शिवसेनेला लाज वाटली पाहिजे म्हणत, एमआयएम मुख्यमंत्र्यांचे करणार उपरोधिक स्वागत..

गेली कित्येक वर्ष शिवसेना शहरात विकास केल्याचा ढोल बडवत आहे, मग ते आमच्या आंदोलनाला विरोध करुच शकत नाही.
Mp imtiaz jalil - Cm Uddhav Thackeray news aurangabad
Mp imtiaz jalil - Cm Uddhav Thackeray news aurangabad

औरंगाबाद ः मराठावाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या ध्वजारोहणासाठी औरंगाबादेत १७ सप्टेंबर रोजी येणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे एमआयएम उपरोधिक स्वागत करणार आहे. चिकलठाणा विमानतळापासून ते सिद्धार्थ उद्यानापर्यंत मानवी साखळी उभारून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना व त्यांनी आतापर्यंत दिलेल्या १४ महापौरांनी शहर आणि मराठवाड्यासाठी केलेल्या कामाबद्दल हे आभार आहेत, (Expressing gratitude for the rain of flowers, MIM will give a sarcastic welcome to the Chief Minister.) असा उपरोधिक टोला एमआयएमचे खासादर इम्तियाज जलील यांनी लगावला आहे.

इम्तियाज जलील आमदार असतांनापासून ते आता खासदार होईपर्यंत एकाही मराठवाडा मुक्तीसंग्रमा दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमाला हजर राहिले नाही. (Aimim Mp Imtiaz Jalil, Aurangabad) यावरून त्यांच्यांवर राजकीय पक्षांनी टीका देखील केली. परंतु आता आपण या सोहळ्या आवर्जून हजर राहणार आणि मराठवाड्यासाठी भरभरून दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानणार असेही इम्तियाज जलील यांनी सांगितले.

मराठावाडा मुक्तीसंग्रमा दिन, गणेशोत्सव, पैठण येथील संतपीठ व इतर विकासकामाच्या उद्धाटनासाठी उद्धव ठाकरे १७ रोजी औरंगाबादेत येत आहेत. (Chief Minister Uddhav Thackeray, Maharashtra) या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कुठल्याही प्रकारच्या राजकीय आंदोलन, निदर्शने करण्यास मनाई केली आहे. या आदेशाचा उल्लेख करत इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत आपल्या या उपरोधिक आंदोलना संदर्भात माहिती दिली.

इम्तियाज जलील म्हणाले, लोकशाहीत आंदोनल करायचे नाही, प्रश्न मांडायचे नाही ही हिटलरशाही झाली. पण आम्ही पोलिसांना आश्वास्त करू इच्छितो,की आम्ही कुठल्याही प्रकारचे आंदोलन, नारेबाजी, निदर्शने करणार नाही, तर आम्ही फक्त हातात पोस्टर घेऊन मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त करणार आहोत. ठिकठिकाणी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करणार आहोत. माझ्या मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यापासून तर आम्हाला कोणी रोखू शकत नाही.

त्यामुळे १७ सप्टेंबर रोजी एमआयएमचे सर्व कार्यकर्ते, मराठवाड्यावर प्रेम करणारे नागरिक आणि स्वतःला मावळे समजणारे देखील या स्वागतात सहभागी होतील. शिवसेनेने शहराचा विकास केल्याचा दावा करत एक पुस्तिका काढली, त्याला शिवसेनेच्या १४ माजी महापौरांनी हजेरी लावली. मग या महापौरांनी आणि गेली पंचवीस-तीस वर्ष शहरावर राज्य करणाऱ्या शिवसेनेने जे काही दिले आहे, त्याबद्दल आम्ही मुख्यमंत्र्यांचे आभार मानणार आहोत.

आभार कशासाठी ?

मराठवाड्यातील सिंचन, शैक्षणिक क्षेत्रातील अनुशेष भरून काढला, रेल्वेचे प्रश्न मार्गी लावले, शहर आणि मराठवाड्याचा औद्योगिक विकास केला. शहरातील कचऱ्याचा प्रश्न सोडवला, लोकांना चोवीस तास, शुद्ध पाणी मिळते, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार. मराठवाड्यातील खेळांडूसाठी मंजुर झालेले क्रिडा विद्यापीठ, आयआयएम, एम्स, सारख्या मोठ्या संस्था राखल्याबद्दल आम्ही मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त करणार आहोत.

गेली कित्येक वर्ष शिवसेना शहरात विकास केल्याचा ढोल बडवत आहे, मग ते आमच्या आंदोलनाला विरोध करुच शकत नाही. त्यामुळे आमच्याकडून मुख्यमंत्र्यांचे होणारे स्वागत आणि धन्यवाद स्वीकारावेच लागतील, असा चिमटा देखील इम्तियाज जलील यांनी यावेळी काढला. पोलिसांनी देखील आम्हाला सहकार्य करावे, त्यांनी देखील मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त करावेत, असे आवाहन देखील त्यांनी पत्रकार परिषदेत केले.

खेळाडू नको, संत घडवायचे?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे १७ सप्टेंबर रोजी पैठण येथील संतपीठाचे देखील उद्घाटन करणार आहेत, याचा उल्लेख करत इम्तियाज जलील म्हणाले, मराठवाडा क्रिडी विद्यापीठ औरंगाबादला मंजुर झाले होते, अर्थसंकल्पात देखील त्याचा उल्लेख करण्यात आला होता.

पण नंतर राष्ट्रवादीच्या दबावाला बळी पडत शिवसेनेने ते पुण्याला हलवण्यास मदत केली. आम्ही पालकमंत्री सुभाष देसाई यांना काळे झेंडे दाखवून निषेध केला. शिवसेनेला मराठवाड्यात चांगले खेळाडू तयार करायचे नाहीत, तर संत तयार करायचे आहेत, म्हणून संतपीठ उभारले जात आहे, अशी टीका देखील त्यांनी केली.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com