राष्ट्रीय बॅंक परिषदेत दानवेंचे `मंथन` ऐकून सगळेच खो खो हसले..

लोकसभेत ते इंग्रजीत भाषण करतात. त्यामुळे परिषदेतील भाषण मला किती समजले असले असा त्यांना प्रश्न पडला असेल.
Central State Minister Raosaheb Danve News Aurangabad
Central State Minister Raosaheb Danve News Aurangabad

औरंगाबाद ः देशभरातील राष्ट्रीय बॅंकांच्या मंथन या परिषदेत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहबे दानवे यांचे `मंथन`, ऐकून  व्यासपीठावरील नेते, बॅंकेचे बडे अधिकारी आणि समोर उपस्थित सगळेच पोट धरून हसले.(Everyone laughed out loud when they heard Danve churning at the National Bank Conference.) उच्चशिक्षित, इंग्रजीतून झालेल्या या परिषदेत आपल्याकडे पाहून खासदार इम्तियाज जलील का? हसले याचा अंदाज आपल्याला आला, असे सांगत दानवे यांनी काही किस्से आपल्या खास ग्रामीण शैलीत सांगितले आणि अख्खे सभागृह खळखळून हसले.

या परिषदेच्या माध्यमातून बॅंके संदर्भात काही प्रश्न पडले असतील तर ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ.भागवत कराड हे दोघे देतील, सगळ्याच प्रश्नांना मी उत्तर दिलेच पाहिजे असे नाही, असा चिमटा दानवे यांनी काढला. इम्तियाज जलील यांना देखील त्यांनी टोला लगावला, (Central Minister Raosaheb Danve) मी ३५ वर्षापासून राजकाराणातील नावाडी आहे, पण अजून माझ्या नावेला छिद्र पडलेलं नाही, जलील साहेब तुम्हाला तर फक्त तीनच वर्ष झाले, असा टोलाही दानवे यांनी लगावला.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ.भागवत कराड यांच्या पुढाकाराने औरंगाबादेत राष्ट्रीय बॅंकांच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. (Central State Minister Dr.Bhgwat Karad) या मंथन परिषदेच्या समारोपास देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे यांची प्रमुख उपस्थिती होती. (Bjp Leader Devendra Fadanvis)  मंथन परिषदेतील सर्वच मान्यवरांनी इंग्रजीतून आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर रावसाहेब दानवे भाषणासाठी उभे राहिले आणि त्यांनी मराठीतून सुरूवात केली.

दानवे म्हणाले, आपण व्यासपीठावर बसलेलो असतांना खासदार इम्तियाज जलील हे माझ्याकडे पाहून हसत होते. ते का हसतायेत हे मला समजले? गेल्या दोन-अडीच वर्षापासून माझा आणि त्यांचा संपर्क आला. लोकसभेत ते इंग्रजीत भाषण करतात. त्यामुळे परिषदेतील भाषण मला किती समजले असले असा त्यांना प्रश्न पडला असेल. पण मला काय समजले हे तुम्हाला समजण्यासाठी मी एक किस्सा सांगतो.

आमच्या गावात एक विदर्भातील किर्तंनकार यायचे. गावागावत जाऊन ते किर्तन करायचे. एक दिवस महाराज आजारी पडले, दुसऱ्या गावात किर्तन ऐकायला गर्दी जमली होती. महाराज आजारी मग काय करायचे असा प्रश्न निर्माण झाला, तेव्हा त्यांच्या शिष्याने तुमच्या सोबत राहून मी खूप शिकलो आहे, मी तुमच्या सारखेच किर्तन करू शकतो असे सांगितले.

महाराजांनी विश्वासाने त्याला आपले कपडे दिले आणि शिष्याचे स्वतः घातले. शिष्याने महाराजांसारखेच किर्तन केले. पण किर्तन झाल्यानंतर उपस्थितांपैकी एकाने महाराज झालेल्या शिष्याला दोन प्रश्न विचारले. त्यावर त्याने मोठ्या खुबीने एवढ्या छोट्या प्रश्नांच उत्तरं मी कशाला द्यायला पाहिजे, माझा शिष्य देईल म्हणून महाराजांकडे प्रश्न टोलावला.

तसंच या परिषदेच्या निमित्ताने बॅंके संदर्भात तुम्हाला जर काही प्रश्न पडले असतील तर त्यासाठी फडणवीस आणि कराड हे आहेत, त्यांना विचारा, असे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. मी ३५ वर्ष राजकारणात आहे, पण वेळ कशी मारून न्यायची हे मला चांगले ठाऊक आहे, असा चिमटाही त्यांनी खासदार इम्तियाज जलील यांना काढला.

मी राजकारणातला नावाडी..

एवढ्यावर दानवे थांबले नाही, त्यांनी इम्तियाज यांना समजावून सांगण्यासाठी दुसरा किस्सा सांगितला. दोन शिक्षित लोक नावेत बसले होते, नावाडी अशिक्षित होता. दोघांनी त्याला त्याचे शिक्षण विचारले, तो म्हणाला मी काहीच शिकलो नाही, ते म्हणाले तुझे पन्नास टक्के जीवन वाया गेले.

त्यावर नाव नदीच्या मधोमध आलेली असतांना नावाडी त्या शिकलेल्या दोघांना म्हणाला, तुम्हाला पोहता येते का? त्यावर ते नाही म्हणाले, मग नावाडी त्यांना म्हणाला, तुम्ही शंभर टक्के वाया गेले. तसा मी राजकारणातला नावाडी आहे, आणि अजून माझ्या नावेला भोकसं पडलेलं नाही. तुम्ही तीन वर्षापासून राजकारणात आला आहात, असा टोला देखील रावसाहेब दानवे यांनी इम्तियाज यांना लगावला. रावसाहबे दानवे यांच्या या धमाल आणि गंमतीशीर भाषणाला उपस्थितांनी देखील भरभरून दाद दिली. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com