युवासेनेच्या सचिवांसमोरच गटबाजी; डावलल्यामुळे पदाधिकाऱ्याने क्रेन आणून लावले बॅनर..

लोकसभेपासून ते महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये युवासेनेची भूमिका महत्वाची ठरत आली आहे.
Yuva Sena Melawa Aurangabad news
Yuva Sena Melawa Aurangabad news

औरंगाबाद ः आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका डोळ्यासमोर ठेवत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने सचिव वरुण सरदेसाई यांनी मराठवाड्यात संवाद दौरा सुरू केला. बीड, जालन्यानंतर आज औरंगाबादेत हा मेळावा होत असतांना युवासेनेतील गटबाजी चव्हाट्यावर आली. (Factionalism exposed in front of Yuvasena secretaries; the office bearer brought a crane and put up a banner.) युवासेनेचे महाविद्यालयीन कक्षप्रमुख असलेले ऋषीकेश जैस्वाल यांना या संवाद दौऱ्यापासून दूर ठेवण्यात आल्याची चर्चा  आहे.

राज्य उपसचिव राजेंद्र जंजाळ, ऋषीकेश खैरे यांच्यावतीने शहरात लावण्यात आलेल्या संवाद मेळाव्याच्या बॅनरवर ऋषीकेश जैस्वाल यांचा फोटोच लावण्यात आला नाही. (Yuvasena Secretery Varun Sardesai) त्यामुळे संतापलेल्या ऋषीकेश जैस्वाल यांनी थेट संवाद मेळाव्याच्या प्रेवशद्वारावर वरूण सरदेसाई यांचे स्वागत करणारे भलेमोठे बॅनर लावले. विशेष म्हणजे ते लावण्यासाठी चक्क क्रेनचा वापर करण्यात आला आहे.

मेळाव्याच्या दर्शनी भागात क्रेनच्या सहाय्याने लावण्यात आलेल्या या बॅनरजी जोरदार चर्चा रंगली असून यातून युवासेनेतील गटबाजी देखील समोर आली आहे. (Yuvasena Chief Aditya Tahckeray) युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी सचिव वरुण सरदेसाई यांचा हा दौरा असला तरी औरंगाबादेतील पदाधिकाऱ्यांमध्येच विसंवाद असल्याचे या बॅनरबाजीवरून समोर आले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात युवासेनेची ताकद मोठी आहे. लोकसभेपासून ते महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये युवासेनेची भूमिका महत्वाची ठरत आली आहे. जिल्ह्यातील युवासेनेच्या महत्वाच्या पदांवर जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांचीच वर्णी लावण्यात आल्याचे यापुर्वी पहायला मिळाले आहे.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे चिरंजवी ऋषीकेश खैरे, आमदार प्रदीप जैस्वाल यांचे पुत्र ऋषीकेश जैस्वाल आणि आता यात नव्याने आमदार तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांचे चिरंजीव धर्मराज दानवे यांची भर पडली आहे. त्यामुळे युवासेनेती अंतर्गत गटबाजी अधूनमधून उफाळून येत असते.

आज पदाधिकारी संवाद मेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा ती उफाळून आल्याचे पहायला मिळाले. युवासेनेचे उपसचिव राजेंद्र जंजाळ. ऋषीकेश खैरे हेच जिल्ह्यात सर्वेसर्वा आहेत. त्यामुळे युवासेनेच्या पदाधिकारी नियुक्त्यांपासून संघटनेचे महत्वाचे निर्णय तेच घेतात. युवासेनेच्या सुरूवातीपासूनच शिवसेनेच्या नेत्यांची मुलं या संघटनेते सक्रीय आहेत. पण महत्वाकांक्षा वाढली की वादविवाद होतात आणि त्यातून मग एकमेकांना डावलण्याचे प्रकार घडतात.

बॅनरबाजीची चर्चा..

आमदार प्रदीप जैस्वाल यांचे चिरंजीव आणि युवासेनेचे महाविद्यालयीन कक्षप्रमुख ऋषीकेश जैस्वाल हे मध्यंतरीच्या काळात काहीसे संघटनेपासून दुरावले गेल्याचे चित्र होते. संघटनेत त्यांना डावलले जात असल्याची चर्चा होती.  आजच्या संवाद मेळाव्याच्या निमित्ताने शहर व जिल्ह्यात लावण्यात आलेल्या युवासेनेच्या बॅनवर देखील ऋषीकेश जैस्वाल यांना स्थान देण्यात आले नव्हते.

त्यामुळे ऋषीकेश जैस्वाल यांनी संवाद मेळावा होत असलेल्या श्रीहरी पॅव्हेलियनच्या प्रवेशद्वारावरच युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांचे स्वागत करणारे भव्य असे बॅनर तेही क्रेनच्या सहाय्याने लावले. यावर दिवंगत बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांचे फोटो आहेत.

जैस्वाल यांनी आपल्या या बॅनरवर युवासेनेचे उपसचिव असलेल्या राजेंद्र जंजाळ व ऋषीकेश खैरे यांना मात्र स्थान दिलेले नाही. त्यामुळे मेळाव्याच्या ठिकाणी चर्चांना उधाण आले होते. आता या बॅनरबाजीची दखल वरुण देसाई घेतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in