अडचण झाली आहे. ज्या दिवशी फडणवीसांना नवरी मिळेल त्या दिवशी राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा निकाल लागेल.

कोरोनामुळे कुठल्याही सार्वत्रिक निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार घटनेने राज्य किंवा केंद्र सरकारला दिलेला नाही. त्यामुळे युध्द सुरू असले तरी निवडणुका घेतल्या पाहिजे असे मतही आंबेडकरांनी व्यक्त केले.

सर्वसाधारण आरक्षणातून मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देता येणार नाही, असे परिपत्रक राज्य सरकारने काढले आहे, या संदर्भात आपण ते परिपत्रक वाचलेले नाही, त्याचा अभ्यास नसल्यामुळे प्रतिक्रिया देऊ शकत नाही असे आंबेडकरांनी स्पष्ट केले.

मोदी धार्मिक नेते..

राम मंदिराच्या भूमिपूजना विषयी छेडले असता, नरेंद्र मोदी हे पॉलिटिकल लीडर नाहीत, ते धार्मिक नेते आहेत, एका धार्मिक ग्रुपचे नेते आहेत, ते कधीच पॉलिटीकल लिडर होऊ शकत नाही, असे उत्तर देत आंबेडकरांनी या विषयावर अधिक बोलणे टाळले. राज्यातील आघाडी सरकारचे खरे स्टेअरिंग कोणाच्या हातात आहे, यावरही तिघांच्याही हातात स्टेअरिंग असल्याचे आंबेडकर म्हणाले.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारत रत्न देण्याची मागणी भाजपचे खासदार रामदास आठवले यांनी नुकतीच केली. या संदर्भात विचारले असता, अण्णाभाऊ साठे यांना भारत रत्न दिलेच पाहिजे अशी आमचीही मागणी असल्याचे आंबेडकरांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com