महाराष्ट्रातील येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत महाविकास आघाडीचा सफाया होईल

राज्यात भारतीय जनता पार्टी-शिवसेना युतिला बहुमत मिळाले होते. जनमत हे आमच्या बाजुने होते परंतु दगाफटका करुन यांनी हे सरकार बनवलं.
Bjp Leader Raosaheb Danve Reaction News Jalna
Bjp Leader Raosaheb Danve Reaction News Jalna

जालना ः पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीतील निकालाने राज्यातील जनता तीन पक्षांच्या सरकावर नाराज असल्याचे दाखवून दिले आहे. मुळात महाविकास आघाडीचे हे सरकारच दगाफटका देवून  सत्तेवर आलेले आहे. आमच्या काळात असलेली विकासकामेच सध्या सुरू आहेत, या सरकारला नवी विकासकामे करताच आलेली नाहीत. पंढरपूरच्या निकालातून याबद्दलची नाराजी जनतेने दाखवून दिला आहे. यापुढे राज्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका व सगळ्याच निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा सफाया झाल्याशिवाय राहणार नाही, असा दावा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे.

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीताल भाजपच्या विजयाबद्दल दानवे यांनी आपली प्रतिक्रिया प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केली. यावेळी त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. दानवे म्हणाले, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोट निवडणूकीत भाजपाचे समाधान अवताडे यांच्या विजयाबद्दल मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. हा निकाल राज्यातील राजकारणाची पुढील दिशा ठरवणारा आहे.

मुळामध्ये राज्यात भारतीय जनता पार्टी-शिवसेना युतिला बहुमत मिळाले होते. जनमत हे आमच्या बाजुने होते परंतु दगाफटका करुन यांनी हे सरकार बनवलं व हे लोकांना मान्य नाही हेच या निकालावरुन हे स्पष्ट झाले आहे. राज्याच्या राजकारणाची पुढची दिशा काय असणार आहे? हे देखील स्पष्ट झालं आहे.

मंत्र्यांमध्ये ताळमेळ नाही..

गेल्या दोन वर्षाच्या काळात राज्यातील विकास पुर्णपणे ठप्प आहे. आमच्या सरकारने सुरू केलेली कामच चालू आहेत, नविन प्रकल्प किवा काम या सरकारला सुरू करता आलेले नाही. तीन पक्षाच्या सरकारमध्ये अजिबात समन्वय नाही. राज्यात लसीची मागणी जेव्हा केली गेली तेव्हा आरोग्य मंत्री टोपे ८० हजार, पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार ६० हजार तर महसुल मंत्री बाळासाहेब थोरात हे ५० हजार डोसची मागणी करत होते. या सरकार मधील मंत्र्यांच्या बोलण्यातच ताळमेळ नाही, हे यावरून दिसून आले होते. 

शेतकरी, शेतमजूर हे या राज्यामध्ये अडचणीत आलेले आहेत. शेतकऱ्यांची नुकसानभरपाई अद्यापपर्यंत दिली गेलेली नाही. या व अशा अनेक अडचणी महाराष्ट्राच्या जनतेला या सरकार मुळे होत आहेत. राज्याच्या राजकारणाची पुढची दिशा स्पष्ट झाली असून आता हे निश्चित आहे की जिल्हा परिषद, पंचायत समित्या, आणि नगर पालिकेच्या निवडणूकीमध्ये हे संपूर्णपणे साफ होतील, असा दावा देखील दानवे यांनी केला.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com