प्रत्येकाला मुख्यमंत्री व्हावेसे वाटते, पटोलेंच्या इच्छेत गैर काय? - Everyone wants to be the Chief Minister, what is wrong with Patole's wish? | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी ८.३० वाजता आषाढी पौर्णिमा- धम्म चक्र दिवशी देशवासियांशी संबोधित करतील . मोदी यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.

प्रत्येकाला मुख्यमंत्री व्हावेसे वाटते, पटोलेंच्या इच्छेत गैर काय?

संतोष जोशी
सोमवार, 14 जून 2021

नाना पटोले हे प्रदेश काॅंग्रेसचे अध्यक्ष आहेत, आणि त्यांनी सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याची भूमिका घेतली असेल तर पक्षाचा निर्णय म्हणून आम्हाला तो मान्य करावाच लागेल.

नांदेड  : प्रत्येकाला मुख्यमंत्री व्हावेसे वाटते, पटोलेंनी इच्छा बोलून दाखवली तर त्यात गैर काय?  असे म्हणत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा काॅंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या महत्वाकांक्षेला पाठिंबा दर्शवला आहे. (Everyone wants to be the Chief Minister, what is wrong with Patole's wish?) पटोले यांनी सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याची भूमिका घेतली असेल तर पक्षाचा निर्णय म्हणून आम्हाला तो मान्य करावाच लागेल, असे चव्हाण म्हणाले.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व काही अलेबल आहे असे सांगितले जात असले तरी तीन्ही पक्षातील नेत्यांकडून केली जाणारी विधानं, स्वबळाची भाषा नेमकी त्या उलट आहे. (PWD Minister Ashok Chavan) राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या २२ व्या वर्धापनदिनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढील विधानसभा निवडणुक राष्ट्रवादी व शिवसेना एकत्रित लढेल या घोषणेनंतर तर काॅंग्रेसमध्ये स्वबळाची भाषा जोरात सुरू झाली आहे.

काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आम्ही सर्व निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे सांगत आहेत. आता तर त्यांनी आपली मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा देखील जाहीरपणे बोलून दाखवली आहे. (Congress State President Nana Patole) यावरून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांमध्ये चांगलाच कलगितुरा रंगला आहे. सरकारमधील मंत्री व काॅग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली.

विशेषतः प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची स्वबळाची भाषा व मुख्यमंत्रीपदाबद्दलची महात्वाकांक्षा यावर बोलतांना अशोक चव्हाण म्हणाले, नाना पटोले हे प्रदेश काॅंग्रेसचे अध्यक्ष आहेत, आणि त्यांनी सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याची भूमिका घेतली असेल तर पक्षाचा निर्णय म्हणून आम्हाला तो मान्य करावाच लागेल.

मुख्यमंत्रीपदाची महत्वाकांक्षा व इच्छा देखील नाना पटोले यांनी व्यक्त केली, यावर प्रत्येकाला मुख्यमंत्री व्हावे वाटते, मग पटोले यांनी तशी इच्छा बोलून दाखवली तर त्यात गैर काय? असा सवाल देखील चव्हाण यांनी केला.

हे ही वाचा ः पुढची साडेतीन वर्ष आणि भविष्यातही उध्दव ठाकरेच मुख्यमंत्री..

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख