नांदेड जिल्ह्यातील अकरा आमदारांनी कोरोनासाठी दिला साडेपाच कोटींचा निधी

राज्य सरकारने मदत केलीच, पण स्थानिक आमदारांना देखील १ कोटी पर्यंतचा निधी यावर खर्च करण्याची परवानगी दिली.
Mla Donate Fund For corona news Nanded
Mla Donate Fund For corona news Nanded

नांदेड ः राज्यावर ओढावलेले संकट पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय आमदारांना आपापल्या मतदारसंघातील आरोग्य उपाययोजनांवर १ कोटींचा स्थानिक निधी खर्च करण्याची परवानगी दिली होती. (Eleven MLAs from Nanded district donated Rs 5.5 crore for the corona) या अंतर्गत राज्यातील अनेक आमदारांनी मतदारसंघात रुग्णवाहिका, आॅक्सीजन प्लाॅंट, व्हेंटिलेटर, औषधी खरेदीसाठी निधी खर्च केला. नांदेड जिल्ह्यातील अकरा आमदारांनी कोरोनावरील उपाययोजनांसाठी साडेपाच कोटींचा निधी खर्च केला आहे.

नऊ विधानसभा आणि दोन विधानपरिषद अशा ११ आमदारांनी मिळून एकूण पाच कोटी ४० लाख ७४ हजार रुपयांचा निधी दिला आहे. यातील पाच कोटी ३६ लाख रुपयांचा निधी वितरीत होऊन खर्चही करण्यात आला आहे. (Raosaheb Antapurkar spent the highest amount of 99 lakh 52 thousand.) बिलोलीचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांनी सर्वाधिक ९९ लाख ५२ हजारांची निधी खर्च केला. पण दुर्दैवाने कोरोनाने त्यांनाच हिरावून नेले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मराठवाड्यातील औरंगाबाद, लातूर, बीड, हिंगोली, जालना, उस्मानाबाद या जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढली होती. नांदेड, परभणीत इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कोरोना रुग्णांची संख्या व मृत्यूदर हा कमी होता.  तरी देखील मराठवाड्यात कोरोनाचा वाढता विळखा पाहता, आरोग्य उपाययोजनांवर अधिक भर देण्याची गरज होती. राज्य सरकारने मदत केलीच, पण स्थानिक आमदारांना देखील १ कोटी पर्यंतचा निधी यावर खर्च करण्याची परवानगी दिली.

नांदेडला जिल्ह्यातील  ११ आमदारांनी स्थानिक विकास कार्यक्रमातंर्गत निधी उपलब्ध करून दिला.यातून व्हेंटीलेटर्स, इन्फारेड थर्मामीटर, आॅक्सीमीटर, पीपीई किट्‍स, एन - ९५ मास्क, ट्रीपल लेअर मास्क, कोरोना टेस्टिंग किट, सॅनिटायझर, आॅक्सीजन सिलेंडर किट, औषध पुरवठा तसेच इतर साहित्याचा समावेश आहे. तसेच अतिदक्षता विभाग (आयसीयू), कोविड सेंटर, इतर दवाखाने कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक  सुविधा निर्माण करण्यासाठी हा निधी वापरण्यात आला.

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी याबाबत जिल्हा नियोजन विभागाची बैठक घेऊन शासकीय रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय त्याचबरोबर उपजिल्हा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा घुगे ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर आणि इतर विभागप्रमुख व अधिकारी यांना त्यानुसार हा निधी खर्च केला.
 
अंतापुरकरांचा सर्वात जास्त निधी पण..

देगलूर - बिलोलीचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांनी सर्वाधिक ९९ लाख ९१ हजार रुपयांचा निधी दिला. त्यापैकी ९९ लाख ५२ हजार रुपये वितरीत करण्यात आले. कोरोना संसर्गात प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी त्यांनी पुढाकार घेतला मात्र, दुर्देवाने त्यांनाच कोरोनाची लागण झाली आणि मुंबईत उपचार सुरू असताना त्यांचे दुर्देवी निधन झाले.

वितरित निधी पुढील प्रमाणे

१) रावसाहेब अंतापूरकर ः ९९ लाख ५२ हजार
२) माधव पाटील जवळगावकर ः ८८ लाख ३२ हजार
३) राजेश पवार ः ५९ लाख ५१ हजार
४) मोहन हंबर्डे ः ५५ लाख ८६ हजार
५) अशोक चव्हाण ः ४८ लाख ६८ हजार
६) भीमराव केराम ः ३८ लाख २४ हजार
७) राम पाटील रातोळीकर ः ३६ लाख ७२ हजार
८) अमर राजूरकर ः २९ लाख ५१ हजार
९) श्यामसुंदर शिंदे ः २७ लाख ८० हजार
१०) बालाजी कल्याणकर ः २७ लाख सात हजार
११) डॉ. तुषार राठोड ः २५ लाख ७७ हजार

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com