तामिळनाडुच्या निवडणुकीत खासदार इम्तियाज जलील लुंगी घालून प्रचारात..

तामिळनाडुच्या रस्त्यांवर खासदार इम्तियाज जलील व वारिस पठाण हे चक्क पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि त्या खाली जरीची किनार असलेली लुंगी घालून अगदी अण्णा स्टाईलने प्रचार करतांना दिसत आहेत.
Mp Imtiaz Jalil Cammpaining Wearing Lungi In Tamilnadu News
Mp Imtiaz Jalil Cammpaining Wearing Lungi In Tamilnadu News

औरंगाबाद ः एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे दोन दिवसांपुर्वी तामिळनाडु विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले होते. महाराष्ट्रातील एकमेव खासदार, सुशिक्षित, विषयांची जाण आणि वक्तृत्वात पारंगत असल्यामुळे असदुद्दीन ओवेसी यांच्यासोबत बाहेरच्या राज्यातील प्रचाराची धुरा इम्तियाज यांच्या खांद्यावर असते. तामिळनाडुत देखील एमआयएम विधानसभा लढवणार आहे. त्यामुळे पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी इम्तियाज जलील यांनी जैसे देस वैसा भेस म्हणत चक्क लुंगी घातली. सध्या तामिळनाडुतील त्यांचा हा अण्णा लूक चांगलाच चर्चेत आला आहे.

एमआयएमने २०१९ मध्ये औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढवली आणि जॅकपाॅट लागावा तशी एमआयएमची जागा निवडूण आली. पाच वर्षांपुर्वी आमदार झालेले इम्तियाज जलील मुदत संपण्याआधीच खासदार झाले. महाराष्ट्रातील एमआयएमचे एकमेव खासदार होण्याचा मान त्यांना मिळाला. असदुद्दीने ओवोसी यांच्या जोडीला संसदेत इम्तियाज जलील पोहचल्याने पक्षाचा आत्मविश्वास चांगलाच वाढला. त्यामुळे बिहार, गुजरात, पश्चिम बंगाल, तामिळनाडू अशा सर्वच विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत एमआयएम ताकदीने उतरली.

या सगळ्या निवडणुकांमध्ये असदुद्दी ओवेसी यांच्यानंतर पक्षाच्या प्रचाराची धुरा प्रामुख्याने इम्तियाज जलील यांच्याच खांद्यावर होती. बिहारमध्ये पक्षाला यश मिळाले त्यात इम्तियाज यांचा देखील खारीचा वाटा होता. त्यानंतर गुजरात महापालिका निवडणुकीत देखील स्थानिक पक्षाशी युती करण्यापासून ते निवडणुक निकालापर्यंत इम्तियाज जलील सक्रीय होते. पक्षाला यश आणि चंचू प्रवेश का होईना, पण मिळाला. आता आसाम, तामिळनाडू, पश्चिम बंगाल राज्यात विधानसभा निवडणका होत आहेत.

हटके अण्णा स्टाईल..

एमआयएमने इथेही नशिब आजमावण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात या राज्यातील प्रचाराची जबाबदारी देखील असदुद्दीन ओवेसी यांच्यासोबत इम्तियाज जलील व वारिस पठाण यांच्यावर आहे. इम्तियाज जलील व वारिस पठाण हे सध्या तामिळनाडूत पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सभा, रोड शो, काॅर्नर सभा घेत आहेत. निवणुका म्हटंल की राजकीय नेत्यांना काय काय करावे लागते? हे अनेकदा दिसून आले आहे. अगदी त्या त्या राज्यातील भाषेत भाषण, पेहराव आदी गोष्टींवर प्रामुख्याने भर दिला जातो. आता एमआयएम देखील यात मागे नाही.

तामिळनाडुच्या रस्त्यांवर खासदार इम्तियाज जलील व वारिस पठाण हे चक्क पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि त्या खाली जरीची किनार असलेली लुंगी घालून अगदी अण्णा स्टाईलने प्रचार करतांना दिसत आहेत. स्थानिक उमेदवार व मतदारांना हे नेते आपलेच आहेत असे वाटाव असा या मागचा हेतू असतो. पण इकडे महाराष्ट्रात जीन्स, टी-शर्ट घालून फिरणारे खासदार इम्तियाज जलील यांचा हा नवा अवतार सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com